मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|पंढरीमाहात्म्य| अभंग २१ ते २४ पंढरीमाहात्म्य अभंग १ अभंग २ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २४ अभंग २५ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ४९ अभंग ५० ते ५३ पंढरीमाहात्म्य - अभंग २१ ते २४ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेव अभंग २१ ते २४ Translation - भाषांतर २१.आधीं रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥जेव्हां नव्हतें चराचर । तैं होतें पंढरपुर ॥२॥जेव्हां नव्हती गोदा गंगा । तेव्हां होती चंद्रभागा ॥३॥चंद्रभागेचे तटीं । धन्य पंढरी गोमटी ॥४॥नासिलीया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥असे सुदर्श-नावरी । ह्मणूनि अविनाश पंढरी ॥६॥नामा ह्मणे बा श्रीहरी । ते म्यां देखिली पंढरी ॥७॥२२.अवघी हे पंढरी सुखाची वोवरी । अवघ्या घरोघरीं ब्रह्मानंद ॥१॥अवघा हा विठ्ठल सुखाचाचि आहे । अनुसरे तो लाहे सर्व सुख ॥२॥पहावा अवघा नयनीं ऐकावा श्रवणीं । अ-वघा घ्यावा ध्यानीं अवघ्या मनें ॥३॥अवघिये आवडी अवघा गावा गीतीं । अवघा सर्वांभूतीं तोचि आहे ॥४॥अवघा हा जाणावा अवघा हा मानावा । अवघा वाखाणावा अवघी वाता ॥५॥अवघा ओळखोनि अवघा गिळिजे मनें । अवघा हाचि होणें ह्मणे नामा ॥६॥२३.अवघें हें पवित्र पांडुरंग क्षेत्र । सुखाचि सर्वत्र भरलें असे ॥१॥अवघा हा विठठल गीतीं गातां । अवघें पुरवी कोड नामें एकें ॥२॥अवघें जे सांडोनि अनुसरले यातें । अवघें देतो त्यांतें आपुलें प्रेम ॥३॥अवघी चित्तवृत्ति ठेविती याच्या पायीं । ह्यातें अवघ्या बाहीं आलिंगितो ॥४॥अवघें आपुलें मन दिल्हें जिहीं यातें । असे त्यांसांगातें मागें पुढें ॥५॥अवघ्यासि अनुरला अवघेंचि विसरला । अवघा नामा झाला सुखरूप ॥६॥२४.तूं जाऊं नको जेथें तेथें । जरी तुज मुक्तीचें आर्तें । तुज मी सांगेम हित । देऊनि चित्त परियेसें ॥१॥शंभु अडसष्टी तीर्थांचेम माहेर । सकळ सिद्धि ऋषीश्वर । मध्यान्हकाळीं सुरवर । पंढरपूर ठाकती ॥२॥जाई जांई आलियारे । पांडुरंगीं राहें स्थिररे । न लगती आणिक दैवतें रे । एक पुरे विठ्ठलची ॥३॥तीर्थ क्षेत्र दैवतें । ऐसें नाही जेथे तेथें । तिन्ही सर्वोत्तम जेथें । तें पैं क्षेत्र सांगेन ॥४॥श्रीहरीच्या चोविस मूर्ति । विठ्ठल प्रेमदृष्टीं प्रीति । सहस्त्र नामांवरती कीर्ती । विठठल दैवत जाणावें ॥५॥रुद्रार्धांगी गौरी । जान्हवी असे शिरीं । सर्वांग व्यापिनी भीमा सुंदरी । आले त्रिपुरारी ठाकोनी ॥६॥कोटिजन्माचें पातक । नासे स्नान केलिया देख । एवढें क्षेत्र अलैकिक । पांडुरंग भींवरा ॥७॥काशीं त्यागिजे शरीर । हिंवे शिणलें केदार । पाणी गोमतीचें क्षार । म्हणवोनि महिमा सम नाहीं ॥८॥जन्म मरणावेगळें । वैकुंठ तुकिलें सगळें । परि त्याहूनि आगळें । एक अक्षर जाणावें ॥९॥गया भोंवुनि चौ-दापदीं । तीं अनंतें वेणुनादीं । काला केला गोविंदीं । हा दृष्टांत पहा पां ॥१०॥ज्याचेनि नांवें पिंडदान । त्यासी गयेसी गति जाण । येथें करितां नाम स्मरण । सर्व पूर्वजां मुक्ती ॥११॥कार्ति-कीये आदित्यवारीं । जो पद्माला स्नान करी ! त्यासी नाहेम येरझारी । नये पुढती संसारा ॥१२॥इंद्र येवढे परमेष्टी । तेथें मनुष्याच्या काय गोष्टी । धन्य धन्य तो एक सृष्टीं । पंढरी दृष्टीं जो देखे ॥१३॥बरवें पुंडलीकें केलें । हें परब्रह्म रे अर्चिलें । जगांत शांतवन केलें । परि नेटकें सर्वथा ॥१४॥तीर्थ सोपारें सधर । कष्ट न लगती अपार । उपवासी निराहार । कीं क्षौर करणोंचि नलगे ॥१५॥येथें सुखें येणें जाणें । घेणें नलगे धरणें । मनीचें मनोरथ पुरवणें । एके भेटीसाठीं ॥१६॥पूर्वजन्मींचा तापसी । तीर्थें केलीं पुण्यराशीं । सहस्त्र शतें भोजनासी । देवां द्विजां भजिन्नला ॥१७॥शाळिग्रामाची पूजा करी । त्यासी प्रसन्न झाले हरि । त्यसी दावितो पंढरी । पूर्व सं-स्कारी ह्मणोनियां ॥१८॥जयासी नावडे पंढरी । तो पापिया दुरा-चारी । उपजोनियां संसारीं । येरझारीं । शिणतो ॥१९॥त्यासी श्वान सूकर हांसती । ह्मणती यासी कैसी पडली भ्रांती । उपजो-नियां मनुष्ययातीं । पंढरपूरपति नोळखे ॥२०॥जो विन्मुख पंढ-रपुरा । त्याचा संग झणीं धरा । मोडोनि सुकृताचा थारा । पाप शरीरासी तो गेल ॥२१॥जो पंढरीसी आर्तु । त्याची करा बरवी मातु । अंतकाळीं पंढरीनाथु । यमपंथु चुकवील ॥२२॥बरवें सम-तुल्य वाळुवंत । वरी वैष्णव मिळाले घनदाट । करिती हरिनामाचे बोभाट । वीर उद्भट विठ्ठालचे ॥२३॥जे येथें प्रेमासी आतुर । ते चतुर्भुज होती नर । येवढें क्षेत्र पंढरपुर । महिमा थोर तिहीं लोकीं ॥२४॥अन्य क्षेत्रीं पाप कीजे । तें पुण्य क्षेत्रीं विनसिजे । पुण्य क्षेत्रीं पाप कीजे । तें त्यागिजे पंढरीसी ॥२५॥पंढरीचें पातक । पंढ-रीस नासे देख । ऐवढें क्षेत्र अलौकिक । त्रिभुवनामाझारी ॥२६॥पैल इटेवरी सांवळा । विठोबा पहा पहा रे डोळां । विघ्न घालोनि पायातळा । आणिक कळिकाळा दमेना ॥२७॥जप तप अनु-ष्ठान । नलगे जिवासी रे बंधन । आणिक न करावें साधन । पहावे चरण विठोबाचे ॥२८॥देवा सांगे वसुंधरा । मी नभियें सप्तसा-गरा । स्थावर जंगमादि सारा । नाहीं भार तयाचा ॥२९॥ज्यासी नावडे विठ्ठल वीरु । त्याचा मज भार थोरु । त्यासी नरकीं होय थारु । तो असुर प्राणिया ॥३०॥ऐसा हा पंढरपुरपति । जीवंतु असतां देतो मुक्ति । मेलिया देतो ब्रह्मप्राप्ति । दोहींकडे सौरस ॥३१॥येरं प्राणियां कष्ट थोर । परि तें न भरे उदर । मेलिया । यम किंकर । अष्टौप्रहर जाचिती ॥३२॥ऐसा हा कैलासींचा राणा । गिरीजे स्कंदा सांगे खुणा । तुह्मी आणिक मंल नेणां । या पांडुरंगावांचुनी ॥३३॥विठ्ठल विठ्ठल म्हणतां । तुटती महापातकचळथा । विष्णुदास नामा विनवीं संतां । सावधान व्हा जी ह्मणतसे ॥३४॥ N/A References : N/A Last Updated : April 23, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP