मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|पंढरीमाहात्म्य| अभंग १६ ते २० पंढरीमाहात्म्य अभंग १ अभंग २ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २४ अभंग २५ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ४९ अभंग ५० ते ५३ पंढरीमाहात्म्य - अभंग १६ ते २० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेव अभंग १६ ते २० Translation - भाषांतर १६.सांडूनि पंढरी जासी आणिका तीर्था । लाज तुझ्या चित्ता कैसी नये ॥१॥त्रिभुवनिचीं तीर्थें झालीं तीं मळीण । व्हा-वया पावन आलीं येथें ॥२॥एवढा ब्रह्मानंद कैंचा आणिका ठायीं । जो या आहे पायीं विठोबाच्या ॥३॥काळ मृत्यु दोन्ही घालोनि पायांतळीं । वाजलिया टाळी कीर्तनसंगें ॥४॥नित्य नवी दिवाळी सुखाचा सोहळा । भोगिजे अवलीला संतसंगे ॥५॥धर्म अर्थ काम मोक्ष मुक्ति चारी । देतो हा मुरारी नामें एका ॥६॥नामा ह्मणे चला जाऊं पंढरिये । पाहूं बापमाये पांडुरंग ॥७॥१७.काशी हे पंढरी । प्रयाग नीरा नृसिंहपुरी । पिंड ठेवा पुष्पवती संगमपदावरी । पूर्वज होती चतुर्भुज ॥१॥सकळ तीर्थें वाराणसी । मध्यनकाळीं येती पंढरीसी । ओंवाळिती विठोबासी । विश्वनाथ ह्मणोनियां ॥२॥ह्मणऊनि वेगीं चला पंढरपुरा । विठोबा-रायाच्या नगरा । चंद्रभागा सरोवरा । देव कौतुक पाहती ॥३॥वारा-पासी मनिकर्णिका । चंद्रभागा पुंडलिका । वाराणसी भागीरथी देखा । पांडुरंगीं भीमरथी ॥४॥वाराणसी पंचगंगा । पुष्पवती पांडुरंगा । महा पातकें जाती भंगा । तीर्थें मस्तकीं वंदिल्या ॥५॥वाराणसी दंडपाणि । क्षेत्रपाळ हे हनुमंत दोन्ही । सकळ तीर्थें विठोबाचे चरणीं । काशी होय पंढरी ॥६॥वारासणसी माधवबिंदू । पांडुरंगीं वेणुनादू । पंचकोशी तीर्थ उदंडू । पांडुरंगी पद्मतीर्थ ॥७॥वारा-णसी मोक्षपंथा । विठठलचेनि सायुज्यता । एवढें तीर्थ त्रिभुवनीं पा-हतां । तीर्थ नाहीं यापरतें ॥८॥वाराणसी चंद्रमौळी । पांडुरंगीं वनमाळी । विश्र्वनाथ नंदी जवळी । विठोबा जवळी गरुड असे ॥९॥वाराणसी गौरी खुणा । पांडुरंगीं रुक्मिणी जाणा । वाराणसी अन्न-पूर्णा । पांडुरंगीं जाणा सत्यभामा ॥१०॥वाराणसी त्रिशुळावरी । सुदर्शनावरी पंढरी । कांहीं संदेह मनीं न धरीं । काशी होय पंढरी ॥११॥ऐसें सकळ तीर्थांचें माहेर । तीर्थ नाहीं यापरतें थोर । विष्णुदास नामयाचा दातार । पुंडलिकासहित असे ॥१२॥१८.पाहातां देऊळाची पाठ । तीर्थें घडलीं तीनशें साठ ॥१॥स्त्रान करितां पन्हाळें । उद्धरती सर्व कुळें ॥२॥सन्मुख पाहातां विठाई । त्यासी उपमा द्यावया नाहीं ॥३॥ऐसा पंढरीचा महिमा । काय वर्णू ह्मणे नामा ॥४॥१९.श्रोते ह्मणती विष्णुदासा । या ब्रह्मांडींचा प्रळय कैसा । पंढरीच्या भास । नाश कीं नाहीं ॥१॥तंव नामा ह्मणे सुदर्शना-वरी । देवें रचिली पंढरी । भक्तांसहित राज्य करी । रुक्मिणीवर ॥२॥तो परमात्मा गुणातीत । अपरोक्ष भक्तांसहित । तेथें प्र-ळय हात जोडित । जयालागीं ॥३॥जें ब्रह्मयाचें आयुष्य सारें । तें लया जाय चराचरें । तें पंढरपूर । मिळे वस्तु माझी ॥४॥नामा ह्मणे या खुणा । कळती संतजना । इतर मायिक जना । नेणवती ॥५॥२०.कृत त्रेता द्वापार कली । ऐसा चौ युगांचा मेळीं । तें महायुग शब्द आढळी । वेदांत शास्त्रीं ॥१॥ऐसा ब्रह्मयाचा दिनां-तर । तैसीच रात्र एक सहस्त्र । तिसा दिवसांचा प्रखर । एक मास ॥२॥ऐसे बारा मास । त्याचें एक वरुष । शतभरी आयुष्य । ब्रह्म-याचें ॥३॥ऐसा ब्रह्मयाचा दिनांत । शत वरुषें गणीत । ज्या प्र-ळयीं पोहत । मार्कंडेय उदकीं ॥४॥ऐसीं अठ्ठावीस युगें जाण । पंढरपुरासी झालीं पूर्ण । जो कीं ब्रह्मयाचा दिन । प्रळय केला ॥५॥नामा ह्मणे पंढरिची संख्या । सांगितली संत महंत लोकां । लक्षूनि पादुका । विठोबाच्या ॥६॥ N/A References : N/A Last Updated : April 23, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP