मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|स्फुट श्लोक| श्लोक ३१ ते ३५ स्फुट श्लोक श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १७ श्लोक १८ ते २० श्लोक १९ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ भागवत १ भागवत २ भागवत ३ अंजनीसुत स्फुट श्लोक - श्लोक ३१ ते ३५ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthashlokरामदासश्लोकसमर्थ श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर ३१तनास भेटलीं तनें । मनास चुकली मनें । चुकी चुकी बहु चुकी । परस्परें चुकामुकी ॥१॥मढयास भेटलें मढें । करील काय बापुडें । मनें मनाचिया खुणा । बुझेल लोभ त्या दुणा ॥२॥उगेंचि वेचलें वये । मनास भेटतां नये । मनें मनास राखणें । सुखें सुखास चाखणें ॥३॥न संगतांच जाणणें । खुणेसि खुण बाणणें । प्रसंग मान पुरतें । कदापि तें नव्हे रितें ॥४॥विकल्प दुरी तों कळे । अखंड न्याय नीवळे । प्रमाण खुण जाणतो । नव्हे चि अप्रमाण तो ॥५॥प्रसंग धारणा धरे । मनें मनांत वीवरे । कदा भरीं भरेचिना । महत्त्व तें सरेचिना ॥६॥क्षमा बहुत साहाणें । आढया तिढयांत राहाणे । जनामधें विटेचिना । बरेपणें तुटेचिना ॥७॥भरीं भरेल दुसरें । जना कळेल तें खरें । भलचि तो भला भला । बहु जनास मानला ॥८॥खरें चि तें सदा खरें । बरें चि तें बहु बरें । समस्त लोक जाणती । भले प्रमाण बाणती ॥९॥प्रमाण तो भला भला । बहु जनांत शोभला । भले चि मानिती तया । विमूढ जाय वीलया ॥१०॥बहु जनांत सीकती । तया गुणें चि वीकती । परंतु सीकतां नये । तयास लावणें नये ॥११॥परांतरास राखणें । आचुक सुख चाखणें । परंतु संग तो मिळे । तरी जनास नीवळे ॥१२॥३२अंतरींच सावधान । उत्तरीं अवेवधान । सांवरी प्रसंगमान । यावरी विधी विधान ॥१॥प्रयत्न पुरता करी । सदा विचार वीवरी । चतुर तो परोपरीं । तया सरी मनोहरी ॥२॥३२विवीध वर्म लोचनीं । कदा नसो वसे जनीं । दु:खास लागतां ढकां । पुरे पुरे नका नका ॥१॥बहु प्रकार बोलणें । बहु प्रकार चालणें । मनास लागतां ढका । पुरे पुरे नका नका ॥२॥परांतरास राखणें । समस्त मुख चाखणें । कदापि अंतरा पडे । परीच सख्य वीघडे ॥३॥गुणी मिळले पुरता । वदेल मौन्य देवता । तयापरी परांतरें । चुकोन राहाती खरें ॥४॥प्रवीण जे माहां भले । भले भले चि गुंतले । कवीस बोबडी वळे । पाहा चतुर चावळे ॥५॥तनें झिजेल त्या मनें । मनें झिजेल त्या तनें । तनें मनें विशेषता । झिजेल तोचि पुरता ॥१॥मनें प्रसंग वीवरी । तनें प्रसंग जो करी । तनें मनें चुकेचिना । तया उणीव येचिना ॥२॥मनें बहुत चंचळें । विशेष गुण आडळे । प्रचीत मानली मना । तरीच आवडे जना ॥३॥रुपें विशेषता दिसे । परंतु गुण तों नसे । तयास मानितीलसे । सुभा समस्त वीलसे ॥४॥पडेल पाभळें बळें । गुणीस मोल आगळें । तगेल रंग तो खरा । बरें चतुर वीवरा ॥५॥रुपें रसाळ तो गुणी । तयास आवडी दुणी । रुपें गुणें विशेषता । करील तोचि पुरता ॥६॥विशेष वेष साजिरा । उदंड गुण तो बरा । प्रचीतिनें खराखरा । चढेल कोण दुसरा ॥७॥उदास दास तो धरी । परोपरीं क्तिया करी । गुणें गुणी गुणाथिला । भला भला भला भला ॥८॥प्रताप सूर्यसा तपे । तयास कोण रे जपे । अनंत गुण उत्तमा । कदा कळेचिना सिमा ॥९॥करील न्याहाल सेवका । समर्थ वीसरों नका । विशेष हा रघोत्तमु । भजेल उत्तमोत्तमु ॥१०॥३५चकोर चातकें दुखी । चतुर ही बहु दुखी । मना मना मिळेचिना । विशेष तें कळेचिना ॥१॥गुणाविषीं भला भला । परंतु हंस येकला । विशेष तो कळेचिना । विहंगमीं मिळेचिना ॥२॥गुणी गुणास जाणती । गुणी खुणेसि बाणती । उगाचि लोक आडळे । गुणी विशेष नाडळे ॥३॥गुणासि गुणग्राहिकें । न मीळतां दिसे फिकें । विशेष वस्तु केंढली । सुवस्तिही नव्हे भली ॥४॥विशेष पेंठ पाहाणें । तयेमधें चि राहाणें । तरीच सुख पाविजे । अनंत गुण भाविजे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : April 02, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP