मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|स्फुट श्लोक| श्लोक ११ ते १५ स्फुट श्लोक श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १७ श्लोक १८ ते २० श्लोक १९ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ भागवत १ भागवत २ भागवत ३ अंजनीसुत स्फुट श्लोक - श्लोक ११ ते १५ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthashlokरामदासश्लोकसमर्थ श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर ११श्री राम राम राम रे । समर्थ योगधाम रे । दयाल तो दया करी । कवी जनासि वीवरी ॥१॥कदापि जें घडेचिना । जनासि सांपडेचिना । करी तयापुढें दया । अपाय जाय वीलया ॥२॥धनुष्यबाणधारकु । हरी जनासि तारकु । प्रचंड ध्यान तें धरा । मनांतरींच वीबरा ॥३॥अखंड पार्वतीपति । रघोत्तमासि चिंतिती । प्रचीत बाणली मना । उपाय सूचला जना ॥४॥जसा तसाचि काळ हो । मनीं धरा दयाळ हो । तुम्हांसि तो दया करु । अनन्य भाव वीवरु ॥५॥१२महंत हो नका नका । बहुत वैभवें धका । उदास दास तापसी । फिरे लिळा जसी तसी ॥१॥विचार सार वीवरु । नव्हे विवेकु रुबरु । नरु नव्हे खरा खरु । किती सिणेल पामरु ॥२॥प्रसंग हा तडतडी । करा विवेक तांतडी । सुचीत व्हा घडी घडी । प्रबोध घ्या खडाखडी ॥३॥पाहा पाहा बरें बरें । करील देव तें खरें । अहंमती अनावरें । विवेकहीण पामरें ॥४॥करील तो करील रे । तुम्हांसि काय बोल रे । उरों नका म्हणे कवी । उदास दास सीकवी ॥५॥१३अनंत हेत अंतरीं । उकावती मनांतरीं । अहेत हेत तो बरा । विचार सारसा धरा ॥१॥कळेचिना कसें करुं । विशेष काय तें धरुं । अशेष तें विशेष रे । उरों नये चि लेश रे ॥२॥विवेक पाहातां मुरे । विवंचितां नुरे नुरे । नुरेल तो उरेल रे । उरेल तो नुरेल रे ॥३॥बहुत मेळ मात्रुका । विचार पाहातां फिका । असेल तो नसेल रे । नसेल तो असेल रे ॥४॥अनन्यया नव्हे नव्हे । नव्हेचि तो नव्हे नव्हे । चढेचिना पढेचिना । घडेचिना दडेचिना ॥५॥१४भुतें भुतासि भाविती । भुतें भुतासि दाविती । भुतें भता विवंचिती । भुतें भुतासि विछिती ॥१॥भुतासि भावितां लये । अनंत भावितां नये । भुतें भुतांसि जाणती । भुतें खुणेसि बाणती ॥२॥भुतें समस्त वोळखा । उगाच संशयो नका । भुतें करूनि वावरे । पुढें कसा उपाव रे ॥३॥भुतें चि अंतवंत रे । भुतें असंत संत रे । भुतांत शब्द तीतुका । भुतें चि हो नका नका ॥४॥समस्त बोलती खरें । परंतु सार वीवरे । अनन्य भाव तो कसा । प्रचीतिनें जसा तसा ॥५॥१५अनेक साधना करुं । अनेक धारणा धरुं । उरेल जीवभाव तो । नुरेक देव तो चि तो ॥१॥करील सर्व मीपणें । धरील तें दुजेपणें । उपाय रे भला भला । परंतु हेत चूकला ॥२॥चूकोनियां चुका पडे । घडोन भक्त वीघडे । अनन्य हो अनन्य हो । अनन्य होत धन्य हो ॥३॥अनन्यता नसे तुला । तरीच देव चूकला । विभक्त भक्त तुं कसा । अहंपणें जसा तसा ॥४॥कळोन ही कळेचिना । वलोन ही वळेचिना । कसें करूं कसें करूं । मनें मनासि वीवरूं ॥५॥विवंचना घडी घडी । विचार कोण नीवडी । विवेक पूरता असे । तयास सर्व वीलसे ॥६॥गुणें गुणासि खंडिजे । मनें मनासिं दंडिजे । नव्हेचि अंतवंत रे । अनंत तो अनंत रे ॥७॥न बोलतांचि जाणता । खुणे खुणेसि बाणता । मिळेल कोण तो गुणी । कळेचिना क्षणी क्षणी ॥८॥उगा उगा उगाचि रे । नव्हेचि वाउगाचि रे । नका नका वदों नका । विवेक होतसे फिका ॥९॥अनन्य भावितां धुरे । नुरोनि दास उधरे । नसोन पावला खुणा । म्हणाल तें सुखें म्हणा ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : April 02, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP