मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|स्फुट श्लोक| श्लोक ५ स्फुट श्लोक श्लोक १ ते २ श्लोक ३ ते ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते १७ श्लोक १८ ते २० श्लोक १९ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ श्लोक ४४ ते ४६ श्लोक ४७ ते ५० श्लोक ५१ ते ५३ श्लोक ५४ ते ५७ श्लोक ५८ भागवत १ भागवत २ भागवत ३ अंजनीसुत स्फुट श्लोक - श्लोक ५ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthashlokरामदासश्लोकसमर्थ श्लोक ५ Translation - भाषांतर ५विधीभुगोळ पाहिला । कवी रिझोनि राहिला ।अनंत लाघवी भला । बहुत खेळ खेळला ॥१॥कविप्रबंद साजिरे । मधुर शब्द गोजिरे ।सगुण तो मनीं धरा । अनंत गण वीवरा ॥२॥कळोन ना कळे मना । गळीत देहभावना ।लळीत होतसे जना । मिळोनि जा निरंजना ॥३॥अनंत संत शोधितां । सतंत संत बोधितां ।अभेद भक्त नाडळे । विचार पाहातां कळे ॥४॥पाहाल आपअपणा । राहाल जीविच्या खुणा ।निसंग तो मनीं धरे । तरीच जन्म वोसरे ॥५॥नसोन दास देखिला । जिवांत राम रेखिला ।नुरेल तो भला भला । अलप्त होय दादुला ॥६॥मही किकाल पावकु । प्रभंजनु उपावकु ।नभास भास नाडळे । भुतांस वास तो कळे ॥७॥तुटे फुटेल तें नव्हे । रचे खचेल तें नव्हे ।नसे वसेल तें नव्हे । असे दिसेल तें नव्हे ॥८॥उदास अंतराळसें । उदंड साळमाळसें ।गुणारहीत टाळसें । दुजें नसे विटाळसें ॥९॥गुणी गुणास नाडळे । भुतीं भुतांस नातळे ।अतर्क्य तें कसें कळे । निरूपणेंचि नीवळे ॥१०॥भले भले मधें पडा । असार सार नीवडा ।चळेचिना ढळेचिना । कळेचिना टळेचिना ॥११॥चहाय हाय हाय रे । उदास हा उपाय रे ।आहा जना आहा जना । पुसाचिना माहाजना ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : April 02, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP