सप्तम स्कंध - अध्याय अकरावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । नृपम्हणेव्यासाप्रती । हिमाचळींतेभगवती । केवींप्रगटलीपार्वती । सर्वसांगासविस्तर ॥१॥

व्यासम्हणेभारता । दग्धहोतांदक्षस्रुता । शिवदेशोदेशींभ्रमता । भ्रांतझालाअतिशयें ॥२॥

चित्तझालेंउदास । बैसलातेव्हांतपास । तेवेळीदैत्यास । बळ अपारवाढलें ॥३॥

बळीझालातारकासूर । मृत्युत्यासीशिवकुमर । स्त्रीविरहितशंकर । केवीपुत्रप्रगटावा ॥४॥

दैत्यतेव्हांमाजले । देवसर्वपळविले । तारकेंइंद्रासनघेतलें । देवझालेदेशोधडी ॥५॥

देवऋषींचिंताक्रांत । विष्णुपदेशेंतेंत्वरित । सर्व आलेहिमाद्रिप्रत । तपघोर आरंभिले ॥६॥

देवीबीजजपकरिती । कोणीदेवीशीपूजिती । कोणीहोमातेकरिती । कोणीकरितीध्यानयोग ॥७॥

चैत्रमासीनवमीदिनी । तेजेंउत्कटफांकेमेदिनी । कोटिसूर्यप्रभापूर्णीं । कोटिचंद्रशीतलते ॥८॥

चारवेदचौदशी । मूर्तिमंतशोभाविलसी । अंतनसेतेजासी । नापुंनपूसकस्त्रीपण ॥९॥

नावाकडेनाहींउंच । नारुंदनाहींनीच । आदिमध्यनसेकांहींच । अनंततेज उदेले ॥१०॥

एकदादेवीपाहिले । नेत्रसर्वांचेदिपले । आपोआपनेत्रझांकले । नुघडितीउघडतां ॥११॥

धैर्यकरुनीउघडिले । दिव्यस्त्रीरुपपाहिले । अतीरमणशोभलें । नवयौवनकौमार्य ॥१२॥

मुकुलकमलशोभन । पीनोनतदोनीस्तन । मेखलामंजीरस्वन । मधुर उमटेचालतां ॥१३॥

अनेकभूषणेंशोभती । लावण्याचीपूर्णज्योति । केतकीपत्राचिकांती । लाजावलीतनुपुढें ॥१४॥

केशवाकडेतैसेनिळे । भ्रमराचेरुंजतीपाळें । आर्कणातदिव्यडोळे । रक्तपद्मेंफुललींकीं ॥१५॥

अष्टमीचेचंद्रापरी । भालभासेदिव्यमुकुरी । भ्रूलताधनुष्यापरी । कर्णांतशोभतीवाकडया ॥१६॥

कुंदकळयाचीकांती । शोभेतैसीरदपक्ती । अनेकहाररत्नज्योती । कंठामाजीशोभले ॥१७॥

मुकुटमाथारत्नाचा । आलोकशोभेपुष्पाचा । तिलककेलाकस्तुरीचा । शशचिन्हमुखचंद्रा ॥१८॥

पाश अंकुश अभयवर । चतुर्बाहूमनोहर । नेत्रत्रयसुंदर । रक्तवस्त्रनेसली ॥१९॥

सर्वशृंगारमराळी । सर्वसौंदर्याचिकळी । सर्वजननीसर्वपाळी । सर्वहारिणीपरांबा ॥२०॥

सर्व आशेचिपुरिणी । सर्वदुःखनिवारिणी । देखिलींदेवीप्रसन्नपणीं । माताआपुलीवत्सला ॥२१॥

चैत्रशुक्लनवमीनिशीं । शुक्रवारहोतातेदिवशीं । तोयोग आजचेदिवशी । सहजपातलाकृपेनें ॥२२॥

देवासीहोतांदर्शन । सुखसागरींझालेमीन । रुद्धकंठबाष्पनयन । धणीनपुरेपाहतां ॥२३॥

जेवींहोतांतृषाक्रांत । मुखींओतिलेंअमृत । अथवाबुडतांडोहांत । हातधरिलायेउनी ॥२४॥

क्षुधेनेंकेलाव्याकुळ । तोमुखींदिधलाकवळ । तैसीअंबाकृपाळ । अवलोकिलीसुरानी ॥२५॥

प्रदक्षिणानमस्कार । करितांतिवारंवार । बोलवेनापरीधीर । करुनिस्तव आरंभिला ॥२६॥

जयदेवीक्रीडापरे । जयजननीमोहदूरे । जय अंबेआशापूरे । भक्तरक्षकेनमोस्तु ॥२७॥

जयकल्याणशैलवासे । जयकोटिचंद्राभासे । जयप्रकृतिचिद्विलासे । भद्रदायिकेनमोस्तु ॥२८॥

जयपावकदीप्तिधरे । जयज्ञानदीपभास्वरे । जयरविप्रभाकरे । विप्रपूज्येंनमोस्तु ॥२९॥

जययोगसाधनदुर्गे । जयदुःपारतवभर्गे । जयध्वर्गापवर्गे । उग्रमूर्तेनमोस्तु ॥३०॥

जयसंसारतारिणी । जयसुखवितरणी । जयभवापहारिणी । शरणप्रदेनमोस्तु ॥३१॥

जयवन्हिबीजधरे । जयतुरीयस्वरे । जयऊष्मांत्यक्षरे । बिंदुरुपेनमोस्तु ॥३२॥

जयदशप्राणजननी । जयवग्विलासिनी । जयचतुर्धारुपिणी । वैखरीरुपेनमोस्तु ॥३३॥

जयमातेविश्वरुपिणी । जयमातेपृथग्रुपिणी । जयमातेआत्मरुपिणी । समष्टिरुपेनमोस्तु ॥३४॥

जयव्यवहारसिद्धी । जयमानसांतरबुद्धी । जयसर्वसमृद्धी । कामदुघेनमोस्तु ॥३५॥

जयभक्तकल्पद्रुमे । जयभक्तरक्षिणीरमे । जययशवर्धिनीउमे । महागिरेनमोस्तु ॥३६॥

जयमहाकालकाली । जयकोशांतख्याली । जयदेवीमुंडमाली । भद्रकालीनमोस्तु ॥३७॥

जयदेवीब्रम्हनृते । जयदेवीविष्णुस्तुते । जयदेवीस्कंदमाते । त्रिगुणरुपेनमोस्तु ॥३८॥

जय अदितिइंद्रमाते । जयसतीदक्षदुहिते । जयशिवेसर्वहिते । शिवसहितेनमोस्तु ॥३९॥

जयदेवीसर्वलक्षणे । जयसर्वविलक्षणे । जयलक्ष्मीसर्वपोषणे । ध्यानयोग्येनमोस्तु ॥४०॥

जयदेवीप्रेरके । जयज्ञानदायके । जयध्यानविधायके । देवीतुजनमोस्तु ॥४१॥

जयदेवीविराटरुपे । जयविश्वसूत्ररुपे । जय अविनाशस्वरुपे । ब्रम्हमूर्तिनमोस्तु ॥४२॥

जयअज्ञानविधायिनी । जयरज्जुसर्पदर्शनी । जयमोहविनाशिनी । ज्ञानप्रदेनमोस्तु ॥४३॥

जयदेवीभुवनेश्वरी । जयतत्पदलक्षसुंदरी । जयचित्कलेरसभरी । अखंडरुपेनमोस्तु ॥४४॥

जयवेदतत्वभूमिके । जयकोशातिरेके । त्वंपदलक्ष्येनमोस्तु ॥४५॥

जयप्रत्यगात्मनिलये । जयप्रणवमूर्तये । जयदेवीमायामये । मंत्रात्मिकेनमोस्तु ॥४६॥

जय अव्याजकरुणें । जयदेवीज्ञानतरुणे । जय अज्ञानतमारुणे । ह्रत्कलेशीनमोस्तु ॥४७॥

व्यासम्हणेनृपती । एवंऐकूनीदेवस्तुती । मधुरवाचातयांप्रती । इच्छितमागाम्हणतसे ॥४८॥

देवम्हणतीसर्वजाणसी । तारकेपीडिलेआम्हांसी । मृत्युनसेचितयासी । शिवपुत्रावांचूनिया ॥४९॥

शिवासिनाहींकामिनी । सुतकेवींव्हावाजननी । सर्वज्ञतूंजाणूनमनी । सुयुक्तकीजेपरांबे ॥५०॥

भक्तीदृढतवचरणी । हीच असेमुख्यमागणी । इतरसर्वदेहगुणी । आत्मार्थएकतवसेवा ॥५१॥

देवीवदेतेअवसरी । जीशक्तीमाझीगौरी । येईलहिमाद्रीचेउदरी । तोहीअसेममभक्त ॥५२॥

तीशिवासीदेईजे । कार्यहोईलसहजे । दृढभक्तीमाझीनिजे । प्राप्त असोतूम्हांशी ॥५३॥

व्यासम्हणेभारता । पर्वतेंऐसेऐकतां । येउनित्वरेनमीमाता । सदगदझालासप्रेम ॥५४॥

म्हणेआईकृपाकरिशी । तयास्वयेथोरकरिशी । नातरीमीजडकायशी । सचिद्रूपिणीतूंकोठें ॥५५॥

जन्मजरीझालेलक्ष । तरीजेंसदाअलक्ष । अश्वमेधादिकर्मदक्ष । समाधियोगेंदुर्मिळजे ॥५६॥

अनंतब्रम्हांडेंउदरीं । जीच्यातीममजठरी । आलीसातांभाग्यझरी । कायवर्णूपरांबे ॥५७॥

धन्यझालोंतिहीलोकीं । उद्धरिले एकांएकी । वेदांतसिद्ध अलौकिकी । रुपसांग आपुलें ॥५८॥

योगसांगभक्तियुत । ज्ञानोपदेशश्रुतिगुप्त । करीआतांमजप्रत । जेणेंतूंचिमीहोईन ॥५९॥

व्यासम्हणेवाक्य ऐकून । वर्षलींअंबाकृपाघन । जेंवेदाचेगुप्तधन । उदारत्वेंसमर्पिलें ॥६०॥

ऐकासर्वनिर्जर । सांगतेजेंवेदसार । ऐकतांचितेंसाचार । ममरुपेहोतसे ॥६१॥

ऐक आतांनगेश्वरा । जेनव्हताहापसारा । पृथ्व्याप्तेजव्योमवारा । एकमीचतेव्हांअसे ॥६२॥

आत्मरुपचित्संवित । परब्रम्हनामहोत । तर्कतेथेंनचालत । दाखवितांनातुडेतें ॥६३॥

नतेंकोणाचेनायक । नतेंकोणाचेसेवक । सतानसेनसाक्षिक । अंतपारनसेतया ॥६४॥

आदिमध्यकिंवाअंत । कांहींतेथेंनभासत । स्त्रीपुन्नपूंसकातीत । गुणागुणनम्हणवे ॥६५॥

शुक्लरक्तकृष्णपीत । कर्बुरनीलकिंचित । नभासेरुपतेथ । क्षाराम्लतिक्तनमिष्ट ॥६६॥

उष्णसीतसुखस्पर्श । नचलेंतेथेंविमर्श । उंचर्‍हस्वदीर्घशेष । शून्यहीतेंनम्हनवें ॥६७॥

एवंरुपाचाप्रकार । जाणमाझासाचार । अनुपम्यनिर्विकार । देहादिकतेथेंकैचें ॥६८॥

एवंमाझेरुपजाण । तेंजगताचेकारण । तेंबोलिलेनिर्गुण । कारणकेवींतेंऐक ॥६९॥

त्यामाझेंस्वरुपाची । स्वतःसिद्धाशक्तिसाची । अजाअव्ययाअवाची । एक असेंहिमालया ॥७०॥

मायाऐसेंनामतीस । कळेपाहतांश्रुतीस । नाकळतीइतरास । उच्चारितानयेची ॥७१॥

तीमायाआहेकैसी । ऐकसांगतेंतुजसी । अवस्थादिकाळतीसी । नबाधतीकदकाळ ॥७२॥

जरीम्हणोतीससती । तत्वामाजीनभासेती । तत्वरुपतिचापती । परीतेथेंदिसेना ॥७३॥

जरीम्हणावीअसती । तीमाजीभासेपती । साक्षित्वेंकार्यसंपती । सदासाधीतयाच्या ॥७४॥

गुणेकरुनीनमळें । गुणावांचूनिनातळें । ज्ञानहोतांचिवितळे । परीज्ञानतिचेंचजाण ॥७५॥

तस्मातुतेनाहींसती । अथवानाहींअसती । उभयदूराहिज्योती । विलक्षणवस्तुती ॥७६॥

सतीम्हणजेतीसत्य । असतीम्हणजेअसत्य । नानित्यनाअनित्य । मायारुपवेगळे ॥७७॥

जरीनसतेंअनित्य । केवींकळतेंतेनित्य । अथवानसतेंनित्य । अनित्यकेवींसंभवें ॥७८॥

लाहनावांचूनिथोर । सावावांचोनिचोर । थोडयावांचोनिफार । कळेकेवींपर्वता ॥७९॥

तमावांचूनिउजेड । रुपावांचूनीजड । धरेवांचूनिझाड । केवींयेईप्रत्यया ॥८०॥

सत्य आणि असत्य । परस्परेंतेंभासत । दोघांचेंजेंमध्यगत । मायारुपवेगळें ॥८१॥

जडाचेंतीकारण । तिचेतेंकारण । अनुपम्यरुपजाण । धराधरासुस्थिरा ॥८२॥

उष्णतेवीणपावक । रश्मीवीणजेवींअर्क । ज्योत्स्नेवीणशशांक । मायेवीणब्रम्हतें ॥८३॥

जेव्हांतेंमायेरहित । तेव्हांतेंसर्वांतीत । ऐशात्याममरुपांत । सहजशक्तीतीमाया ॥८४॥

उष्णतेसीपाहतां । अग्नीचदिसेंतत्वता । अग्नीवांचून उष्णता । वेगळीकदांनराहे ॥८५॥

तेवीत्यावांचूनमाया । दूरनोहेहिमालया । तत्वानुभवीतीमाया । लीनहोयतत्वांत ॥८६॥

ऐसीजीसहजशक्ति । मद्रुपामाजीस्थिती । बीजरुपाचीव्यावृत्ती । मजलागीतीमुळें ॥८७॥

सूर्यानसेदीधिती । प्रकाशनोहेंजगतीं । कर्त्रींजरीतीकांती । प्रकाशम्हणतीरवीचा ॥८८॥

तेवींमीकांहीनकरी । मायाप्रपंचशेजारी । आरोपितीमजवरी । आश्रयपणेंतियेच्या ॥८९॥

तीमाजीकर्मेसारी । जीवमात्राचीनिर्धारी । कालजीवभावभारी । ऊदभव आणिलीनता ॥९०॥

जेवींअसतांजागृतीं । कर्मेसर्वचालती । सुषुप्तीलीनहोती । तेवींसर्वमायेत ॥९१॥

माझातियेस आधार । चैतन्यरुपेंसुंदर । तेणेंदोषमजवर । कर्तृत्वाचायेतसे ॥९२॥

परीतत्वज्ञाननिर्मळ । तेथेंमीचकेवळ । मायेचेंनचलेबळ । मजपुढेंहिमाद्रे ॥९३॥

माझाव्हावाअनुभव । मायेचीकरीजाणिव । सर्वश्रुतीचाहाभाव । स्पष्टपणीओळखे ॥९४॥

मायेचेंचनांवज्ञान । तममायाअभिधान । तमजडप्रधान । वेदम्हणतीतियेशी ॥९५॥

सर्वहेसंकल्पक । म्हणोनिझालेमायिक । निर्विकल्पमीएक । सर्वातीतविराजे ॥९६॥

मायातीहोयदृश्य । अविद्याआणिविमर्श । जडचीसदाजेंदृश्य । मिथ्यापणयाकरितां ॥९७॥

अदृश्यतेंचैतन्य । कारणनसेत्याअन्य । तेंचिसर्वांचेंकारण । स्वप्रकाश अविनाश ॥९८॥

तेंअसेअपरिच्छिंन । म्हणजेतेंसनातन । तेंचितेंमुख्यज्ञान । चैतन्यरुपमाझेजें ॥९९॥

ज्ञाननोहेआत्मधर्म । ज्ञाननोहेआत्मकर्म । ज्ञानतोचिआत्माराम । अन्यहोताजडत्वये ॥१००॥

ज्ञानासिकैचेंजडत्व । कैचैंतेथेंभूतत्व । नसेंतेथेंधर्मत्व । चिद्रूपभिन्ननसेंतें ॥१०१॥

जोआत्मातेंचिज्ञान । तोचिसुखतोचिभान । असंगसत्यतोपूर्ण । द्वैत उरींउरेना ॥१०२॥

तोचिआत्मामायायोगें । कामकर्म अनुरागे । पूर्वकर्मपाकवेगें । इच्छावानतोचिहोय ॥१०३॥

तत्वविचारराहिला । तोचिआत्मागुंतला । जैसापुरुषनिजेला । जागेजेवीकर्मबळें ॥१०४॥

तैसाच आत्माईश्वर । लयत्ययाचीनिद्राथोर । जागृतीसर्ग अपार । पूर्वानुभवहोतसे ॥१०५॥

जागृतींव्हायाकारण । बुद्धिनलगेबोधन । पूर्वकर्मजेंगहन । आत्म्यालागीजागवी ॥१०६॥

अबुद्धीपूर्वहासर्ग । सांगीतलासृष्टीमार्ग । मुख्यरुपमाझेंसांग । सांगितलेपर्वता ॥१०७॥

इच्छाक्रियाआणिज्ञान । सच्चिदानंदघन । मायाबीजमुख्यस्थान । आदितत्वतेंचिहें ॥१०८॥

तयापासावगगन । शब्दतयाचागुण । स्पर्शात्मकत्यापासून । समीरणजाहला ॥१०९॥

त्यापासूनरुपात्मक । प्रगटहोयपावक । त्यांतूनतेंरसात्मक । जलप्रगटहोतसे ॥११०॥

गंधात्मकझालीधरा । शब्दस्पर्शतसमीरा । तीनगुणवैश्वानरा । जलीचारधरापांच ॥१११॥

एवंझालेपंचदश । मिश्रझाले एकदेश । महसूत्रनिःशेष । प्रगटझालेतेथोनी ॥११२॥

लिंगदेहतोचिझाला । सूक्ष्ममदेहम्हणविला । आत्मातेथेंराहिला । व्यष्टीरुपेकरुनिया ॥११३॥

कारणदेह अदृश्य । पूर्वींवर्णिलेसादृश्य । जगताचाजेथेंभास । लिंगदेहजेथूनी ॥११४॥

आतांऐकेपंचीकरण । विराटाचेलक्षण । पांचाचेभागदोन । करावेजाणहिमाद्रे ॥११५॥

अर्धभागदूरकीजे । पांचभाग उरलेजे । एकेकासीचारकीजे । पूर्वार्धत्यांतयोजावा ॥११६॥

यानांवपंचीकरण । परस्पराचेंसंमेलन । अर्धभाग एक असून । अष्टमांशसर्वांचा ॥११७॥

एवंहेपंचवीस । विराटम्हणतीयास । स्थूलदेह आत्म्यास । निर्माणहोयमिश्रणे ॥११८॥

हीचभूतेंसत्वांश । करितींश्रोत्रादिकास । श्रोत्रचक्षुनासिकेच । रसनात्वचापांचवी ॥११९॥

एकहोय अंतःकर्ण । वृत्तिभेदेंचारजाण । संकल्पविकल्पखूण । तेचिमनम्हणविले ॥१२०॥

संशयनसेउरला । वृत्तिनिश्चयपावला । बुद्धीनामत्यावृत्तीला । प्राप्तझालेपृथकत्वे ॥१२१॥

आत्म्याचेअनुसंधान । अथवाकार्याचेंध्यान । वृत्तीहोयतेभान । चितम्हणतीतयासी ॥१२२॥

वृत्तीझालीअहंमती । अहंकारतयाम्हणती । सततैशीअसद्‍ वृत्ती । पूर्वानुरागेघटतसे ॥१२३॥

तींचपांचरजोमय । त्यापासावकर्मेंद्रिय । जिव्हामेंढ्रहस्तपाय । गुदजाणपांचवें ॥१२४॥

पांचरुपेंमारुत । रजोगुणेंस्थूलीस्थित । प्राणराहेह्रदयांत । गुदेमाजीअपानतो ॥१२५॥

सर्वदेहींफिरेव्यान । कंठामाजीतो उदान । नाभिस्थानीसमान । व्यापारार्थवसतसे ॥१२६॥

पांच इंद्रियेंज्ञानाची । पांच असतीकर्माची । मिळणीपांचप्राणाची । बुद्धीमनसत्रावें ॥१२७॥

यानांवसूक्ष्मशरीर । माझेंचहेंमनोहर । लिंगदेहसुंदर । म्हणतीयासीप्राज्ञसे ॥१२८॥

याठिकाणीजीप्रकृति । दोनरुपेंतीसहोती । मायाअविद्याम्हणती । गुणाआणिगुणमिश्रा ॥१२९॥

केवळजीसत्वगुणा । विद्यामायातीचिजाणा । तमादिमिश्रितगुणा । अविद्यातिबोधिजे ॥१३०॥

स्वात्माचजीस आश्रय । मायातीचिनिरामय । तिचेठाईंज्योतिर्मय । प्रतिबिंबपडेंमाझें ॥१३१॥

तोचिझालाईश्वर । सदाश्रयज्ञानपर । सर्वज्ञतेंनेंसर्वकर । निग्रहानुग्रहीअसे ॥१३२॥

प्रतिबिंब अविद्येंत । पडेंतोजीवहोत । सर्वदातोदुःखाश्रित । स्वाश्रयनसेतयासी ॥१३३॥

दोघांसहीदेहत्रय । अविद्येनेंप्राप्तहोय । अभिमानानेंनामत्रय । प्राप्त असेतयाशीं ॥१३४॥

कारणदेहाभिमान । नामपावेतेणेंप्राज्ञ । सूक्ष्माचाकेलामान । तैजसनामपावला ॥१३५॥

अभिमानस्थूलीधरी । विश्वनामपावेतरी । विश्वपुन्हात्रिधापरी । जीवईश्वरबोलिली ॥१३६॥

विश्वव्यष्टिसमष्टी । पथ्क्‍ देहजेव्यष्टि । तदभिमानीतोव्यष्टी । समष्टीविराटबोलिले ॥१३७॥

आत्मातोचईश्वर । तोचविराटसर्वेश्वर । जीवानुग्रहकर । नानाभोगरचीतसे ॥१३८॥

तोहीमीचप्रेरिला । शक्तियोगेबळावला । सर्गशरीरकथिला । हिमाचलातुजलागीं ॥१३९॥

एकशतचोवीस । देवीगीताश्लोकास । शोभविलेस्वभाषेस । परांबेनेंआपुल्या ॥१४०॥

देवीविजयेसत्पमेएकादः ॥११॥


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP