मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|सप्तम स्कंध| अध्याय आठवा सप्तम स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा सप्तम स्कंध - अध्याय आठवा श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय आठवा Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । जेवीबोलिजेबोल । तेवींचालिजेचाल । जन्मत्याचेचिसफल । कृतकृत्यतोचिपै ॥१॥याचेंपहाउदाहरण । कपटेंकेलेंवचन । परीनटाकिलेंवचन । हरिश्चंद्रनृपवरें ॥२॥शौनकम्हणेसूता । पुढेंकैसीजाहलीवार्ता । चांडाळघरीदासता । केवींकेलीधन्यतम ॥३॥सूतम्हणेगेलामुनी । चांडाळेंनृपाबांधुनी । म्हणेखोटयापापखाणी । पळसीलएखादा ॥४॥दंडेमारीतसेपाठीं । ओढीतनेलाअतिनेटी । उपोषित अनशपोटी । नाहींजयाच्याबहुकाळ ॥५॥ज्याचीहोतांक्रोधदृष्टी । भयथरारेंसर्वसृष्ठी । तोदैवेंचांडाळयष्टी । सहनकरीमारितां ॥६॥स्त्रीपुत्राचावियोग । भ्रांतचित्तभोगीभागे । प्रवीरेंनेलासवंग । गृहांमाजीआपुल्या ॥७॥दृढकरोनीबंधन । आंतठेविलाकोंडून । स्वयेंकेलेंसुखेंशयन । नृपमग्नचिंतार्णवी ॥८॥हाप्रियेतारामती । मजदुष्टापावूनपती । दासीझालीसराजयुवती । धिक्कार असोयाजन्मा ॥९॥हाबाळासकुमारा । कोठेआहेसप्रियकरा । आतांमजपाप्यानरा । भेटकैचीयाजन्मीं ॥१०॥इष्टसुह्रदबंधुजन । सर्वांअंतरलोंआपण । मिळालेचांडाळपक्वण । बैसावयाजन्मवरी ॥११॥कैंचेंसुखकैचेंशयन । जळकैचेंकैचेंअन्न । दैवेंकेलेंपराधीन । श्वपाकाच्यामजलागी ॥१२॥सुकुमारतीराजबाळी । दासीत्वकेवीसांभाळी । जिणेस्वहस्तेंकदाकाळीं । कांहींकार्यनकेलें ॥१३॥शतावधीजिच्यादासी । सांभाळितीआज्ञेशी । तीप्रियाविप्रगृहांसी । केवींकाळकंठीतसे ॥१४॥ सुकुमारमाझाबाळ । केवींदुःखातेंसोसेल । तहानभूकसांभाळील । कोणत्याचीदास्यत्वीं ॥१५॥म्यापूर्वींकाय ऐसें । पापकेलेंबहुवसें । तेणेंएवंसायासें । प्राप्तझालेंकळेना ॥१६॥तेथेंचितारामती । स्मरत असेलमजप्रती । अनृणहोऊनममपती । मेळवीलबहुधनें ॥१७॥आतांमजसोडवील । एवंसदातीचिंतील । परीमीजाहलोंचांडाळ । तिजलागीनकळेहे ॥१८॥व्यासम्हणेभारता । नृपकरीएवंचिंता । पंचमदिवस उगवतां । चंडाळतयासोडिले ॥१९॥म्हणेअधमाधमदासा । निर्लज्जाखळाउदासा । चिंतिशीकायमानसा । सेवनमाझेंकरीकीं ॥२०॥काशीचेदक्षिणभागी । गंगातीरींस्मशानजागीं । तेथेवसावेनिजांगीं । प्रेतवस्त्ररक्षावीं ॥२१॥मोठेंआहेतेंस्मशान । न्यायेंकरावेंरक्षण । प्रेतवस्त्रादिभूषण । स्वामिद्रव्यसांभाळी ॥२२॥सदातेथेंचिवसावे । अन्यस्थानीनजावे । सत्वरजायदुर्मती ॥२३॥दंडहावीरबाहूचा । घोषकरावासाचा । एवंवदुनिक्रूरवाचा । दंडदेतनृपहस्ती ॥२४॥नृपेंघेउनीदंडजर्जर । दासभावेनृपसत्वर । प्राप्तझालागंगातीर । महास्मशानदेखिलें ॥२५॥स्मशानतेंमहाक्रूर । गगनीकोंदावलाधूर । ज्वालाउठतीभयंकर । प्रेतदाहीमहादहनी ॥२६॥प्रेतसंधीजेव्हांभंगती । चटचटाशब्द उमटती । मज्जावसापाझरती । प्रेतामधूनिअग्नीत ॥२७॥वरुनपडतीलाकडें । प्रेतहोयजैंउघडे । छिंनभिंनदिसेभ्याडें । दंतपंवतीविचकल्या ॥२८॥कोणाचेउघडेडोळे । कोणेंमुखचिउघडिले । जिव्हाएकाबाहेरलोळे । भ्यासुरप्रेतेंभासती ॥२९॥कित्येकजळीन्हाणिती । कित्येकतींचितेवरती । कित्येकतेथेंघेउनियेती । रथ्याठेविल्याओळीनें ॥३०॥कीतीसुभगायुवती । प्रेतेस्मशानीयेती । हरिद्र कुंकुमचर्चिती । मुखेंदिसतीबिबत्स ॥३१॥पुष्पमाळामंगळसूत्र । बाळीबुगडीपरमचित्र । फणीकरंडावाणपवित्र । ओटीभरलीतांदुळें ॥३२॥चोळीआणिपातळ । हातींदीधलानारळ । पुढेंबडवीकपाळ । पतीतिचादुःखभरें ॥३३॥स्मशानीहोतांदाटी । दाहकैचाउठाउठी । गंगेमाजीशीघ्रलोटीं । किंचित्स्पर्शतापावक ॥३४॥दुर्गंधसुटेबहुवस । गृध्रगोमायूवायस । थवेबैसलेभक्षणास । मृत्युनेंचिनिमंत्रिलें ॥३५॥हाहादय्याअरेअरे । शब्दनिनादभयंकरे । हापितामाताबाळारे । बंधोभगिनीमातुला ॥३६॥काकादादानानामुली । काहोमजटाकूनगेली । एवंजेथेंआरोळी । अहर्निशींउठावें ॥३७॥ऐसेतेंस्मशानघोर । दासत्वेंतेथेंनृपवर । वस्त्रादिप्रेतालंकार । हरणकरीसदातो ॥३८॥ह्याशवाचेंरौप्यशत । घेईनम्हणेनिश्चित । हेंमाझेंहेंराजप्रेत । वीरबाहुचेम्हणेतो ॥३९॥हातीघेतलेंसेकाष्ट । वसामज्जालेपेंभ्रष्ट । अंगसर्वघाणलें ॥४०॥रात्रंदिवसप्रेतचिंता । कैंचिझोपकैंचिवार्ता । शवानेंउदरपुर्तता । करीपिंडभक्षण ॥४१॥गांठीगांठींदेऊनी । कंथाकेलीपांघुरणी । प्रेतचिंध्यानेसुनी । प्रेतवतफिरतसे ॥४२॥दोनिओठझालेकाळे । खोलगेलेदिव्यडोळे । सदास्मशानीचलोळे । दैवगतीविचित्र ॥४३॥प्रेताचियापुष्पमाळा । माथातेणेगुंडाळिल्या । श्वासोश्वासवेळोंवेळां । दुःखभरेंटाकीतसे ॥४४॥एवंनृपेबारामास । काढिलेतेथेंसायास । शतवर्षांपरीदिवस । एकएकजयाशीं ॥४५॥इकडेब्राम्हणाचेघरी । नृपपत्नीकार्यकरी । केरवारापाणीभरी । दळीकांडीपाखडी ॥४६॥विप्रस्त्रीचिवेणीफणी । करीसर्वधुवीधुणी । तत्परसदासेवनी । अंतरीचिंतीहरिश्चंद्रा ॥४७॥रोहितखेळेबाळासवे । तोहीकरीगुरुसेवे । वनांतूनिनित्यनवें । काष्ठेंपुष्पेंतोआणी ॥४८॥एवंकुमरएकेदिनी । बाळासवेगेलावनी । समिधापुष्पेंघेउनी । माथाभारठेविला ॥४९॥श्रमेस्वेदबाळकासी । परतयेताआश्रमासी । तृषितझालाबहुवसी । उदकाजवळीपातला ॥५०॥खालींठेउनियाभार । बाळेंप्राशिलेंनीर । विश्रामकरुनीक्षणभर । मोळीघेऊंपातला ॥५१॥वारुळतेथेंहोतेंएक । सर्पप्रेरिलाभयानक । विश्वामित्रेंमहाघातक । रोहिताशीडंखिले ॥५२॥दंशतांचिबाळपडला । सवेंचिमरणपावला । ऋषींबाळेंआश्रमाला । भयेंकरुनिपातलीं ॥५३॥बाळेंम्हणतीतियेसी । ऐक ऐकविप्रदासी । मृत्यूझालाबालकासी । सर्पदंशेरोहिता ॥५४॥पडिलाआहेतेथेंवनी । सूतम्हणेशौनकमुनी । ऐकतांचिऐशीवाणी । तारामतीनेंवज्रसम ॥५५॥जेंविवायूझगडतां । केळपडेकींअवचिता । अथवाहातिचीसुटता । काठीजेवीपडतसे ॥५६॥व्याधबाणेंजेवींहरिणी । कोसळूनपडेधरणी । तेवींनृपानृपकामिनी । पडिलीपृथ्वीमूर्छित ॥५७॥क्रोधेंखवळेद्विजवर । जळशिंपिलेंसतीवर । एकमूहूर्तानंतर । सावधझालीनृपांगना ॥५८॥ब्राम्हणम्हणेतियेशी । सायंकाळचेसमयासी । दुष्टेममगृहींरडसी । लज्जातुजनसेका ॥५९॥अमंगलहेंरोदन । करिसीघरांतबैसोन । कुलक्षणहेंजाणोन । किमर्थकरिसीनिर्लज्ज ॥६०॥ऐकिलेंऐसेंवचन । कांहींनबोलेप्रतिवचन । दीर्घस्वरेंकरीरुदन । पुत्रशोकेंकरुनिया ॥६१॥नेत्रींवाहेंदुःखनीर । धुळीनेअंगधूसर । मोकळीसुटलीकंबर । सकरुणरडतसे ॥६२॥कोपोनियाद्विजवर । तिचाकरीतसेधिक्कार । ममद्रव्यघेऊनिथोर । कार्यमाझेंलोपिशी ॥६३॥शक्तीजरीतुजनवती । कांघेतलेंद्रव्यापती । ऐकुनीबोलेतीसती । मरणपावलाम्हणेसुत ॥६४॥आतांत्याचेदर्शन । दुर्लभझालेंमागुत्यान । एकदांत्यासीपाहीन । आज्ञादिजेस्वामिया ॥६५॥ब्राम्हणम्हणेशठेदुष्ठे । पापनेणसीपापिष्ठे । स्वामिकार्यनाशिसीनष्टे । द्रव्यमाझेघेऊनी ॥६६॥जेंघेउनीवेतन । स्वामिकाजकरितीउन । नरकींतयाशीपतन । कल्पएकरौखी ॥६७॥मगहोयकुक्कुटयोनि । धर्मकायतुजसांगुनी । निर्फळजेवींपेरुनी । जातेउखरपृथ्वींत ॥६८॥तेवीमूर्खनीचक्रूर । शठखोटाआणिचोर । उपदेशितासाचार । व्यर्थजायज्ञानतें ॥६९॥भयपापाचेंअसेंजरी । गृहकार्यमाझेकरी । चरणवंदूनतीनारी । प्रार्थिपुन्हाब्राम्हणा ॥७०॥दयाळूव्हावेमजवरी । एकमुहूर्त आज्ञाकरी । बाळपाहूनसत्वरी । येईनम्हणेशोकार्ता ॥७१॥करुणेनेंकरीरुदन । विप्रकरीरक्तलोचन । तुझ्यापुत्रेमजकारण । कांहींनसेयेवेळी ॥७२॥गृहकार्यमाझेकरी । येईलक्रोधमजजरी । आतांचिचाबुकाच्यामारी । फोडूनकाढीनतुजदुष्टे ॥७३॥ऐकतांचिभयेंकरुन । कठिणह्रदयकरुन । गृहकार्यकरीजाऊन । अर्धरात्रजाहली ॥७४॥पायब्राम्हणाचेचुरी । विप्रतेव्हांआज्ञाकरी । जाय आतांसत्वरी । दाहकरीपुत्राचा ॥७५॥प्रातःकाळचेगृहकृत्य । करीयेउनीत्वरित । ऐकूनीतारामतीयेत । पुत्रापासीएकटी ॥७६॥बाळासीपाहिलामृत । बालातेव्हांआक्रंदत । हरिणीजेवींपाडसाप्रत । वत्सासाठींगायजैंसी ॥७७॥काष्ठदर्भलोष्टतृण । वरीकेलेंबाळेंशयन । दरिद्र्यापरीअवलोकृन । निष्टुर आक्रोशकरीती ॥७८॥चालतांसतीअडखळली । बाळावरीचतीपडली । दुःखभरेमुर्छाआली । निःश्चेष्टझालीक्षणेक ॥७९॥मगपावलीचेतन । बाळातिणेंआलिंगून । सवेचिकरीचुंबन । रुदनकरीआर्तस्वरें ॥८०॥वदनीदेउनीवदन । नयनींपाहेनयन । लक्षुनियाअचेतन । रडेओरडेआक्रंदे ॥८१॥म्हणेतान्हयामाझ्याबाळा । कांनपडसीयेऊनीगळां । रुसलासकींवेल्हाळा । भातुकेंनाहींम्हणूनी ॥८२॥कांझालासिनिष्टुर । नबोलसीकारेमधुर । आईआईऐसासुस्वर । शब्दतुझालोपलाकी ॥८३॥हायबाळाहायमुला । हायरोहितावत्सला । मजसोडूनियेकला । स्वर्गीकैसाजातोशी ॥८४॥सुकुमारामाझाअव्हेर । करोनियासीशक्रपुर । योग्यनसेबानिर्धार । विपरीतकेवींजाहले ॥८५॥दोहीकरींबडवींउर । मस्तक आणिउदर । हायहायनिरंतर । शब्दकरीअतिदुःखें ॥८६॥अहोअहोजीनृपवरा । कोठेगेलायेअवसरा । पहापहास्वकुमारा । प्राणप्रियायेसमईं ॥८७॥प्राणाहूनीजोप्रियकर । बाळतुमचासुकुमार । मरुनिपडलाभूमीवर । अनाथवतराजेंद्रा ॥८८॥पुन्हांहोयशंकित । बाळ आहेकिजिंवत । उचलूनिअवलोकित । प्रेमभरेंएकदा ॥८९॥पाहूनियासवेंप्रेत । स्वयेपडेमूर्छित । पुन्हाउचलूनतयाप्रत । भाषणकरीतयाशीं ॥९०॥झोंपपुरेबाळाउठ । घरांचालचालेवाट । भयनसेकींदुर्घट । वनांमाजीतुजलागी ॥९१॥झिल्लीकरितीझंकार । सर्पकरितीफूत्कार । तमदाटलेअपार । अर्धरात्रजाहली ॥९२॥येवेळींयावनांतरी । झोंपघेशीदर्भावरी । भूतप्रेतपिशाचहारी । भयनसेंकींसंवगडया ॥९३॥सखेंतुझेंपातलेघरी । तूंकांएकलावनांतरी । पडलासिऊठसत्वरी । बोलकांहींबोलक्या ॥९४॥सूतम्हणेहोऋषी । भ्रांतबोलेदुःखवशी । पुन्हारडेअसमाशी । हायहायबाळारे ॥९५॥अरेकांनदेशीउत्तर । आईतुझीबैसलीसमोर । नजाणसीकारेसुंदर । पाहेमजएकदां ॥९६॥देशत्यागराज्यनाश । पतिहस्तेंविक्रयास । दासीहो उनीअयास । सोशिलेंपुत्रासहजम्या ॥९७॥तुजपाहतांचिसमोर । दुःखदोषसर्वदूर । प्राणधारण आजवर । केलेंजाणतवयोगें ॥९८॥आतांतूंमजटाकूनी । जासीकेवींस्वर्गभुवनी । सवेमजलाघेउनी । चालमाझ्यालाडक्या ॥९९॥आसनींशयनीभोजनी । बैसतांउठतांगमनी । सुखविसीरंम्यबोलूनी । पाहूंकोठेंतुज आतां ॥१००॥पुत्रतुझेंजातक । ब्राम्हणसांगतीकौतुक । दीर्घायुहाकुमारक । सार्वभौमदेखणा ॥१०१॥पुत्रपौत्रधनदारा । भोगिलसुखेंअपारा । दातायज्वामहाशुरा । स्वतःसर्वांजिंकील ॥१०२॥एवंजेजातककेलें । आजिसर्वमिथ्याझालें । केवींतुजमरण आलें । विधिदृष्टयेकाळी ॥१०३॥पुत्रालक्षणेतवकरी । शुभचिअसतीसारी । चक्रस्वस्तिकध्वजाकारी । मस्त्यछत्रश्रीवत्स ॥१०४॥कलश आणिचामर । आणीकलक्षणेंशुभकर । व्यर्थकेवींसमग्र । दैवयोगेजाहली ॥१०५॥हेनृपापृथ्वीनाथा । शूराउदाराममकांतां । कोठेंराज्यकोठेंवनिता । कोठेंमंत्रीइष्टमित्र ॥१०६॥कोठेंछत्रसिंहासन । कोठेंखड्गकोठेंसैन्य । कोठेंकोशकोठेंधन । तुम्हींकोठेंयासमई ॥१०७॥कोठेंघरकोठेंदार । कोठेंआतांसाकेतपूर । गजाश्वकोठेरथथोर । कोठेगेलासिरेसुता ॥१०८॥हानाथहानृपती । येईंपाहेपुत्रगती । जेणेंरांगतास्वहस्ती । ह्रदयतुझेमळविले ॥१०९॥स्वदेहींचाकर्दमरज । तवह्रदईलावीसहज । चवनाहूनबहुचोज । वाटेतेव्हांरजाचे ॥११०॥जेणेंतुमचेमांडीवरी । क्रीडाकरोनिपरोपरी । भालतिलककस्तूरी । पुसिलीजेणेंस्वलींलें ॥१११॥ ज्याचेंमुखींमृदलागली । तैसीचप्रेमेंचुंबिली । त्याचमुखींयेवेळी । भणभणाटकिडयांचा ॥११२॥ऐसाहातुझाप्रियसुत । दडलाहोवोनियाप्रेत । पहाएकदांपुत्राप्रत । दुर्लभ आतांजन्मवरी ॥११३॥हेदैवामीकायकेले । पूर्वकृतफळाआले । अंतपारमजयेवेळे । नलगेकांहींदुःखाचा ॥११४॥हापुत्रहासुंदर । हाशिशोहाकुमार । एवंआक्रोशेफार । ग्रामरक्षकींऐकिले ॥११५॥ऐकूनशब्दराजदूत । सर्वहीझालेजागृत । आक्रोशेतेविस्मित । राणीजवळीपातले ॥११६॥तेविचारितीतियेसी । तूंकोणकांरडसी । पतीकोठेनिर्भयासी । एकलीवनीकिमर्थ ॥११७॥कोणाचाहाअसेसुत । सांग आम्हांत्वरित । दुःखभरेनबोलत । राजपत्नीकांहींचती ॥११८॥पुनःपुनःतेविचारिती । स्तब्धझालीमहासती । स्फुंदेरडेतीमागुती । अक्षरमात्रबोलेना ॥११९॥विलापकरीदारुण । नेत्रतीचेअश्रुपूर्ण । पुत्रमुखाचेचुंबन । वारंवारकरीतसे ॥१२०॥एवंपाहूनितेदूत । झालेसर्वभयचकित । देहझालेरोमांचित । त्रस्तचित्तहोऊनी ॥१२१॥नव्हेम्हणतीहीनारी । बालघातकाहीअसुरी । यक्षीअथवाखेचरी । शाकिनीवाडाकिनीवा ॥१२२॥नसोडावीकदाईस । बहुकेलेंबाळनाश । बाळ आणोनिसावकाश । निर्भयबैसे एकली ॥१२३॥जरीकोणीशुभाअसती । तरीआपणासवेबोलती । एवंवदूनितियेप्रती । राजदूतेंधरियेले ॥१२४॥करुनियामनीधीर । धरितीतियेसीसत्वर । बाहुकंठीधरुनीवीर । ओढतिनेलेतियेशी ॥१२५॥नेलीचांडाळाचेद्वारी । चांडाळ आलाबाहेरी । दूतम्हणतीबाळापहारी । सांपडलीआम्हासिही ॥१२६॥इजलानेऊनबाहेरी । चांडाळावधीसत्वरी । प्रवीरबोलेतेअवसरी । जाणिलीम्यासुनिश्चये ॥१२७॥इणेंबाळेबहुभक्षिली । परीकोणीहिनदेखिली । आजितुम्हींभलीकेली । मिळविलेंयशमोठें ॥१२८॥स्वस्थजावेतुम्हींघरा । अवश्यवधितोखेचरा । वधेइच्यापुण्यभारा । पावेनमीनिश्चयें ॥१२९॥श्लोक ॥ द्विजस्त्री बालगोघातीस्वर्णस्तेयीचयोनरः । अग्निदोवर्मघातीचमद्यपोगुरुतल्पगः ॥१॥महाजनविरोधिचतस्यपुण्यप्रदोवधः । द्विजस्यापिस्त्रियश्चापिनदोषोविद्यतेवधे ॥२॥अर्थ ॥ विप्रघातस्त्रीघात । बाळघातगोघात । सुवर्णासीजोचोरित । घरेंजाळीलोकांची ॥१३०॥वाटपाडीमद्यप । गुरुदारलंपटपाप । महाजनद्रोहीताप । वधितांयासीपुण्य असे ॥१३१॥स्त्रीअसोअथवाब्राम्हण । अन्यायकरितांतेण । वध्यझालेदोघेजण । दोषनसेमारिता ॥१३२॥एवंचांडाळेंवदोनि । बांधिलीतीदृढबंधनी । ताडनकरीरज्जूनी । हरिश्चंद्रापाचारिले ॥१३३॥अरेदासावधीईसी । नेउनीबाह्यप्रदेशी । विचारनकरीमानसी । बालघातिनीदुष्टही ॥१३४॥स्त्रीवधेरावशंकित । बोलेतयासीभयभीत । शक्यनसेऐसेम्हणत । दुःसाध्य अन्यसांगावे ॥१३५॥श्वपाकम्हणभयनधरी । खड्गघेऊनियाकरी । दुष्टस्त्रीचावधकरी । भक्षिलीबहुबालके ॥१३६॥नृपम्हणेस्त्रीरक्षण । सर्वथाकीजेजाण । स्त्रीवधेपापदारुण । धर्मशास्त्रागाईलें ॥१३७॥स्त्रीवधमीनकरी । व्रतमाझेंनिर्धारी । ब्रतभंगमाझानकरी । अन्यकार्यसांगमज ॥१३८॥चांडाळम्हणेरेदुष्टा । वेतनघेऊनीपापिष्टा । कार्यनाशिशीमहानष्टा । अन्यपातककाय असे ॥१३९॥स्वामिद्रव्यघेऊन । कार्यकरीजोलुंपन । अयुतवर्षेदारुण । नर्कभोगतयाशी ॥१४०॥नृपम्हणेचांडालनाथा । दुःसाध्यदुजेंसांग आतां । जिंकुन इंद्रातत्वता । भूमिसर्व अर्पितों ॥१४१॥स्त्रीवधदुराचार । केवींकरुंपापथोर । चांडाळम्हणेतूंपामर । निर्लज आहेसदुरात्मा ॥१४२॥दासहोवोनीसेवापर । विकथ्यसीजेंवींशूर । जरोपापभयसाचार । किमर्थदासझालासी ॥१४३॥व्यासम्हणेनृपती । एवंवदोनितयाप्रती । खड्गदेततयाहाती । स्वाधीनकेलीसतीते ॥१४४॥सूतसांगेऋषीप्रती । खड्गघेऊनभूपती । अधोमुखेंबोलेहेसती । पुढेबैसपाप्याच्या ॥१४५॥छेदितोंआतांतूझेंशिर । जरीवाहीलमाझाकर । बोलूनिहस्तकेलावर । प्रहारार्थनृपानें ॥१४६॥पुत्रशोकेतारामती । स्वमृत्यूसुखमानिती । बोललीतेव्हांनृपाप्रती । परिसाश्रोतेप्रेमळ ॥१४७॥ठावेंजसेपरस्पर । स्वपतीअथवास्वदार । सतीम्हणेमानिशीजर । भाषणमाझेंचांडाळा ॥१४८॥गांवापासूननकिंचितदूर । पडिलासेमाझाकुमर । आणितेंत्यासीयेथवर । दहनत्याचेकरितेंमी ॥१४९॥सुखेंछेदावेंममशिर । आज्ञादेईनृपवर । मगजाउनियासत्वर । बाळ आणिलास्मशानीं ॥१५०॥अंकीठेउनीबाळ । विलापकरीतीवेल्हाळ । पातलानृप उतावेळ । वस्त्रकाढिलेप्रेताचे ॥१५१॥पाहिलाजोनृपेंसुत । रुपदिसेअदभुत । सर्वराजलक्षणोयुक्त । विस्मितझालापाहूनिया ॥१५२॥म्हणेमनीहाराजसुत । दिसतोसुरुपबहुत । स्मरलातेव्हांह्रदयात । पुत्रमाझाचिदिसतसे ॥१५३॥एवंविचारीमानसी । तवस्त्रीकरीआकांताशी । म्हणेनृपाकोठेंअससी । पुत्रपाहे एकदा ॥१५४॥शिवशिवहीदैवगती । राज्यभ्रंशतयाप्रती । विक्रयस्त्रीआणिसुतीं । तयावरीपुत्रमृयु ॥१५५॥ऐकतांचिऐसीमात । नृपेंजाणुनिदोघाप्रत । पडिलासवेमुर्छित । हाहःकारपुरःसर ॥१५६॥पडलापाहुनिमूर्छित । तारामतीतयाजाणत । शोकभरेपडलीमूर्छित । सावधझालीदोघेही ॥१५७॥एकमेकाचेकळलेंवृत्त । दोघेहीझालीदुःखित । सतीम्हणेनृपाप्रत । सत्यसांभाळीनरेंद्रा ॥१५८॥शिरच्छेदमाझाकरी । पतीआज्ञाभंगनकरी । ऐकतांचनृपभूमिवरी । पडिलाहोवोनिमूर्छित ॥१५९॥पुन्हासावधहोऊनी । दुःखनसोसवेमाझेंनीं । म्हणेपुत्रासवेदहनी । दग्धहोईन अवश्य ॥१६०॥तीम्हणेमीसवेयेईन । नृपेंमगचितारचून । वरीपुत्रातेठेऊन । चेतविलापावक ॥१६१॥शताक्षीचेकेलेंस्मरण । करावेजोंवरीपतन । धर्मासपुढेंकरुन । सर्वदेवपातले ॥१६२॥देवतेव्हांनृपाप्रती । महाप्रभोऐसेंम्हणती । ब्रम्हदेवादिसर्वदेवती । दर्शननृपादिधले ॥१६३॥धर्मम्हणेभूपती । साहसनकरीदेहपाती । तितिक्षादमादिनिगुती । पाहूनियातोषलो ॥१६४॥धर्माचरणेपवित्र । त्रिजगाचाअसेमित्र । इच्छितकरायाविश्वामित्र । पातलासेराजेंद्रा ॥१६५॥भार्यापुत्रेकरुन । जिंकिलेत्वांत्रिभुवन । शक्रेंऐसेंवदोन । अमृतस्रवेसुतावरी ॥१६६॥उठलातत्काळरोहित । शक्रम्हणेनृपाप्रत । बैसविमानींत्वरित । भार्येसहभूपाळा ॥१६७॥नृपेंआलिंगिलासुत । दिव्यरुपतीघेहोत । पुष्पवृष्टीदेवकरित । वाजवितीदुंदुंभी ॥१६८॥नृपम्हणेशक्रासी । नकरितांचांडाळ आज्ञेसी । नयेमीस्वर्गासी । धर्मबोलेतेधवा ॥१६९॥भावीदुःखतुजहोतें । तेंद्यावयासांप्रते । चांडाळरुपेंमीचतेथें । प्रगटझालोनृपाळा ॥१७०॥नृपेंपुन्हाआक्षेपिले । नगरवासीभक्तभले । त्यांसटाकूनस्वर्गदेखिले । काय उपयोगव्यर्थची ॥१७१॥व्यासम्हणेभूपती । राज्यींस्थापुनपुत्राप्रती । नागरीकांसहनृपतीं । इंद्रेंनेलास्वलोका ॥१७२॥हेंहरिश्चंद्राख्यान । श्रवणेंपठणेंकरीपावन । एवंकीजेदुःखसहन । परीधर्मनत्यागिजे ॥१७३॥जरीधर्मत्यागकेला । तरीउभयसुखांमुकला । जोमनुष्यजन्मींचुकला । चुकलातोसर्वत्र ॥१७४॥श्लोकदोनशेसदतीस । हरिश्चंद्रकथासुरस । वाढवीमहाराष्ट्रभाषेस । परांबाहीदयेनें ॥१७५॥इतिश्रीदेवीविजयेसप्तमेअष्टमः ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP