सप्तम स्कंध - अध्याय तिसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । भार्येंसहमहामुनी । रम्यरुपेंदोघेंजणी । राहतींप्रेमेंसुखेंकरुनी । आश्रमामाजीदेवसे ॥१॥

इकडेशर्यातीचीकांता । सुकन्येचीजीमाता । कन्याविरहेंदुःखिता । प्रार्थीतसेपतीशी ॥२॥

कन्यादिलीअंधासी । राहेऋषीवनवासी । सुखदुःखकायतीशी । नकळेंकांहींनृपवर्या ॥३॥

वर्षेझालीबहुत । कन्याआहेकीजिवंत । पाहूंएकदांनिश्चित । दुःखमजनसोसवें ॥४॥

आवश्यम्हणेनृपती । भार्येसहवनाप्रती । येऊनपाहेदिव्यकांती । आश्रमामाजीपुरुषाते ॥५॥

पाहतांचिनृपेंदुरुन । बुडविलेंम्हणेकन्येन । वृद्धब्राम्हणामारुन । तरुणदुजाआणिला ॥६॥

निश्चयकेलालग्नसमई । तोभंगिलायेसमई । तारुण्यदोषेंनिर्दईं । झालीक्रूरकन्यका ॥७॥

डागलागलाकुळाशीं । निपजलीहीकन्याकैंशीं । एवंदुखेंमानसीं । खवळलानृपवर्य ॥८॥

पितापाहिलादुरुनी । सुकन्याआलीधाऊनी । मातपितरानमूनी । उभीराहिलीसमीप ॥९॥

नृपक्रोधेंतिरस्कारी । म्हणेदुष्टेंहोयदुरी । वृद्धपतीमारुनकरी । तरुणपुरुष आणिला ॥१०॥

कांनझालागर्भपात । दुष्टानिपजलीसकुलांत । गोडबोलुनिअदभुत । ठकविलेंसपापिष्ठे ॥११॥

पित्याचेंवाक्य ऐकोन । कन्याबोलेमृदुवचन । अन्यनसेपतीच्यवन । दिव्यकेलासूर्यपुत्रें ॥१२॥

चलावेंत्वांतेथवरी । कळेलवृत्तनवलपरी । निरपराधीक्रोधनकरी । लाडकीतुझीकन्यका ॥१३॥

नृपझालाकोपशांत । सर्व आलेआश्रमांत । परस्परेंअभिवंदित । कुशलप्रश्नपरस्परें ॥१४॥

विचारितांसर्वकळलें । नृपचित्तसंतोषलें । च्यवनतेव्हांनृपाबोले । पूर्ववाक्यस्मरोनी ॥१५॥

सूर्यपुत्रांदिलेंवचन । करवीनतुम्हांसोमपान । राजेंद्राकरीतूंयज्ञ । होईनस्वयेंअध्वर्यु ॥१६॥

इंद्रादिसर्वदेवता । प्रत्यक्षयेतीलतत्वता । सोमपीथदस्राकरवितां । यशहोईलतुझेंमाझें ॥१७॥

व्यासम्हणेंनृपाळा । ऐकूनिरावहर्षला । मंडपतेथेंउभारिला । संभारसर्वमेळविलें ॥१८॥

सर्वनृपसर्वऋषी । पाचारिलेबहुमानशी । यथायोग्यसर्वांसी । दानमानेंतोषविलें ॥१९॥

वसिष्ठादिमहामुनी । ऋत्विज असतीसोमयज्ञीं । च्यवनशर्यातीलागुनी । दीक्षादानकरीतसे ॥२०॥

देवासहपाकशासन । मंडपींबैसेयेऊन । दोघेंआलेमित्रनंदन । सभास्थानींबैसले ॥२१॥

इंद्रेंतयांपाहुनी । शंकितझालामनी । पुसेदेवांलागूनी । केवींआलेअयोग्यहे ॥२२॥

योग्यनसतांसोमपानी । यांसींपाचारिलेकोणी । उत्तरनदेतीसभास्थानी । देवसर्वचकितसे ॥२३॥

च्यवनेंतेव्हांकायकेलें । इंद्रार्थपात्रस्थापिल । सवेंचिदस्रार्थठेविले । चमसदोनच्यवनानें ॥२४॥

इंद्रेंपात्रेंपाहून । म्हणेयोग्यनाहींतदोघेजण । नकरावेपात्रस्थापन । च्यवनऋषेयाज्ञिका ॥२५॥

ऋषाम्हणेदोषकाय । मित्रपुत्रतेजोमय । धर्मपत्नीपासूनसूर्य । प्रकटकरीविधीनें ॥२६॥

नाहाततसकर । किमर्थत्यांचातिरस्कार । म्याआजिनिर्धार । सोमाधिकारीतेकेलें ॥२७॥

शक्रम्हणेचिकित्सक । नासत्यहेनिःशंक । त्याज्य असतांठाऊक । भंगिशीकेवींमर्यादा ॥२८॥

च्यवनतेव्हांकोपला । अवश्यदेईनसोमाला । वृथाकरशीकलकला । अहल्याजारावृत्रघ्ना ॥२९॥

सर्वदेवनबोलती । तूंचिवारिसीदुष्टमती । कदांनायकेनिश्चिती । देईनसोम अवश्य ॥३०॥

सत्य असतांसूर्यकुमर । स्वयेंझालेभिषग्वर । करितीसर्वांपरोपकर । रोगनाशितीतुमचे ॥३१॥

रोगचिकित्साकरिती । दोषनसेतयाप्रती । तुंनजाणसीमंदमती । द्रोहकरिसीमानयोगें ॥३२॥

वैद्यक असेंपरोपकार । निंदिसीतूंपामर । मजवरीत्यांचाउपकार । देवतुल्यमजकेले ॥३३॥

मीदिधलेयांवचन । तुम्हांसोमार्हकरीन । आग्रहीनघालीमन । नचलेयेथेंपुरंदरा ॥३४॥

व्यासम्हणेनृपती । क्रोधेंखवळेसुरपती । बोलेमगच्यवनाप्रती । बलयुक्तगर्विष्ट ॥३५॥

द्विजाधमाममवचन । तोडितांशिरतोडीन । विश्वरुपाचेंहनन । केलेंजेवींगर्विष्टा ॥३६॥

ऐकतांचिऐसीमात । चमसघेईंहस्तांत । सोमघालीमंत्रपूत । नासत्यार्थनिःशंकतो ॥३७॥

एवंइंद्रेंपाहिले । कोपेंमगवज्रप्रेरिले । च्यवनेंतैंस्तंभविलें । तपोबळेंसहस्त ॥३८॥

कोपलातेव्हांच्यवन । समंत्रकरितांहवन । कृत्यप्रगटेअग्नींतून । मदनामेंराक्षसतो ॥३९॥

काजळाचामहामेरु । तेवींत्याचादेहथोरु । उर्ध्वकेशभयंकरु । नयनदोनीकाळाग्नी ॥४०॥

नासिकेचीदोनीविवरें । मेरुचींतींमहागव्हरें । मुखत्याचेबहुविस्तरे । सहस्रयोजनपर्यंत ॥४१॥

शतयोजनलंबित । चारदंष्ट्रभयप्रांत । दशयोजनविस्तृत । सर्वदंतजयाचे ॥४२॥

जिव्हांभ्यासुरविशाळ । दाढाचाटीकराळ । सर्पापरीलळलळ । ब्रम्हांडग्रासकरीलकीं ॥४३॥

अधरोष्टलागलाधरे । उत्तरोष्ठगगनींफिरे । बाहूदोनगिरिमंदरे । विशाळशूलकरतळीं ॥४४॥

उदराचीझालीबखळ । ब्रम्हांडसर्वसांठवेल । धांवलातो उतावेळ । शक्रभक्षणाकारणें ॥४५॥

झालाएकचिहक्कार । आक्रोशतीसर्वसुर । मेलाम्हणतीपुरंदर । नसुचेंकांहींकोणाशीं ॥४६॥

स्तंभिलासेंइंद्रहस्त । कैंचेबळजाहलात्रस्त । मानसेतेव्हांगुरुस्मरत । तत्काळ आलापुरोधा ॥४७॥

म्हणेइंद्राचुकलासी । छळिलेंत्वांदेवीभक्तासी । शक्तिनसेअन्यासी । असुरधारणीसांप्रत ॥४८॥

स्व इच्छतेदेवीभक्त । करितीसदामनःपूत । कोणतयांवारित । शक्तिसमशक्तते ॥४९॥

च्यवनाहोईशरण । तोचकरीलरक्षण । ऐकतांच इंद्रेंचरण । दृढधरिलेच्यवनाचे ॥५०॥

चुकलोंआतांक्षमाकरी । कृत्य आपुलेंनिवारी । शरणांगतासीतारी । दयार्द्रहोईभार्गवा ॥५१॥

सोमपीथेनासत्य । तववचनेंहोवोंतसत्य । मानीनतयांमीनित्य । वचनसत्य असोतुझें ॥५२॥

एवंवाक्य ऐकिलें । इंद्रासिमग आश्वासिले । मदाचेतेणेंभागकेले । चारजागीस्थापिला ॥५३॥

द्यूतमदिराकामिनी । मगयाएवंचतुःस्थानी । च्यवनेंमदास्थापुनी । स्वस्थकेलाशक्राते ॥५४॥

देवांसर्वांबैसवुनी । नासत्यकेलेंसोमपानी । यज्ञसर्वसंपऊनी । मुनीझालाकृतकार्य ॥५५॥

च्यवनझालासुंदर । तीर्थझालेंसरोवर । यूपयुक्त आश्रमथोर । ऋषिराहिलासुखानें ॥५६॥

गृहींगेलामनुसुत । कीर्तिध्वज उभारित । तयाचापुत्र आनर्त । रैवतपुत्रतयाचा ॥५७॥

तयासीझालेपुत्रशत । ककुद्मीज्येष्ठसर्वांत । रेवतीनामेंगुणवंत । कन्याएकरैवत ॥५८॥

कन्याद्यावीकोणास । एवंपुसायाविधीस । रैवतगेलासत्यलोकांस । कन्येसहब्रम्हसभे ॥५९॥

देवीभक्ताचेंआख्यान । अतिशयपुण्यपावन । करितांश्रवणपठण । सत्कीर्तिलाभतसे ॥६०॥

शत्तोतरश्लोकतेरा । भागवताच्याविस्तारा । च्यवनकथामनोहरा । गाइलीयेथेंअंबेनें ॥६१॥

देवीविजयेच्यवनोपाख्यानेंसप्तमेतृतीयः ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP