सप्तम स्कंध - अध्याय सहावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । हरिश्चंद्रनरपती । याचेंचरित्रवर्णिती । वेदव्यासनृपाप्रती । ऋषीसमाजींसूतसांगे ॥१॥

एकदांस्वइच्छेकरुनी । मृगाकारणेंनृपवनीं । फिरतअसतांकामिनी । पाहिलीरुदनकरिती ॥२॥

नरपतीतिसीपुसे । दुःखतुजकायसें । तीम्हणेगाधिजतापसे । दुःखदिलेंमजलागी ॥३॥

तोकरीतसेंतप । तेणेंमजसंताप । वाढेनेणोआपेआप । तपतामसतयाचे ॥४॥

नृपम्हणेधीरधरी । सवेंगेलामुनीचेंघरी । साष्टांगतयानमस्कारी । विनययुक्तप्रार्थिलें ॥५॥

भोऋषेविश्वामित्रा । तपकिमर्थपवित्रा । परदुःखदसत्पात्रा । नोचिततुजविशेषें ॥६॥

माझेंविषयामाझारी । तामसतपातेंनिवारी । द्वितीयकोपअंतरीं । गाधिपुत्रेंबाळगिला ॥७॥

हरिश्चंद्रआलाघरां । विश्वामित्रतेअवसरा । दुःखद्यायानृपवरा । प्रवृत्तजाहलासकोप ॥८॥

आज्ञापिलातेणेंअसुर । मायावीतोभयंकर । होउनियासूकर । नृपउद्यानींप्रवेशला ॥९॥

सुगंधजीपुष्पवाटी । नाश आरंभीकपटी । मुळापासून उपटी । दंतघायेकरुनिया ॥१०॥

आम्रजंबूखर्जूर । उपटूनिकाढीतोअसुर । फळेफुलेंनाशीअपार । भूषणकरीक्रूरतो ॥११॥

आरक्तनेत्रविशाळ । दाढादिसतीकराळ । घुरघुरस्वरवेळोंवेळ । उग्रतरकरीतसे ॥१२॥

कर्णदिसतीज्याचेउंच । सुयापरीतेरोमांच । र्‍हस्वपदमहानीच । वनभंग आरंभी ॥१३॥

राजसेवकनिवारिती । पाषाणबाणवर्षती । परीनाटोपेदुर्मती । धावेंतयामाराया ॥१४॥

तेझालेभयचकित । नृपाकळविलेंत्वरित । क्रोधेभूपतेथेंयेत । अश्वारुढहो उनी ॥१५॥

सज्जकरुनिचाप । बाणवर्षेंतेव्हांनृप । धांवूनिआलासमीप । क्रोडरुपेंदैत्यतो ॥१६॥

नृपमारीतीक्ष्णबाण । कोलकरीउड्डाण । करुनिनृपाउल्लंघन । मार्गधरीवनाचा ॥१७॥

क्रोधेनृपलागेपाठी । बाणसोडीअतिनेटी । परीचुकवूनिपळेकपटी । दिसेंनदिसेंदिसतसे ॥१८॥

एवंफिरेतोसूकर । नृपगेलाबहूदुर । सैन्यराहिलेंबहुअंतर । एकलाचिहरिश्चंद्र ॥१९॥

मध्यवरीआलातपन । सूकरगेलापळून । नृपालागलीतहान । श्रमलाबहूउष्णकरे ॥२०॥

नदिसेंकोठेंकोल । मनुष्यहीनाहींजवळ । तप्तझालेभूमंडळ । चंडकिरणप्रतापे ॥२१॥

तवनदीनृपेंदेखिली । उतरोनिअश्वाखालीं । अश्वपाजिलातेवेळीं । स्वयेंप्राशिलेंसीतोदक ॥२२॥

श्रमकरायादूर । वृक्षछायेनृपवर । बैसलातोवंचनचतूर । विश्वामित्रपातला ॥२३॥

अतिवृद्धरुपजर्जर । वळयावेष्टितशरीर । शुभ्रकेशवर्णगौर । भस्मरुद्राक्षधरिलेती ॥२४॥

अंगकांपेंथरथर । लांबलोंबेंधोतर । खोलनेत्रभग्नदंष्ट्र । यज्ञोपवीतशुभ्रदिसे ॥२५॥

हातींधरलीवंशकाठी । श्वासकोंडेश्रमेंपोटीं । खांसेपडेमुखावाटीं । क्षणोक्षणींकफलाळ ॥२६॥

एवंहो उनिम्हातारा । येउनिनृपानिरखीबरा । नृपकरीनमस्कारा । विप्रपाहूनसवेग ॥२७॥

नृपेंहातींधरुनी । विप्रबैसविलाआसनीं । विप्रपुसेंयेणेंकोठुनी । झालेंयेथेंकोणतूं ॥२८॥

अरण्यहेंनिर्जन । दिवस आलामध्यान्ह । एकलाचिमार्गचुकून । आलासेंकींसांगपा ॥२९॥

बोलेतेव्हांनृपवर । बागांतशिरलासूकर । वधार्थधांवलोंसत्वर । मागात्याचेवनांतरी ॥३०॥

तोदुष्ट अदृश्यझाला । दिशाभ्रममजजाहला । हरिश्चंद्रम्हणतीमला । अयोध्येचाभूपती ॥३१॥

आतांतुम्हापाहिले । मनमाझेंसंतोषलें । मार्गदाखवायेवेळे । इच्छिततुमचेंपुरवीन ॥३२॥

विप्रम्हणेहोनृपती । स्नानकीजेपुण्यतीर्थीं । दानदीजेयथाशक्ती । दाखवीनमार्गतुज ॥३३॥

उत्कृष्टपर्व आहेआज । प्राप्तझालासीसहज । स्नानतर्पणपितृकाज । अवश्ययेथेंकरावें ॥३४॥

श्लोक ॥ प्राप्यतीर्थंमहापुण्यमस्नात्वायस्तुगछती । सभवेदात्महाभूय इतिस्वायंभुवोब्रवीत्‍ ॥१॥

अर्थ ॥ पुण्यतीर्थींप्राप्तझाला । स्नानावांचूनिपरतला । केलेंतेणेंआत्महत्येला । म्हणेमनूस्वयंभू ॥३५॥

अवश्यम्हणेनृपाळ । स्नानकेलेंतत्काळ । संकल्पसांगेतपोबळ । वृद्धविप्रतयाशी ॥३६॥

रावम्हणेमाग इच्छित । तोम्हणेपुत्रविवाहार्थ । इच्छितोंमीनिश्चित । धनरत्नवस्त्रादि ॥३७॥

सवेचिगंधर्वमाया । प्रकटकरीतोराया । कन्यापुत्रनिर्मूनिया । दाखविलेनृपाते ॥३८॥

देशीलजरीइच्छित । राजसूयपुण्याप्रत । पावशीलतूंनिश्चित । वृद्ध आशापुरवावी ॥३९॥

रावम्हणेगृहांयावें । इच्छितसुखेंमागावे । अदेयमजस्वभावें । नसेंकांहीद्विजोत्तमा ॥४०॥

एवंवदलानृपती । वाटदावीव्यांजमती । राव आलागृहाप्रती । कांहींदिवसलोटले ॥४१॥

एकेदिवशीनृपती । अग्निहोत्रशाळेप्रती । गेलाअसेंदर्शनार्थी । वेदीमध्येंबैसला ॥४२॥

तवपातलाऋषिवर । म्हणेविवाहिलाकुमर । इच्छितदेईसत्वर । सत्यवचनजरीतुझें ॥४३॥

नृपम्हणेकाय इच्छित । वदतांचिदेईनसत्य । मीनबोलेअनृत । अदेयकाहींनसेंची ॥४४॥

मुनिम्हणेनृपवरा । सर्वस्वदेईकुमरा । राज्यकोशसैन्यागारा । भोगावयानिश्चयें ॥४५॥

नृपम्हणेहोदिलें । मुनीम्हणेघेतलें । वेदीमध्येंदानदिले । नृपाउदारामजलागी ॥४६॥

परीतेंदक्षणेवांचून । वृथाहोयकेलेंदान । अडींचभारसुवर्ण । दक्षिणार्थदेईज ॥४७॥

देईन ऐसेंवचन । मुनीगेलाघेऊन । नृपकरीतसेचिंतन । हेंकायकेलेंम्या ॥४८॥

विश्वामित्रेंठगविलें । सर्वस्वहिरोनिघेतलें । अडीचभारसुवर्णवहिलें । आणिकदेणेंअसेंची ॥४९॥

दैवगतीकैसीअसे । मनींएवंचिंतीतसे । पुसतीस्तवितीजनकैसे । व्यग्रचित्तकिमर्थ ॥५०॥

शुभाशुभभाषण । नकरीरावझालादीन । अंतर्गृहींजाऊन । चिंताक्रांतबैसला ॥५१॥

भार्यात्याचीपरमसती । नामतिचेतारामती । उदासकांहोआजचित्तीं । विचारीतसेप्रेमें ॥५२॥

किंचिद्वदलातियेशी । भोजननसेंतोदिवशीं । निद्रानसेसर्वनिशीं । कंठिलीचिंताभरानें ॥५३॥

प्रातःकाळींकरुनिस्नान । होमादिदेवतार्चना । तवआलागाधिनंदन । नमस्कारिलानृपानें ॥५४॥

मुनिम्हणेभूपती । सर्वस्वमाझेनिश्चिती । दक्षणादेईमजप्रती । टाकीजायसवेग ॥५५॥

रावम्हणेसर्वस्वदिलें । सुखेंभोगावेंसकळे । आम्हींजातोंयेवेळें । परीएकप्रार्थितो ॥५६॥

दक्षणातुझीद्यावया । धननसेंयासमया । तोंवरीधीराकरीदया । धनजोंवरीमिळेल ॥५७॥

एवंवदोनितयाशी । पाचारिलेस्त्रीपुत्राशी । म्हणेसर्वस्वम्याऋषीशी । दिधलेंजाणासंतोषें ॥५८॥

तीनदेहसोडून । सर्वस्वकेलेंअर्पण । मजजाणेंअन्यस्थान । वदूनिसवेंनिघाला ॥५९॥

एकवस्त्रमात्रनेसलें । लज्जार्थतेंठेविलें । अन्यसर्वहीटाकिलें । अलंकारशस्त्रादी ॥६०॥

पतीचेंपाहूनगमन । स्त्रीपुत्रहीदीनवदन । निघालीसर्वटाकून । एकएकवस्त्रानें ॥६१॥

तिघांपाहूनगमन । हाहाःकारकरितीजन । म्हणतीअनर्थदारुण । केवीआजओढवला ॥६२॥

धिक्करितीविश्वामित्रा । म्हणतीदुष्टादुष्टचरित्रा । कांछळशसित्पात्रा । नृपालागीआमुच्या ॥६३॥

नगरसर्व उदास । नृपचालिलावनास । सवेंघेऊनिस्त्रीपुत्रास । तवविश्वामित्रपातला ॥६४॥

म्हणेदेईदक्षणासत्वर । जाईकोठेंतूंनंतर । अथवाकरीनकार । लोभजरीह्रदईंअसें ॥६५॥

सर्वराज्यघेपरत । जरीदक्षिणानदेववत । अथवाजरीनसेंअनृत । दक्षणादेईझडकरीं ॥६६॥

रावहोऊनीदीन । बोलेदक्षणादेईन । जोंवरीनसेंधन । धीरधरीतोंवरी ॥६७॥

सूर्यवंशींमीक्षत्रिय । केवींवदूंअनय । तोंवरीहोईसदय । यावद्धननपवेमी ॥६८॥

मुनिम्हणेइतःपर । धनकेवींमिळणार । नराज्यनभांडार । साधननसेंतुजजवळी ॥६९॥

वृथादेतोदेतोम्हणशी । आतांतूंकोठूनदेशी । नित्यतुजनिर्धनाशी । मागूकितीपुनःपुनः ॥७०॥

म्हणएकदाधननाहीं । देऊंकोठूनिदक्षणाही । जातोंमीतूंस्वस्थराही । भार्यापुत्रासमवेत ॥७१॥

एवंऐकूनवचन । रावम्हणेशरीरेंतीन । विक्रययांचाकरीन । ऋणफेडनितूमचें ॥७२॥

होईनकोणाचादास । दक्षणादेईनतुम्हांस । पुर्णहोतांएकमास । ऋणफेडीनाअपुलें ॥७३॥

यावन्नफिटेंरिण । तावन्नघेमीअन्न । कीजेस्वामीस्वस्थमन । आज्ञाआणीककरावी ॥७४॥

ऐकोनिमुनीपरतला । मानसीविस्मितझाला । धन्य असोनृपाला । सत्यवदलावसिष्ठ ॥७५॥

सपुत्र आणिसस्त्रीशी । नृपगेलावाराणसी । पाहूनियागंगेसी । आनंदलाहरिश्चंद्र ॥७६॥

केलेंतिघींगंगास्नान । घेतलेंविश्वनाथदर्शन । बैसलाजोंस्वस्थमन । विश्वामित्रपातला ॥७७॥

नृपाअसोकल्याण । माझेंआहेकीस्मरण । मासझालासंपूर्ण । देईदक्षणाउदारा ॥७८॥

नृपम्हणेदिनार्धशेष । सरलानसेसर्वमास । तोंवरीसावकाश । करीज्ञानीतपस्वीतूं ॥७९॥

असेंअसोम्हणेऋषी । येईन आतांतुजपाशी । दक्षणेविनाहोतानिशी । शापदेईनअवश्य ॥८०॥

एवंदूरगेलामुनी । नृपचिंताक्रांतमनीं । केवींहोईन अनृणी । केवींवित्तमिळेल ॥८१॥

प्रतिग्रहधर्मनसे । लोकांसीमीयाचूंकसे । मित्रनसतीयेथेंऐसें । धनघेऊऋणाथ ॥८२॥

क्षत्रियधर्ममुख्यतीन । दानाध्ययनयजन । केवींसंभवेयाचन । जरीप्राणत्यागावा ॥८३॥

ब्रम्हस्वाचीहोयहानी । प्राप्तहोयकीटयोनी । अथवाप्रेतहोऊनी । भ्रमणकरावेंसर्वत्र ॥८४॥

विक्रयकरावादेहाचा । विचारबराहाचिसाचा । संकोचपडलास्त्रियेचा । अधोवदनेंचिंतीत ॥८५॥

तवबोललीमहासती । गदगदरवेंनृपाप्रती । चिंतासोडिजेचित्तीं । सत्यकदांनसोडावें ॥८६॥

सत्येंभोगसत्येंस्वर्ग । सत्येंचलाभेअपवर्ग । सत्येंचसाधेसर्वयोग । सत्यकदांनसोडावें ॥८७॥

अश्वमेघकेलेंशत । राजसूयकेलेबहुत । एकदावदलाअसत्य । तेणेंपडलाययाती ॥८८॥

तरीतुम्हांतेंअनृत । स्पर्शनकरोकिंचित । स्त्रीपुत्रादिपुरुषाप्रत । प्राप्तहोतीपुण्ययोगें ॥८९॥

नृपम्हणेगजगामिनी । पुत्र असेवंशश्रेणी । क्रययोग्यतुम्हींदोनी । नाहींऐसेंवदेशास्त्र ॥९०॥

उपायकाययोजावा । केवीहापाशतुटावा । धिक्कार असोयादैवा । वदेकायमनीअसें ॥९१॥

सतीम्हणेहोममपती । मनाचीटाकूनखंती । विकूनियामजप्रती । दक्षणाद्यावीब्राम्हणा ॥९२॥

ऐकतांचिरावमूर्छित । झालासेंअतिदुःखित । सावधहोऊनम्हणत । अवाच्याकेवींबोलसी ॥९३॥

तुझेंतेसुहास्यवदन । मृदुमधुर ऐसेंवचन । त्यामुखींहेशब्दबाण । युक्तनव्हेंबोलणें ॥९४॥

हाहाम्हणेनृपती । धीरनोहेतयाप्रती । मूर्छायेउनीमहीपती । दुःखभरेंपडियेला ॥९५॥

पडलापाहोनीनृपाशी । रडेसती दुःखावेशी । म्हणेदैवागतीकैसी । केलीआजीनिष्टुरा ॥९६॥

कोणपापहेंउदेलें । संकट ऐसेंओढवलें । ब्रम्हदेवाकायकेलें । निर्दयत्वदयाळा ॥९७॥

कोटयावधीचेंजोवित्त । सहजब्राम्हणासीदेत । तोआजीपडिलामूर्छित । दुःखभरेंधरणीसी ॥९८॥

येतीजयासीसर्वशरण । दैवेंकेलातोचिदीन । इंद्र उपेंद्रासमान । कोणपापपुढावलें ॥९९॥

व्यासम्हणेनृपती । एवंविलपेतारामती । असह्यदुःखेंतीसती । पडलीस्वयेंमूर्छित ॥१००॥

बाळेंपाहूनतयाशी । निराश्रितरडेअवेशी । म्हणेमातेदेईमजशी । भक्षणार्थसत्वर ॥१०१॥

भूकमजलागली । जीभमाझीवाळली । त्वाकागेंनिद्राकेली । एवओरडेबाळतो ॥१०२॥

एकशतश्लोकसासष्ट । हरिश्चंद्राख्यानस्पष्ट । बोलिलेयेथेंसर्वश्रेष्ठ । धर्मरक्षण उपदेशहा ॥१०३॥

देवीविजयेसप्तमेषष्ठः ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP