अमृतानुभव - सच्चिदानंदपदत्रयविवरण

अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर आलेला अनुभव आहे.


अस्तित्व-प्रकाश-सुखा । ब्रह्मीं अभावेंचि देखा । विषपणें विषा । विष न जैसे ॥१॥

कनक काठिण्य कांती । तिन्ही मिळोनि कनकचि अंतीं । द्रवपण दूध गोडी ती । दूधचि जैसे ॥२॥

सुगंध मार्दव उजळपण । या तिहींचे न तीनपण । ते देखावे गुणवान । कापुरीं एके; ॥३॥

अंगेंचि कापूर उजळ । की उजळताचि मवाळ । की दोन्ही नाही, परिमळ । एकचि जो; ॥४॥

ऐसे या कापूरपणींही । अभावेंचि हे तिन्हीही । त्यापरीचि लय ब्रह्मींही । सत्-आदिकांचा ॥५॥

एरवी सत्-चित्-आनंद-भेदें । चालली तिन्ही पदे । परि तिन्ही उणी, आनंदें- । केली या ब्रह्में ॥६॥

सत्‌पणाचि सुख, प्रकाश । प्रकाशचि सत्‌पण, उल्हास । निवडता न ये अंश मिठ्ठास । अमृतीं जैसा ॥७॥

शुक्लपक्षीं सोळा । चंद्राच्या वाढती कला । परि चंद्र मात्र सगळा । चंद्री जैसा ॥८॥

थेंब थेंब पडता पाणी । पाण्याची करिता ये मोजणी । परि पडल्याठायी पाण्यावाचुनी- । काय असे ? ॥९॥

तैसे असत्‌पणाचे अभावास । सत् म्हणता आले वेदांस । अचेतनाचे समाप्तीस । चिद्रूप ऐसे; ॥१०॥

दुःखाचे सर्वनाशें । उरले ते सुख ऐसे- । कथिले त्या निःश्वासें । प्रभूचे; ॥११॥

ऐसी सत्-आदींची प्रतिस्पर्थी । तिन्ही ती असत् आदी । दुरी सारिता सत् इत्यादी । बळावली ॥१२॥

ऐशापरी सच्चिदानंद । ऐसा हा शब्द । अन्य निषेधें होय सिद्ध । तो न आत्मावाचक ॥१३॥

सूर्याचे प्रकाशाने । जे काही जड दिसणे । तयाकडूनि काय प्रकाशणे । सूर्य कधी ? ॥१४॥

तैसे ज्या तेजें । वाचेसि वाच्य उमजे । तयासि वाचा प्रकाशे सहजे । हे कैसे होई ? ॥१५॥

तो विषय न होई कोणाही । जया प्रमेयत्वचि नाही । तया स्वयंप्रकाशा काही । प्रमाण हवे ? ॥१६॥

प्रमेय-सिद्धतेने । प्रमाणत्व नांदणे । दोन्ही काय ते होणे । स्वतःसिद्ध ब्रह्माठायी ? ॥१७॥

ऐसे ब्रह्मवस्तूसी जाणो जाता । ज्ञानचि ती ब्रह्मवस्तु तत्त्वता । मग ज्ञेय आणि ज्ञाता । कैसा उरे ? ॥१८॥

म्हणोनि सत् चित् आनंद येथ । ब्रह्मवाचक शब्द नव्हेत । ब्रह्मवस्तुसि नच प्रकाशीत । हाचि सारांश विचारांचा ॥१९॥

ऐसी ही वेदें । प्रसिद्धिली ज्ञानपदे । मग द्र्ष्ट्‌यासि स्वसंवादें । भेटती जेव्हा; ॥२०॥

तेव्हा वर्षोनि ओसरे मेघ । वा समुद्रास मिळुनि नदीचा ओघ । वा प्राप्य वस्तुसि दावुनि, माग- । सरे जैसा; ॥२१॥

फळ उपजे फूल सुके । फळ गळे रसपाकें । तो रसहि लोपे सुखें- । तृप्ती देउनी; ॥२२॥

की आहुति देउनि अग्नीत । मागे ये अग्निहोत्र्याचा हात । वा सुख जागवुनी गीत । उगे राहे; ॥२३॥

वा मुखासि मुख दावुनी । आरसा जाय निघोनी । निजल्या जागे करुनी । जागे करणारा जैसा; ॥२४॥

तैसे सत् चित् आनंद । द्रष्टत्व दाविति आत्म्यासि शुद्ध । मग तिन्ही पदे करिती सिद्ध । वाट मौनाची ॥२५॥

जे जे बोलावे ते ते नव्हे । जे असे ते तर न बोलवे । छायेवरुनि न मोजता ये । आपुलीची उंची आपणा; ॥२६॥

जों जों मोजावया जावे । तों तों ती पुढे धावे । मग लाजुनी संकोचावे । मोजमाप जैसे; ॥२७॥

तैसे सत्‌पणचि स्वभावें । असत्‌पणा तर न शिवे । मग सत्‌पण हे वेगळे नाव हवे । सत्‌पणासी कासया ? ॥२८॥

आणि अचित्‌पणाचे नाशीं । आले चिन्मात्रदशेसी । ते आता चिन्मात्रचि, मग त्यासी- । चित् ऐसी पुनरुक्ति का ? ॥२९॥

जागृतावस्थेत तर निद्रा न पुरती । ना जागेपणाचीहि स्फूर्ती । तैसे चिन्मात्रचि, मग चिन्मात्रप्रतीती । येई काय ? ॥३०॥

ऐसे या सुखीपणें । नाहीचि दुःख होणे । मग सुख ऐसे वेगळे गणणे । सुखासि काय ? ॥३१॥

म्हणोनि सत् असत्‌सह गेले । चित् अचित्‌सह मावळले । सुख असुख निमाले । काही न उरे ॥३२॥

आता द्वंद्वाचे निरर्थक । त्यागुनिया वस्त्र बंधक । सुखमात्रचिक एक । स्वयें असे ॥३३॥

परि एक म्हणोनि गणू पाही । तर गणणारा दुजा होई । म्हणोनि हे गणता न येई । ऐसे एक ॥३४॥

सुखातुनी बाहेरी पडणे । तेणें सुखें सुखी होणे । परि हे सुखमात्रचि, मग कोणे- । अनुभवाने ? ॥३५॥

देवीचा ढोल वाजत । देवी अंगीं प्रकटत । केवळ ढोलचि, मग अंगात- । कोण ये कोणाचे ? ॥३६॥

तैसे सुखाने आपुल्या । न सुखावणे ज्या आत्म्या । आणि सुखाच्या अभावा । न जाणे जो ॥३७॥

आरसा न पाहता मुख । स्वयें सन्मुख ना विन्मुख । तैसे नसोनि सुख असुख । सुखचि जे ॥३८॥

सर्व शास्त्रांच्या सिद्धांतां । अज्ञानी म्हणूनि त्यागिता । न लागे आपुल्या हाता । आपणचि जे ब्रह्म ॥३९॥

न लाविताही ऊस । जैसा असेचि असे रस । तो नसे, तर अंश मिठ्ठास । आला कोठून ? ॥४०॥

न घडविता वीणा । नादाचा जो अबोलपणा । तया त्या नादोंचि जाणा । जाणते व्हावे लागे; ॥४१॥

पुष्पांचे उदरीं जेणें । सहजी पराग येणे । त्याआधी भ्रमर होणे । तयांसीचि भाग पडे; ॥४२॥

वा न रांधिता स्वयंपाका । त्यात गोडी कैसी, का ? । हे पाहणे न कोणां आणिकां । तो पाकचि जाणे ॥४३॥

जे सूख यावया सुखपणासी । लाजे आपुले भान घेण्यासी । ते आणिकां चाखावयासी- । लाभेल काय ? ॥४४॥

भरदिवसा दुपारी । चंद्र असे अंबरीं । ते त्याचे त्यानेचि परी । जाणावयाचे ॥४५॥

रूप न प्रकटे तेव्हा लावण्य । देह न उपजे तेव्हा तारुण्य । सत्कर्म होण्यापूर्वी पुण्य । कैसे असे ? ॥४६॥

मनाचा अंकुर न उपजे । तरी जर काम माजे । तरचि वर्णन घडे जे । ब्रह्मवस्तूचे ॥४७॥

वाद्यवैविध्याची सृष्टी । जन्मा न घाली नादवृष्टी । तोंवरी नादाच्या गोष्टी । नादचि जाणे ॥४८॥

अथवा काष्ठासी जाळुनी । जैसा की अग्नी । राहतसे चिकटुनी । स्वस्वरूपींचि ॥४९॥

साहाय्याविण आरशाचे । जयां अस्तित्व कळे मुखाचे । तेचि जाणिती ब्रह्माचे । वर्म साच ॥५०॥

न पेरिताचि पीक जोडणे । ते रोकडे कणगीत असणे । हे उघड बोलणे । ऐशा रीतीने ॥५१॥

ऐसे विशेष-सामान्य । दीही भावां न आकळे चैतन्य । ते भोगी अनन्य । आपणासीचि सदा ॥५२॥

आता ब्रह्माविषयी करित बोलणे । व्हावयाचे जया शहाणे । तयाने मौनासीही पिऊनि घेणे । निपटुनी ॥५३॥

तर उपमा दृष्टांत अनुमान । यांनी ऐसे केले प्रमाण । की ब्रह्मवस्तूचे प्रत्यक्ष समर्थन । सिद्ध न होई ॥५४॥

अंगच्याचि असमर्थ त्या ॥ कल्पना आटल्या । पंक्ती उठोनि गेल्या । लक्ष्णांच्या ॥५५॥

साधने मागल्या पाऊली । व्यर्थ होऊनि गेली । प्रतीतीने सोडिली । वाट प्रत्ययाची ॥५६॥

येथ निर्धारासह विचार । निमोनि जाहला साह्यकर । स्वामीच्या संकटीं शूर- । योद्धा जैसा ॥५७॥

बोधरूप ब्रह्मापुढे लाजली । बोधवृत्ती नाहीशी जाहली । एकलेपणे पांगुळली । प्रतीती जेथ ॥५८॥

अभ्रकाचे चकतीत । थर पदर वसतात । वेगळे करू जाता, होत । नाहीशीच ती ॥५९॥

वा उबेने केळ गदमदली । सोपटी गळुनि पडली । तर कैसी उभी राहिली । केळ मग ? ॥६०॥

तैसे अनुभाव्य ते अनुभविता । दोहींसह अनुभव जाता । मग त्या परस्परात आता । कैसा संबंध उरे ? ॥६१॥

अनुभवा या येथवर । टिकावया न अवसर । तेथ शब्दांचे अवडंबर । करील काय ? ॥६२॥

परावाणी लुळी होई । तेथ नादाचा न उठे सळही । मग ओठांवरी वावरावी । हे कैसे होय ? ॥६३॥

पूर्ण जागृति येता । जागविण्याच्या कासया कथा ? । का लागे तृप्त होत्साता- । रांधपापाठी ? ॥६४॥

उगवता दिवसपती । दिवे झोपी जाती । पिकल्या शेतीं घालिती । नांतर काय ? ॥६५॥

म्हणोनि बंधमोक्षाचे निमित्त सरले । तयाचे कामचि नुरले । आता निरूपणाचे लाधले । कवतिक ॥६६॥

आपण वा कोणी विसरावे । आणि वस्तूने हरवुनि जावे । मग शब्देंचि लागे घ्यावे । आठवूनिय; ॥६७॥

अहो, याहुनी काही । शब्दासी चांगुलपण नाही । जरि ऐसा कीर्ति मिरवी । स्मारकत्वें जगीं ॥६८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP