खेळगीते - किस बाई किस
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
किस बाई किस
इथं मुंगली चावली ग मालनीबाय
इथं कल आली ग मालनीबाय
एवढी एवढी झाली ग मालनीबाय
लग्न कधी झालं ग मालनीबाय
सोमवारी झालं ग मालनीबाय
किस बाई किस
दोडका किस
दोडक्यानं पाणी
घाल माझी येणी
येणीला गोंडा
न् चक्री शेंडा
किस बाई किस
इथे मुंगी चाचली ग मालनबाई
इथे कळ आली ग मालनबाई
छातीएवढी वाढली ग मालनबाई
लग्न कधी झाले ग मालनबाई
सोमवरी झाले ग मालनबाई
किस बाई किस
दोडका किस
दोडक्याचे पाणी
घाल माझी वेणी
वेणीला बांध गोंडा
न् घाल चक्री अंबाडा
सुरुवातीच्या दोन ओळी अनुक्रमे पायाचे अंगठे-गुडघ, कंबर-खांदे, गाल-डोके अशा जागी हाताची बोटे टेकवत तीन वेळा म्हटल्या जातात. त्यानंतर दोन्ही हात केसांच्या अंबाड्यावर धरून मागे-पुढे उड्या मारत फ़ेर धरला जातो
पोरींच्या खेळातलां जिखणॉं
१. वंडा बाय वंडा सागाचा वंडा
जगन पोर्याचा मोरलाय मेंडा
२. तूस बाई तूस भाताचा तूस
बल्या पोर्याचा पाडलाय भूस
३. को को कोंबडा कोकीतो
बल्या पोर्या शिडीला वोखीतो
४. म्हतारे खडकावं
पोरांना माकड हेडकावं
मुलींच्या इतर खेळांमधील उखाणे
१. ओंडक्यात ओंडका सागाचा बाई
मन मोडली तो उचलून जगनची
२. तूसात तूस बाई भाताचे
खेळात भूस पाडले बल्याचे
३. को को कोंबडा जसा नुसता आरवतो
बल्य तसा शिडीकडे नुसता बघतो (शिडीवर चढत नाही)
४. म्हातार्या खडकावर
पोरांना खिजवतेय माकड
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP