खेळगीते - फ़ुगडीचे उखाणे
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
१. माझ्या ओटीत आवळे ग आवळे
कलूला झाले कावळे ग कावळे
२. जर माझ्या अंगावर पडशील
तर माझी सवत होशील
३. एकच पाय हलवीते
स्वतःहून नवर्याला बोलावीते
४. चला चला भावजी बनात जाऊ
कोचळी काकडी वाटून खाऊ
हा हा मेला मला फ़सवतो
तंगडीत तंगडी घुसवतो
५. माझ्या चुलीवर तवा ग
कालीचा नवरा नवा ग
माझ्या हातावर चुना ग
सूनीचा नवरा जुना ग
६. लाडू बाई लाडू
म्हातारपणी नवरा केला
(तर त्याने माझ्या बहिणीशीही लग्न केले...)
तो झाला साडू
७. शिराईची काडी काडी तुटत नाही
माझी सवत फ़ुगडीत थकत नाही
८. लसणाचा कांदा लवकर
सोलला जात नाही
अत्शी माझी सवत (थकले असे) बोलत नाही
९. तुझे अंग जणू होळीची काठी
मेल्या, नको मारू मिठी...
सहा रंगी फ़ुगड्या खेळू शकतो
(केवळ) आत्याचा नवरा!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP