खेळगीते - चला पोरांनो
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
चला पोरांनो
चला पोरांनो वांगेन जाव...
वांगेत काटं खुपत्यातं!
चला पोरांनो मिरच्यान् जाव..
मिरच्यान् तिखट लागेतं!
चला पोरांनो भितीवं जाव..
भितीवं मुरकुट चावीतं!
चला पोरांनो उखलावं जाव..
उखलावं वहिनी कांडीते!
चला पोरांनो जात्यावं जाव..
जात्यावं सालुंकी दलीते!
चला पोरांनो घरानं जाव..
घरात मामा झोपलाये!
चला पोरांनो चुलीशी जाव..
चुलीशी बाई रांधीते!
एक पोर टोंघीतं टोंघीतं
त्याचा मुसकुट फ़ोडावा,
सगल्या पोरांना वाटावा;
वइवं वालत घालावा!
चला मुलांनो
चला मुलांनो वांग्यांच्या वाफ़्यात जाऊया...
नको नको, वाग्यांचे काटे टोचतील!
चला मुलांनो मिरच्यांच्या वाफ़्यात जाऊया...
नको नको, मिरच्यांनी अंगाची आग होते!
चला मुलांनो भितीवर चढूया...
नको नको, भिंतीवर डास चावतात!
चला मुलांनो उखडळाकडे जाऊया...
पण उखळावर वहिनी कांडते आहे!
चला मुलांनो जात्याकडे जाऊया..
जात्यावर साळुंकी दळते आहे!
चला मुलांनो घरातच जाऊया..
घरात तर मामा निजला आहे!
चला मुलांनो चुलीजवळ जाऊया...
पण चुलीशी ताई रांधते आहे!
एक मुलगा असे सारखे अडवतो आहे,
आता त्याचे थोबाड फ़ाडकन् फ़ोडावे;
फ़ोडून सगळ्या मिलांना वाटून द्यावे,
उरलेसुरले कुंपणावर वाळत घालावे!
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP