खेळगीते - नारल
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
नारल
मोरा बैल वावल
खडकी आंबा लावला
ये रं पाण्या डोंगरचे
एक नारल फ़ोडीन
सगले पोरांना वाटून दीन
एक पोर उरला
बासला जाऊन सांगला
बासनी दिला दांडाचा
आसनी दिला मुंडाचा
मुंड पडला काले कुतूचे अंडावं
न् कुत्रा गेला घाटावं
(मोरा बौल-तोंडावर ठिपके असलेला बैल, वावला-गाठ असलेला, मुंड-मुसळ)
नारळ
मोरा बैल, गाठ असलेला
खडकावर आंबा लावला
ये रे पाण्या डोंगराहून
एक नारळ फ़ोडेन
सगळ्या पोरांना वाटून देईन
एक पोरगा राहिला चुकून
त्याने बापाला सांगितले जाऊन
बापाने मारले दांडक्याने
आईने मारले मुसळाने
मुसळ पडले काळ्या कुत्र्याच्या अंडावर
आणि काळा कुत्रा गेला मसणाघाटावर
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP