मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मुक्तेश्वर आख्यान| अध्याय १८ वा श्री मुक्तेश्वर आख्यान कथा अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १८ वा ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे. Tags : mukteshvarpuranपुराणमुक्तेश्वर अध्याय १८ वा Translation - भाषांतर श्री गणेशाय नम: ॥ श्री गुरुभ्यो नम: ॥भवानीवरा भक्तपालका ॥ भोगी भूषणा भूतपालका ॥ भाविक रक्षका भवभय हारका ॥ भक्त रक्षका भवशोषणा ॥१॥त्रीताप शमना त्रीदोष हारका ॥ त्रीगुणातीता त्रीपुरातका ॥ त्रीभुवन जनका त्र्यंबका ॥ त्रयरक्षका त्रीकांडवेद्या ॥२॥तुझ्या कृपा बळे समस्त ॥ सप्तदश अध्याय परियंत ॥ कथीले मुक्तेश्वर अख्यान समस्त ॥ आता कळस अध्याय आठरावा ॥३॥धर्मशास्त्रांची घेउनी नीती ॥ आणीक पुराणीची पाहे स्थीती ॥ श्रोते ग्रंथ पाहोनी निश्चीती ॥ आचरावे यथा आदरे ॥४॥ हें कथा वाचीता निश्चीती ॥ निपुत्रीका सुपुत्र होती ॥ वृध्दी होईल गुण ज्ञान मूर्ति ॥ दरिद्री होती भाग्यवंत ॥५॥प्रथमोध्याय मंगळाचरण ॥ गणेश सरस्वती गुरु स्तवन ॥ गुरुमहिमा सांगोन ॥ प्रथमोध्याय संपविला ॥६॥द्वीतियोध्यायें संपता तेथे ॥ तप करी जानुमंडळ दैत्य ॥ व्हावया इंद्रदिकाचे स्थानप्राप्त ॥७॥इंद्रादिदेव गजबजीले ॥ महेशाशी शरण गेले ॥ मग मुक्तदेवासी निर्मीले ॥ तृतीयोध्याये ही कथा ॥८॥मुक्तदेव तेथोनी निघत ॥ जानुमंडळ यज्ञास विघ्न करीत ॥ मुक्तेश्वर तत्काळ सैन्य संहारीत ॥ चतुर्थोध्याये कथन पै ॥९॥जानुमंडळास संहारिले ॥ मुक्तदेव केलासा गेले ॥ देवे तयाचे लग्न केले ॥ हेची कथन पंचमोध्यायी ॥१०॥राजी स्थापून मुक्तेश्वर॥ शिव म्हणे जानुमंडळ शरीर ॥ व्यर्थ न जाउ द्यावे निर्धार ॥ हेचि कथन षष्टमोध्यायी ॥११॥मुक्तेश्वर पुत्र इच्छे करुन ॥ स्वभार्या सह गेले वना लागून ॥ ऋषी पत्न्या सह शिवपुजून ॥ सप्तमोध्याय संपविला ॥१२॥मुक्तदेव केले सूर्य स्तवन ॥ वर दीधला तया लागून ॥ अष्टपुत्र होतील तुज कारण ॥ हेचि अष्टमोध्यायी ॥१३॥मुक्तदेव वनी देखता ॥ चक्रवाके पूर्व दोषे क्रीडता ॥ देखाताचि तत्वता ॥ मुक्त झाले नवमोध्यायी ॥१४॥दशमोध्यायी हेचि कथन ॥ मुक्तदेवासी पुत्र झाले सगुण ॥ त्याचा विवाह विधी करुन ॥ ऋषीनी वेदोक्त संपविला ॥१५॥एकाद शोध्यायात ॥ मुक्तदेवाची भार्या पावली अंत ॥ त्या दु:खयोगे वनांत ॥ तपा लागी गेला पै ॥१६॥बारावे आध्यायी विशेष ॥ ऋषीने शापीले मुक्तपुत्रास ॥ तेराव्यात मुक्तदेव शरण शिवास ॥ शापमुक्त पुत्रा करविले ॥१७॥चौदावा पंधरावा अध्याय सुरस ॥ ऋषी पत्न्यानी बोधीले मुक्तदेवास ॥ शापमुक्त पुत्रा करविले ॥१८॥चौदावा पंधरावा अध्याय सुरस ॥ शिव पार्वती येऊन त्यास ॥ आपले स्वरुपी मेळविले ॥१९॥सोळावे सतरावे अध्यायी कथन ॥ गोत्राचार धर्म त्या लागुन ॥ शिवे त्यासी सांगितले ॥२०॥प्रथम ग्रंथास वरदेवून ॥ सांगितले सकळध्यायाचे कथन ॥ सद्गुरु प्रसादे संपादून ॥ अष्टदशोध्याये संपविला ॥२१॥धन्यशंकरा चार्य शिवमूर्ती ॥ त्याचे कृपेने यथा मति ॥ शिव वचन प्रमाण निश्वीती ॥ गुरु परंपरा ज्योती माझे ॥२२॥ ब्रह्मानंद परात्पर सगुण ॥ सहजानंद अगीचर जाण ॥ योगानंद परीपूर्ण ॥ सज्ञान घन ज्ञानानंद ॥२३॥विमळानंद अगोचर ॥ सच्चिदानंद अपरंपार ॥ रामानंद सकळ विस्तार ॥ कथा अगोचर वर्णिली ॥२४॥शके सत्राशेनव्यानवास ॥ ईश्वर नाम संवत्स रास ॥ अश्वीन कृष्णपक्ष एकादशीस ॥ गुरुवारी अख्यान संपविले ॥२५॥इति श्री ब्रह्मांड पुराणतिहास ॥ भविषोत्तराचा अर्थ विशेष ॥ धर्म शास्त्र प्रमाण त्यास ॥ कथा सायास कथीयेली ॥२६॥इति मुक्तदेव अख्यान समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभंभवस्तु ॥ अभयस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : February 07, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP