मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मुक्तेश्वर आख्यान| अध्याय १५ वा श्री मुक्तेश्वर आख्यान कथा अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १५ वा ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे. Tags : mukteshvarpuranपुराणमुक्तेश्वर अध्याय १५ वा Translation - भाषांतर श्री गणेशाय नम: ॥ श्री दत्तात्रेयाय नम: ॥ऐंसे किती येक काळ झालिया-वरी ॥ मुक्तदेवे आठविले त्रीपुरारी ॥ आठविताची त्रीशूळधारी ॥ सर्व गौरी घेऊनी पातला ॥१॥म्हणे घडी घडी आठवित ॥ काय संकट पडीले तूं तें ॥ मुक्त म्हणे व्यर्थ ॥ स्त्रींया वीण राह ना ॥२॥ऐंसे ऐकूनी शिवेमात ॥ समाग:मे घेतले त्यांतें ॥ कैलासा नेउन प्रभावतीं तें ॥ दोघे एकत्र मिळाले ॥३॥कैलासी राहीले मुक्तदेव ॥ शिव पूजोनी स्वभावे ॥ तै पासोन वंशोध्दव ॥ पृथ्वीवर चालत ॥४॥अष्टपुत्राची उत्पत्ती ॥ आर्य क्षत्रीय त्या म्हणती ॥ शिव पुत्र म्हणोने ख्याती ॥ सोमवंश तयाचा ॥६॥ आर्या वंश कृतकृत्य ॥ द्वापार युगी राज्य करीत ॥ शापा मुळे कलियुगांत ॥ व्यापार ऐंसे करु लागले ॥७॥ऐंसे मुक्त देवाचे अख्यान ॥ ब्रह्मांडपुराणी वर्णन ॥ वर्ण वैभव खंड प्रमाण ॥ ब्रह्म नारद संवाद तो ॥८॥मुक्ताख्य व्यास ऋषी वक्ता ॥ भविषोत्तर पुराणीची ही कथा ॥ धर्मं शास्त्र हे पाहता ॥ कर्म युक्त वर्णिले ॥९॥पुढले आधाइ कथा सुरस ॥ शिव दया करी मुक्तवंशास ॥ ब्रह्मानंदिनी देविस ॥ श्रवण करोत विद्वद्जन ॥१०॥इती ब्रह्मांड पुराणेतिहास ॥ धर्म शास्त्र प्रमाण त्यास ॥ पंचदशोध्याय गोड हा ॥११॥श्री कृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : February 07, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP