श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय २ रा

ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.


॥श्री गणेशाय नम: ॥ श्री शंकराय नम: ॥
सूत म्हणे ऋषी समस्ता ॥ ब्रह्मांडपुराणी वर्णिली कथा ॥ स्वयं व्यास देव वव्ता ॥ तेची आता सांगेन ॥१॥
भविष्योत्तर पुराणी वर्णिली । आणि धर्मंशास्त्री सांगितली । बहुतेक पुराणे वर्णिली ॥ साक्षेपे ही कथा । ब्रह्मांड पुराण धर्मंशास्त्र ॥२॥
भविष्योत्तर पुराणी सुपवित्र ॥ ऋषी समस्त ऐका स्वगोत्र देवोणी श्रोत्र परिसा हो ॥ जानुमंडळ महा दैत्य ॥ अग्नी मेरु शिखरी तपकरीत ॥ भोवते द्वादश योजनें परियंत ॥ आग्नी कुंड चेताविले ॥४॥
मध्ये तप करी निशाचर ॥ ब्रह्मारंध्री ठेविला ॥५॥
समाधिस्त होउनी ठैला ॥ स्फूर्ति शरीरी नाही त्या ॥६॥
ह्रदयी चिंती ब्रह्मरुपाला ॥ ब्रह्मी ब्रह्म होउनी गेला ॥ स्फूर्ती शरीरी नाही त्या ॥७॥
कारण ऐका सर्वंत्र ॥ त्रिभुवन राज्य घ्यावया समग्र ॥ जिंकावया इंद्रादी देव सर्वंत्रा ॥ साधुनी परत्र बैसला ॥८॥
ऐसे किती एक काळ झाल्यावरी ॥ ब्रह्म प्रसन्न झाला ते अवसरी म्हणे काय इच्छितो अंतरी ॥ ते परोपरी माग आता ॥९॥
जाणू मंडळ म्हणें स्वामी ॥ लक्ष आमुचे पर ब्रह्मी ॥ हेची मागतो पाद पद्मी ॥ त्रीभुवनी आम्ही राज्य करावे ॥१०॥
आवश्य म्हणोनी ब्रम्हांड बोलीला ॥ अजिंक्य होसी त्रीभुवनाला । शिवपुत्र होईल आयोनीला । तो तुजला वधील ॥११॥
ऐसा वर ठेवूनी या सत्यपुरीस गेला चतूरानन ॥ मग चिंताक्रांत देव होऊन ॥ समस्त पडिले ते वेंळी ॥१२॥
इति श्री ब्रह्मांड पुराण इतिहास ॥ भविष्योत्तराचा अर्थ विशेष । धर्मशास्त्र प्रमाण त्यास ॥ द्बितियो ध्याय गोड हा । श्री सांबसदा शिवार्पंणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 06, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP