मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री मुक्तेश्वर आख्यान| अध्याय १४ वा श्री मुक्तेश्वर आख्यान कथा अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय १४ वा ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे. Tags : mukteshvarpuranपुराणमुक्तेश्वर अध्याय १४ वा Translation - भाषांतर श्री गणेशाय नम: ॥ जो सच्छीदानंद निर्मळ ॥शिव शांत ज्ञान धन अचल ॥ जो भानुकोटी तेज अढळ ॥ सर्व काळ व्यापक जो ॥१॥किती एक काळ झालियावरी ॥ मंद्राचळ पर्वती वास करी ॥ एक दोन पुण्ये तीर्थ करी ॥ प्रभावतीची मुक्तदेवा ॥२॥मेळविले रुषी समस्त ॥ ऋषी पत्न्या पातल्या पतिवृता ॥ स्वयेंपाक केला सिध्दता ॥ ऋषी पत्न्या मिळोनी ॥३॥वेदोक्त वीधी मार्ग करुनी ॥ मग पूजील्या सुवासिनी ॥ दु:ख वाटले मुक्तदेवा लागुणी ॥ भार्या विणे जीर्णे व्यर्थ हो ॥४॥पत्नी वाचोची धीग्ग जीर्ण ॥ बाळका वाचून घर स्मशान ॥ ऐंसे ऋषी समस्त ऐकोन ॥ तया प्रती बोलीले ॥५॥ ऋषी म्हणे तया समस्ता ॥ ऐंसे परंपरा होत असता ॥ कार्य करुन आता ख्यांता ॥ शिवे बोधीले ते सत्ये असे ॥६॥एक जाती एक येती ॥ नाशीवंत असे सर्व जगती ॥ त्रैलोक्य मेरु खचती ॥ प्रळये होता सर्व ही ॥७॥ परी आत्मा शाश्वत अविनाश ॥ निराकार शक्ती समागमे वसे ॥ काय करावे गंधर्व हु:ड्या सारीखे ॥८॥मृग जळ न्याये संसार ॥ जैसे स्वप्नी देखे रत्न मंदीर ॥ जागृती माजी मिथ्याच्यार ॥ तैसा संसार व्यर्थ हा ॥९॥ऐंसे बोधोनी तयास ॥ संतोष केले मुक्तेस्वरास ॥ ऋषी पत्न्या सहित आश्रमास ॥ गेले स्वग्रहास आपुल्या ॥१०॥इतो ब्रह्मांड पुराणेतिहास ॥ भविषोत्तराचा अर्थ विशेष ॥ धर्म शास्त्रा प्रमाण त्यास ॥ चतुर्दशोध्याय गोड हा ॥१४॥ ओव्या ॥११॥ N/A References : N/A Last Updated : February 07, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP