श्री मुक्तेश्वर आख्यान - अध्याय ८ वा

ब्रह्मांड पुराण वर्ण वैभव खंडामधील ब्रह्म व नारद यांच्या संवादात श्री मुक्तेश्वर पुराण सांगण्यात आले आहे.


श्री गणेशाय नम: ॥ श्री सांब सदाशिवाय नम: ॥
नृपति मुक्तदेव आपण ॥ मांडीले सूर्याचे आराधन ॥ सूर्य मंडळ लक्षुन ॥ द्वादश प्रदक्षणा घातल्या ॥१॥
करुन साष्टांग दंडवत ॥ एक पदी उभा राहत ॥ मग लक्षुन रवी मंडळात ॥ आरंभी स्तुती तेधवा ॥२॥
जय जयाजी भास्करा ॥ जय जयाजी रवी दिनकारा ॥ जय जयाजी गभस्ती उदारा ॥ उद्यासी थारा तुझेनी ॥३॥
जय जयाची मार्तंडा ॥ जय जयाजी प्रचंडा ॥ जय जयाजी प्रलय खंडा ॥ प्रकाश उदंड तुज पासोनी ॥४॥
जय जयाजी सप्त मुख आश्व वहना ॥ जय जयाजी प्रकाश गहना ॥ जय जयाजी भक्त पालना ॥ रक्षी दीना आम्हाते ॥५॥
ऐसी स्तुति करिता ॥ सूर्य प्रसन्न झाला त्वरिता ॥ म्हणें इच्छीले माग आता ॥ काय निमित्य प्रार्थिले ॥६॥
म्हणें स्वामी दिनकरा ॥ पुत्रविण व्यर्थ संसारा ॥ वंश वृध्दि कारण दाता ॥ तुजला उदय धरा प्रार्थीले ॥७॥
ऐंसे ऐंकून करुण वचन ॥ मग म्हणें सूर्य नारायण ॥ तुज अष्ट पुत्र होतील जाण ॥ कळा संपूर्ण त्यांपासी ॥८॥
सर्व लक्षणी संपूर्ण ॥ धीर वीर वीचक्षण ॥ आयुष्य वृध्दि जाण ॥ त्यांज पाऊस वंश वाढेल ॥९॥
जव परियंत माझे गमन ॥ पृथ्वीवरी असे जाण ॥ तव वरी तू ज्ञाजवंश वर्धमान ॥ असो संपन्न सर्व लक्षणी ॥१०॥
नाना कळा दावी विचित्र लक्षणी ॥ यशसर्व काळ तया लागोने ॥ ऐंसे वर देवोनी दिन मणी ॥ गेला असे गमनार्थ ॥११॥
ऐंसा वर झालिया वरी ॥ मुक्तदेव सपत्नी क्रीडा करी ॥ ऋषी पत्न्या ते अवसरी ॥ आपल्या आश्रमा प्रती पै गेले ॥१२॥
इति श्री ब्रह्मांड पुराणेतिहास ॥ भविष्योत्तराचा अर्थ विशेष ॥ धर्मं शास्त्र प्रमाण त्यास ॥ अष्टमोध्याये गोड हा ॥१३॥ श्री कृष्णार्पणम्‍ अस्तू ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP