जय मृत्युंजय - शपथ सांगतो ! राष्ट्रपतीपद...
गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे.
शपथ सांगतो ! राष्ट्रपतीपद राहो ज्याचे त्याला ।
राष्ट्रपती या पदावांचुनी मज तो मान मिळाला ॥धृ०॥
हारांनी मस्तक नत झाले,
दर्शनास्तवे लोक भुकेले
उपहारानी कर भरलेले
उधाण येई नगरोनगरी स्नेहाविष्काराला ।
राष्ट्रपती या पदावांचुनी मज तो मान मिळाला ॥१॥
झालो परि मी राष्ट्रपती जर
विसंबून तुमच्या इच्छेवर
बघा देश दो वर्षानंतर
असेल भारत शस्त्रास्त्रांनी स्वयंपूर्ण झालेला ।
राष्ट्रपती या पदावांचुनी मज तो मान मिळाला ॥२॥
फिरेल सेना सीमेवरती
राहतील नभयाने फिरती
कोण शत्रु मग भू कातरती?
मानतील ते समर्थ, सात्विक तेव्हा या देशाला ।
राष्ट्रपती या पदावांचुनी मज तो मान मिळाला ॥३॥
निर्माण्या चालतील निशिदिन
यंत्रांचे करण्या उत्पादन
होईल युक्तीने जलवितरण
अन्नाची कां चिंता आम्हां करता वश वरुणाला ।
राष्ट्रपती या पदावांचुनी मज तो मान मिळाला ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP