ध्यानदीप - श्लोक १०२ ते १२०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


तो समाधी करो किंवा त्याच्या हृदयांतील सर्व आस्थांचा नाश झाल्यामुळेंक त्याला कशाची गरज नाही. ॥१०२॥

तो कर्म करो, किंवा संन्यास घेवो; तो समाधि करो, किंवा जप करो; त्याच्या मनांतील सर्व वासना समुळ नष्ट झाल्यामुळे तो कसाही राहिला तरी चालते. ॥१०३॥

खरेच आहे कीं आत्मा असंग आहे आणि त्यावाचुन बाकी सर्व मायिक इंद्रजाला आहे असा त्या धन्य पुरुषाचा निश्चय झाला त्याच्या मनांत वासनेचा अंकुर कसा राहिल ? ॥१०४॥

ह्माणुन ज्याला प्रसंगच नाहीं. त्याला अति प्रसंग तरी कोठुन असणार ? जेथें प्रसंग आहे तेथेंच अति प्रसंगाची शंका ॥१०५॥

लहान मुलाला कोणाच्याही कर्माचा विधि निषेध नसल्यामुळे अति प्रसंगाचा दोष लागत नाही. ॥१०६॥

शि०- बाळ अगदीं अज्ञ असतो ह्माणुन त्याला तो दोश लागत नाही. गु०-तत्त्ववेत्ता सर्वदा असतो ह्मणुन त्यालाही तो दोष लागत नाही. शि०- मग विधि निषेध कोनी बाळगावेत ? गु०- अल्पज्ञ लोकांनी ते अज्ञान्यालाही नाहींत व सर्वज्ञालाही नाहींत ॥१०७॥

शि०- आह्मीं असें ऐकितों कीं, शापानुग्रह सामर्थ्यं असणें हे तत्त्ववेत्यांचें मुख्य लक्षण आहे. तें ज्याला नाहीं तो ज्ञानीच नव्हे गु०- तसं समजणें ती अगदींच चुक आहे. तें सामर्थ्य ज्ञानाचें फळ नव्हे तर केवळ तपाचें फळ आहे. ॥१०८॥

शि०- व्यासादिक जे ज्ञानी होऊन गेले त्यांचे आंगी तें सामर्थ्यदिसत होतें गु०- त्यांचें कारण असें कीं ते ज्ञानी असुन तपस्वीही होते ह्मणुन त्यांचे आंगीं ते सामर्थ्यहोतें पण तें काहीं ज्ञानाचें फळ नव्हे. ज्ञान होण्यालाही एक प्रकारचें तपच पाहिजे. पण शापादि सामर्थ्यास कारणीभुत तपापासुन तें ज्ञानजनक तप निराळें आहे त्यापासुन ज्ञानच होतें ॥१०९॥

तीं दोन्हीं तपें ज्यानें केली असतील त्याला ज्ञान आणि सामर्थ्य हीं दोनही फळे मिळतात आणि एकच कारणाराला एकच फळ मिळतें ॥११०॥

शि०-विधि निषेध रहित असा तत्त्ववेत्त्याच्या आंगीं शापादि सामर्थ्य जर नसेल तर त्याची विधिपुर्वक कर्मानुष्टान करणारे पुरुष निंदा करितात. गु०- करीतना बापडे ! असं निंदा करणारे पुरुष तरी निंदेंतुन कुठें सुटले आहेत ? त्यांचीही निंदा करण्यास विषयलंपट पुरुष तयार आहेतच ? ॥१११॥

शि०- यातीनीं भोगतुष्टीकरितां भिक्षा मागितली व वस्त्रादिकांचे संरक्षण केलें ह्मणुन दोश काय ? गु०- मग त्यांचें यातित्व काय विचारावें ! त्यांचें वैराग्य किती म्हणुन वर्णावें ॥११२॥

शि०- विषयलंपटांनी केलेल्या निंदेनें वर्णाश्रम पाळणार्‍या पुरुषाची मुळींच हानि नाहीं. गु०- मग देहाला मी ह्माणणार्‍या कर्मठ पुरुषानें ज्ञान्याची निंदा केली असतां त्याचा तरी काय तोटा आहे ? ॥११३॥

शि०- मग तर तुमचें ह्मणणे काय तें तरी सांगा ? गु०- आमचें ह्मणणे इतकेंच कीं तत्त्वज्ञान झाल्यानें व्यवहारांची देहेंद्रियादिक साधनें ज्या अर्थी नष्ट होत नाहींत त्या अर्थी राज्यदिक व्यवहार करण्यास त्याला कोणची जड आहे असें कांहीं नाहीं. ॥११४॥

शि०- तत्त्ववेत्याला सर्व प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय झाल्यामुळे त्याविषयीं त्यांची इच्छा कशी राहील ? गु०- राहतें असें आमचें तरी कोठें ह्मणणें आहे ?ती कांहीं वेळ ध्यानांत व कांही तत्त्ववेत्ता आणि उपासक यांमध्यें भेद काय ? गु०- भेद इतकाच कीं, तत्त्ववेत्याला जसें पाहिजें तसें राहतां येतें तसें उपासकास राहतां येत नाहीं. ज्या अर्थीं विष्णु आदि दैवतांप्रमाणे त्याचा ब्रह्मापणा ध्यानानेंच केला आहे. त्या अर्थीं त्यानें सदा सर्वदा घ्यानतर असलें पाहिजे ॥११६॥

शि०- मग त्या ध्यानानें झालेल्या ब्रह्मातेला हानी कोणची ? गु०- ध्यान जोंपर्यंत आहे तोंपर्यंत कांहीं त्याला हानी नाहीं. ध्यान नष्ट झालें कीं ती नष्ट झाली. कारण ती ध्यानाचीच बनलेली आहे. ॥११७॥

शि०- ध्यान गेलें असतां जशी ब्रह्माता नाहीशीं होत तशी ज्ञानगेल्यानेंही ती नाहीशी होईल. गु०- तसें कधींहीं होनार नाहीं. कारण ज्ञान्याची ब्रह्मता, ज्ञानाचें नवीन झाली असं नाहीं; तर मुळचीच सिद्ध आहे केवळ ती ज्ञानानें प्रकाशित मात्र केली; ह्मणुन प्रकाशित करणारें ज्ञान जरी नष्ट झालें तरी ती जशाची तशीच असते. याकरितां ब्रह्मास दाखविणारें जें ज्ञान तेंत्यास नवीन बनवीत नाहीं. म्हणुन ते गेल्यानें सत्य ब्रह्मास्वरुप नष्ट होत नाहीं. हे उघड आहे. ॥११८॥

शि०- ज्ञान्याप्रमाणें उपासकाचीही ब्रह्मता खरीच आहे. गु०- त्या दृष्टीनें पाहिलें असतां अज्ञानी मनुष्यांची व पशुपक्ष्यादिकांचीही ब्रह्मता खरी आहे. ॥११९॥

शि०- पण त्याच्या अज्ञानामुळे ती असुन नसल्यासारखी आहे. मग त्यांत पुरुषार्थ कोणता? गु०- ही गोष्ट अज्ञानामुळे ती असुन नसल्यासा रण त्यालाही ज्ञन नसतें शि०- मग उपासना कशास सांगतां ? गु०- आह्मी जी उपासना सांगतों ती केवळ उपवासात वरं भिक्षा या न्यायानें सांगतीं उपाशी मरण्यापेक्षा जशी भिक्षा बरी तसें इतर अनुष्ठानापेक्षा ध्यान बरें ॥१२०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP