ध्यानदीप - श्लोक २१ ते ४०

'सार्थपंचदश्याम्' या ग्रंथात श्रीशंकराचार्यांनी मानवाच्या आयुष्यातील तत्वज्ञान सोप्या भाषेत विशद केले आहे.


जरी शास्त्राचें ठायीं महावाक्यांनीं ब्रह्मा चें प्रत्यक्ष ज्ञान होण्याजोगें वर्णन केलें आहे तरी त्याचा अर्थ मुढास समजत नाही. कारण कीं देहादिकाला मी म्हणणे अशी जी भ्रांति ती सतत असल्यामुळे पुरुषास मी ब्रह्मा आहें. असें ज्ञान मंदबुद्धिमुळे होत नाही. ॥२१॥

शि०- बुद्धिमाद्यांमुळे ज्यला अपरोक्ष ज्ञान होत नाहीं त्याला परीक्ष ज्ञान तरी कसें होईल ? गुरु शास्त्रावर जर मनुष्याची श्रद्धा असेल तर तेवढ्यानें त्यास ब्रह्माचें पसेक्षज्ञान होतें कारण प्रत्यक्ष देहादिकांचा भ्रम जसा अपरीक्ष ज्ञानाच्या आड येतो तसा परिक्षा ज्ञानाच्या आड येत नाही. विष्णुनें प्रतिमेंत विष्णुत्वविषयीं संशय नाहीं ॥२३॥

शिष्य.- कित्यकांना त्याविषयीं शंका येते गुरु- ज्यांना श्रद्धा नाहीं त्यांना संशय येत असेल परंतु तो आह्मी जमेल घरीत नाहीं कारण सर्व वैदिक विषयामध्ये श्रधालु पुरुषच अधिकारी आहेत ॥२४॥

आप्ताच्या सऋदुपदेशानें जर परोक्षज्ञान होतें तर विष्णुमुर्तीच्या शास्त्रोक्त उपदेशापासुन परोक ज्ञानकां न व्हावें. याविषयीं फाराच विचार नेलगे. ॥२५॥

शिष्य मग शास्त्रानें तरी त्याचा विचार कां केला :? गु०- ज्या कर्माचें किंवा उपासनेचें अनुष्ठान करावयाचें तें वेदाच्या अनेक शाखांमाध्यें निरनिराळ्या रीतीनें सांगितलें आहे त्याची एकवाक्याता शास्त्रविरांवाचुन मनुष्यास होणें कठीण आहे म्हनुन तो विचार अवश्य आहे. याकरितां तसा शास्त्रांनें विचार केला ॥२६॥

एरव्ही जों श्रद्धालु पुरुष आहे त्याला विचाराची गरज नाहीं. कारण नैमिन्यादिक आचार्यानीं कल्पसुत्रांहीं करुन जो उपासनेचा निर्णय केला आहे तेवढा त्याच्या अनुष्ठानास बस आहे ॥२७॥

शिष्य.- उपासना करणास विचारावांचुन तिचा प्रकार समजण्यास मार्ग कोणता ? गु०- उपासनेंचें अनुष्ठान वसिष्ठादि ऋषी प्रणीत ग्रंथांमध्यें चांगलें सांगितलें आहे. तो प्रकार गुरुमुखापासुन ऐकुन घेऊन मंद बुद्धीच्या लोकांनी उपासना करावी ॥२८॥

शि०- अतर हल्लीचेहीं ग्रंथकार उपासनेचा विचार कां करितात ? गु० ते केवळ आपल्या संतोषाकरितां करितात. वेदवाकयंचा निर्णय करावा असं ज्याच्या मनांत आहे त्याणें हवी तर त्यांची मीमांसा करावी पण अनुष्ठान जर म्हणशील तर तें केवळ गुरुच्या उपदेशमात्रानेंच होतें ॥२९॥

पण ब्रह्मासाक्षात्काराची गोष्ट तशी नाही. तो होण्यास विचार मनुष्यानीं केलास पाहिजे केवळु गुरुच्या उपदेशमात्रेंकरुनच तो होईल असें कधीं कोणी समजु नये ॥३०॥

यांचे कारण असें आहे कीं परीक्ष ज्ञानाला प्रतिबंध काय तो अश्रद्धेचा अविचार हा त्याच्या आड मुळींच येत नाही. पण अपरोक्ष ज्ञानाला प्रतिबंध करणारा अविचारच आहे. ॥३१॥

शि०- विचार करुनही अपरोक्ष ज्ञान झालें नाही. तर कसें करावें गुरु तसें ज्ञान होईपर्यंत पुनः पुनः विचारच करावा दुसरा मार्ग नाही ॥३२॥

शि०-पुनः पुनः मरेपर्यंतही विचार करुन साक्षात्कार झाला नाहीं तर कसें करावें ? गु०- कांहीं प्रतिबंध असतात ते ह्मा जन्मीं नष्ट न झालें तर पुढील जन्मी त्यांचा नाश होऊन आत्मप्राप्ति होईलच ॥३३॥

शि० असं कोठें सांगितलें आहे ? गु०- "इहवाऽमुत्रवाविद्या" असें व्यासाचें सुत्र आहे तसेंच " शृण्वतोऽप्यत्रबहवो यन्नविद्यु" असें श्रुतिप्रमाणहे आहे ॥३४॥

शि०- असा साक्षात्कार कोणाला झाला ? श्रुतीमध्यें वामदेवांची कथा तुं ऐकिलीच असेल त्यांला पुर्वाभ्यासामुळें गर्भातचा असतांना साक्षात्कार झाला कीं जसें आज पाठ केलेलें उद्यां आठवतें ॥३५॥

पुष्कळदां एकच श्लोक पाठ करुनही जर त्यास दिवशी तो न आला तरी दुसरे दिवशी तो आपोआप आठवतो ॥३६॥

ज्याप्रमाणें कृषि गर्भ इत्यादिक पक्क होण्यास काळ लागतो त्याप्रमाणें आत्मविचारही हळू हळुच पक्क होतो ॥३७॥

शि०- पुनः पुनः विचार करुनहीं ज्ञान होत नाहीं असें कोठें कोठें सांगितलें आहे गु०- तत्त्वज्ञानास अडथळा करणारा तीन प्रकारचे प्रतिबंध आचार्यानीं आपल्या वार्तिकांस चांगल्या रीतीनें सांगितले आहेत ॥३८॥

तेथें ज्ञानाची प्राप्ति कशानें होतें अशा शिष्यप्रश्चावर गुरुंनी उत्तर दिलें आहे कीं बाबोर ज्ञान होण्यास तीनप्रतिबंध आहेत एक भावी दुसरा भृत तिसरा वर्तमान ॥३९॥

मनुष्य वेद पडला तरी मुक्त होत नाही. जशाचा तसा कोरडा राहतो. ज्याप्रमाणें धन पुरलेली जागा समजल्यामुळे त्याला तो ठेवा सांपडत नाही ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 18, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP