शि०- यास प्रमाण काय ? गु०- "सोऽकामो निष्काम इति" इत्यादिक श्रुतीनें तापनीय उपनिषदांत उपासनेचें मोक्षरुप फळ सांगितलें आहे. ॥१४१॥
शि०- उपासनेपासुन मोक्षप्राप्ति होते असें आपण ह्मणतां त्यास 'नान्यः पंथाः" या श्रुतीचा विरोध येतो. गु०- तसा विरोध येत नाही. कारण उपासनेपासुन साक्षात मुक्ति होते असें आमचें ह्मणणें मुळींच नाहीं तिचें सामर्थ्यानें ज्ञान होऊन ज्ञानापासुन मुक्ति होते असें आमचें ह्मणणें मुळेंच नाहीं तिचें सामर्थ्यानें ज्ञान होऊन ज्ञानापासुन मुक्ति होते. मग विरोध कसचा ? ॥१४२॥
निष्काम उपासनेपासुन मोक्षप्राप्ति होते असें तापनीय उपनिषदांत सांगितलें आहे. आणि सकामाला ब्रह्मालोक असें शौष्य प्रशनंत सांगितलें आहे ॥१४३॥
शैब्यं प्रश्नात असें सांगितलें आहे कीं, जो ॐकाराची उपासना करतो तो ब्रह्मालोकास जातो; तो समष्टिरुप उपाधिपासुन मुक्त होऊन परम पुरुषाप्रत पावतो. ह्मणजे ब्रह्मा होतो ॥१४४॥
" अमतीकालंबनान्नयति " या बादरावयणाच्य सुत्रांत कतुर्न्याय लाविला आहे. त्याचा अभिप्राय कामानुसारें करुन फलप्राप्ति होत असं ठरतें ॥१४५॥
शि०- मग त्यांना मुक्ति कशी ? गु०- त्या त्या निर्गुण उपासनेच्या सामर्थ्यानें तत्त्वज्ञान होतें. पुनः संसारांत येत नाहीं. कल्पांती तो मुक्त होतो ॥१४६॥
वेदांमध्यें ज्या प्रणव उपासना सांगितल्या आहेत त्या बहुतेक निर्गुण आहेत कचित स्थली सगुण सांगितली आहे ॥१४७॥
पिप्पलादि मुनीनें प्रश्न करणार्या शिष्याला पर आणि अपर ( निर्गुणसगुण ) असे दोन प्रकारचे ब्रह्मारुप ॐकार वर्णिलें आहेत ॥१४८॥
"एतदालंबनम " या वाक्यानें जों जें इच्छिल तें त्यास मिळतें असें यमानें नचि केताला सांगितलें आहे. ॥१४९॥
याकरितां उत्तम प्रकारें निर्गुण उपासना करणाराला या जन्मीं किंवा देहांत कालीं किंवा ब्रह्मालोकीं ब्रह्मासाक्षात्कार होतो ॥१५०॥
आत्मगीतेंतहीं हाच अभिप्राय सांगितला आहे तेथें असं ह्मटलें आहे कीं, विचार करण्यास ज्यांची बुद्धि समर्थ नाहीं त्यांनी एकसारखें सतत उपासनाच केली पाहिजे ॥१५१॥
ज्याला साक्षात्कार होत नाहीं. त्याने निःशंकरपणे माझें ध्यान केलें असतां कालेकरुन त्याच्या अनुभवाला माझे स्वरुप येऊन त्यास खरोखर मोक्षरुप फळ मिळेल ॥१५२॥
ज्याप्रमाणें जमिनींत खोल पुरुन ठेवलेला ठेवा मिळण्याला खणण्यावांचुन दुसरा उपाय नाहीं त्याप्रमाणें माझ्या स्वरुपाची प्राप्ति व्हावी असें ज्याच्या मनांत असेल त्यानें आत्म्यध्यानन केलें पाहिजे; दुसरा उपाय नाहीं ॥१५३॥
एथें मी हाच कोनी एक ठेवा आहे त्याजवर बसविलेला देहरुप घोडा काढुन टाकुन बुद्धिरुप कुदळीनें मनोभुमी पुनः पुनः खणली असतां आत्मठेवा मनुष्यास मिळेलच मिळेल ॥१५४॥
दुसरें वाक्यांचें याविपयीं प्रमाण आहे तें असें कीं जरी साक्षात्कार झाला नाहीं तरी ब्रह्मास्मिक हें चिंतन सोडुं नये. कारण उपासनेच्या सामर्थ्यनें काष्ठपाषाणांत नसलेलें देवपण देखील येतें मग आयतें आसलेलें ब्रह्मपण मिळेल हें सांगायास नको ॥१५५॥
ध्यानांपासुन देहादिकांविषयांचा अभिमान दिवसेंदिवस क्षीण होतो असं प्रत्यक्ष अनुभवास येत असुन जो ध्यानाची उपेक्षा करितो त्याहुन दुसरा पशु कोणता ? सांग बरें ! ॥१५६॥
ध्यानापासुन या मरणाशील देहाविषयींचा अभिमान जाऊन मनुष्य अमर होत्साता यास देही ब्रह्माप्राप्तीचा सोहळा भोगतो ॥१५७॥
याप्रमाणें हा ध्यानदीप तुला सांगितला जो मनुष्य चांगलें याचें चिंतन करील तो सर्व संशय जाऊन सदोदीत ब्रह्माज्ञानांत त्याचा काल जाईल ॥१५८॥