शि०-ब्रह्माची वेद्यता कांहीं खरी नव्हे. गु०- मग ब्रह्माची उपास्य ता तरी कुठें आह्मी खरी म्हणतों शि०- ज्ञान होण्यास वृत्तीची व्याप्ति लागते गु०- उपासनेला ही शब्दबलानें वृत्तीची व्याप्ति लागते ॥६१॥
शि०- अगुरु महाराज उपासनेविषयीं आपला इतका आग्रह कां ? गु०- तुझा तरी तिजविषयीं इतका द्वेष कां ? शि०- तिजविषयीं प्रमाण कोठं दिसत नाहीं. हो गु०- हततिच्या प्रमाणाला काय तोटा, पुष्कळ श्रुतीचीं प्रमाणें आहेत ॥६२॥
उत्तरपातनीय उपनिषदांत शैब्य प्रश्नोपनिषदांत तसेंच काठक मांडुक्य इत्यादिक उपनिषदांमध्यें निर्गुण उपासना सांगितली आहे ॥६३॥
शि०-उपासना कशी करावी ? गु०- पंचीक रण ग्रंथांत सांगितली आहे. शि०- मग हें ज्ञानाला साधन तर ? त्यापासुन साक्षात कांहीं मुक्ति होत नाहीं । गु०- तसें आमचें तरी कोठें ह्मणणें आहे. उपासनाही ज्ञानालाच साधन आहे ॥६४॥
शि०- जगामध्येंही उपासना कोणीच करीत नाहीत. गु०- न करीतना बापडे. कोणी ती न केल्यामुळे उपासनेला दोष येतो काय ? ॥६५॥
मनुष्याची सद्यः फलाकडे नेहमी दृष्टी असते. तुं ह्मणतोस निर्गुण उपासना करीत नाहीत पण सगुण उपासना तई सर्व कुठें करितात ? तिचेंही फल मिळण्याला पुष्कळ काळ लागतो म्हनुन सद्यः फलदायीं वशीकरणादिकांचें मंत्र जपणारेही मूढ आहेतच.इतकेंच नव्हें यांतही नियम पाळण्याचा श्रम ज्यांस वाटतो ते त्याहीपेक्षां सद्यः फलदायीं जी कृप्यादि कर्मे त्याचा आश्रय घेतात. म्हणुन कोणचेंही कृत्य लोक करीत नाहींत येवढ्याच कारणाने ते त्याज्य होतें असें नाहीं ॥६६॥
सांसारीक फलांची ज्यास इच्छा आहे ते निर्गुण उपासनेंचे अनुष्ठान करीत नाहीत. ह्माणुन मुमुक्षुनींही त्यांचा त्याग करावा कीं काय ? उपासनेंचें अनुष्ठान करीत नाहींत ह्माणुन मुमुक्षुनींही त्याचा त्याग करावा कीं काय ? ही मुर्खाची गोष्ट असो. तूर्त आह्मी आमच्या विषयाकडे वळूं. वेदाच्या सर्व शाखांमध्यें विधेय आणि निषेध्य आसे जे ब्रह्मावर आरोपित गुण त्या सर्वांचा एकत्र उपसंहार करुन एथें निर्गुण उपासना सांगतों ॥६७॥
ते गुण व्यासांनीं आपल्या सुत्रांत संग्रह केले आहेत त्यापैकीं आनंदादिक विधेय गुण " आनंदादयः प्रधानस्य " या सुत्रांत सांगितले आहेत ॥६८॥
आणि त्याचे अस्थुलदिक निषेध गुण. " अक्षरधियां त्ववरोध: सामान्यतद्भावाभ्यामौपसदनवदुक्तं " या सुत्रांत एकत्र केले आहेत. ॥६९॥
शि०- निर्गुण ब्रह्माविद्येचेठायी गुणाचा उपसंहार कसा केला ? गु०- वर जें आह्मीं तुला सांगितलें तें कांहीं आमचे पदरचें नव्हें. व्यासांनी जे गुण आपल्या सुत्रांत दर्शविले तेच तुला आह्मीं एथें सांगितले तेव्हा वरील प्रश्न आम्हाला करुं नको. पाहिजे तर त्यांना जाऊन विचार ॥७०॥
शि०- आपला अभिप्राय मला समजला. व्यासावर हवाला देण्याचें कारण मला हेंदिसतें कीं, हिरण्यश्मश्रु इत्यादि गुणविशिष्ट ज्या सुर्यादि मूर्ति त्यांचें वर्णन तेथें नाही. तेव्हा ती निर्गुण उपासनाच असावी. गु०- असें एकून तूं समजतोसना ? बरेंच झालें ॥७१॥
शि०- पण ते गुण ब्रह्मातत्वाला दाखवुन देणारे आहेत त्यांचा त्यास कांही प्रवेश होत नाहीं. तें गुण त्यांस लागु पडल्यावांचुन त्याची उपासना कशी करावी ? गु०- उपासनेला ते गुण लागलेच पाहिजेच असें कांही नाहीं. त्या गुणांनी लक्शित जें ब्रह्मा त्याची उपासना खचित करितां येतें ॥७२॥
शि०- तिचा प्रकार कसा तो संगावा. गु०- आनंददिक विधेय गुण आणि अस्थुलादिक निपेध्य गुण यांही या श्रुतींत आत्मा दर्शविला आहे. तो अखंडैकरस मी आहें असें समजुनमुमुक्श उपासना करितात. ॥७३॥
शि०- तर मग ज्ञान आणि उपासना यामध्यें भेद कोणचा ? गु०-ज्ञान हें वस्तुतंत्र आहे आणि उपासना ही कर्तृतंत्र आहे म्हणजे जशाची तशी स्थिति जाणणें यास ज्ञान म्हणतात. आणि उपासनाही ती करणाराच्या भावनेवर अवलंबुन आहे ॥७४॥
ज्ञान हेंविचारापासुन होतें आणखी एक याची अशी मौज आहे कीं तें एकदा झाल्यावर तें जावें असें जरी मनुष्याच्या मनांत आलें तरी तें जात नाहीं ते उप्तन्न होतांच संसारविषयींची सत्यबुद्धि तत्काल नाहींशी होतें ॥७५॥
एवढ्या तत्त्वज्ञानानें मनुष्य कृतकृत्य होऊन निरंतर तृप्त असतो. मग जीवन्मुक्त होऊन प्रारब्धक्षयाची वाट पहात बसतो ॥७६॥
शि०- हा ज्ञानाचा प्रकार झाला. ज्ञानास जसा विचार पाहिजे तसा उपासनेलाहि नको काय ? गु०- उपासनेस त्याची गरज नाही. गुरुपदेशावर श्रत्घालु मु-मुक्षुने घटपटादिक वृत्तीचें मध्ये न येऊं देतां एक सारखे विचार न करितां ब्रह्माचिंतन करावें ॥७७॥
शि०- असं ब्रह्म चिंतन किती दिवसपर्यंत करावें ? गु०- देहा विषयींची अहंबुद्धि जाऊन चिंतनीय ब्रह्माविषयीं अहंबुद्धि उप्तन्न होईपर्यंत तसेंच चित्तन केलें पाहिजे. आणीती स्थिती मरणकालपर्यंत तशीच राखावी. ॥७८॥
याच्या उदाहरणार्थ छांदोग्या श्रुतींत एक कथा आहे कोनी एक ब्रह्माचारी संवर्गविद्या या नांवाची प्राणोपासना करीत होता. त्यानें भिक्षेकरितां राजाकडे जाऊन भिक्षेच्या वेळेस " महात्मनश्रतुरोदेव एक; " हा मंत्र म्हनुन आपल्या चित्तांतील संवर्गरुप प्रगट केलें ॥७९॥
शि०- आपण म्हटलें तत्त्वज्ञान झाल्यावर तें जावें असें कोणी इच्छिलें तरी तें जात नाहीं हा नियम उपासनेस लागु आहे किं नाहीं ? गु०- तो उपासनेस लागु नाहीं. ह्नाणुनच ती कर्तृतंत्र असें आह्मी म्हटलें कारण मनुष्याच्या इच्छेनें उपासना करणें न करणे किंवा अन्यथा करणें शक्य आहे म्हणून तो प्रत्यय नेहमी तसाच ठसवावा ॥८०॥