मासोपवासव्रत :
आषाढ शु. प्रतिपदा ते पौर्णिमेपर्यंत हे व्रत केले जाते. यामध्ये भगवान विष्णूची पूजा व स्वतः पंचगव्य घ्यावे. पौर्णिमेदिवशी व्रतसमाप्तीच्या वेळी ब्राह्मणभोजन घालून मग स्वतः जेवावे. याप्रमाणे हे मोक्षदायी व्रत सतत १३ वर्षे करावे. आषाढात जर शक्य झाले नाही, तर श्रावण किंवा भाद्रपद महिन्यात करता येते.