चैत्र शु. चतुर्दशी

Chaitra shuddha Chaturdashi


१ दमनचतुर्दशी :
हे एक व्रत होय. चैत्र किंवा श्रावण महिन्याच्या शु. चतुर्दशीला हे व्रत करतात. एकवीरा व भैरव या या व्रताच्या मुख्य देवता होत. या दोन देवतांच्या बरोबरच रात्री संचार करणार्‍या इतरही शक्तिदेवता असतात. त्यांच्याही प्रीत्यर्थ हे व्रत करावयाचे असते. म्हणून या व्रताची पूजा रात्री करतात. त्या पूजेत शिवाला दुधांचा व उसाच्या रसाचा अभिषेक करतात. दवणा, बेल व मरवा यांनी देवाची पूजा बांधतात. नैवेद्यानंतर तांदळाच्या पिठाने पाच किंवा नऊ दिवे करतात व ते काशाच्या पात्रात ठेवून देवाची आरती करतात. शक्य असल्यास रात्री देवाची रथयात्रा काढतात. शेवटी शिवभक्तांची पूजा करून भोजन घालतात.
फल- पुण्य व सौख्य यांची प्राप्ती.
२ मदन चतुर्दशी :
हे एक तिथिव्रत आहे. चैत्र शु. चतुर्दशीला मदनचतुर्दशी म्हणतात. हिला मदनभंजी असेही नाव आहे. या दिवशी मदनाची पूजा करतात. त्यास संतुष्ट करण्यासाठी गायन, वादन, कमोत्तेजक बोलणे असे प्रकार करतात.
फल- इच्छाप्राप्ती.

N/A

N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP