चैत्र शु. द्वितीया
Chaitra shuddha Dvitiya
उमादी पूजा :
एक तिथिव्रत चैत्र शु. द्वितीयेस हे व्रत करतात. या व्रतास उमा, शिव व अग्नी यांची पूजा करावयाची असते.
नेत्रव्रत :
हे व्रतसुद्धा चैत्र शु. द्वितीयेला करतात. ह्यासाठी सूर्यचंद्रस्वरूपी आश्विनकुमाराची मूर्ती बनवून तिचे गंधपुष्पादी साहित्याने पूजन करतात. या व्रतात ब्रह्मचर्याचे पालन करावे. ब्राह्मणांना सुवर्ण-रजताची दक्षिणा द्यावी आणि गाईच्या दह्यात गाईचे तूप मिसळून भोजन करावे. हे व्रत १२ वर्षापर्यंत करतात. हे व्रत केल्याने दृष्टी सुधारते आणि चेहरा अधिक कांतिमान होतो.
बालेन्दुव्रत :
चैत्र शु. द्वितीयेला हे व्रत करतात. ह्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शुध्द पाण्याने स्नान करुन तांदुळाचे बालेन्दु-मंडळ बनावावे. अगर चंद्रदर्शन होईल तेव्हा त्याच्याच ठायी बालेन्दूची कल्पना करुन ह्या आकाशस्थ चंद्राचे मंत्रपुष्पादी साहित्याने पूजन करावे. त्याला ऊस, गूळ, अक्षता, सुपारी व सैंधव अर्पण करावीत. 'बालचंद्रमसे नमः ।' या मंत्राने त्याला आहुती देऊन स्वतः भोजन करावे. ह्याप्रमाणे एक वर्षपर्यंत प्रत्येक शु. द्वितीयेला हे व्रत केले असता सुखवृद्धी व भाग्यवृध्दी होते. या व्रतात तैलपक्व ( तेलात तळलेले अथवा तेलावर परतलेले) पदार्थ वर्ज्य समजावेत.
N/A
N/A
Last Updated : December 09, 2007
TOP