चैत्र शु. षष्ठी

Chaitra shuddha Shashti

१ अशोकष्ष्ठी :
हे एक तिथिव्रत आहे. चैत्र शु. षष्ठीस हे व्रत करतात. या व्रतास षष्ठीदेवीचे पूजन करतात व अशोकाच्या सहा कळ्या व सहा मुगाचे दाणे मिसळून दह्याबरोबर खातात. फल- सुख व अपत्यप्राप्ती.

२ कुमारव्रत व कार्तिकेय पुजन :
चैत्र शु. षष्ठीची देवता कार्तिकस्वामी. या दिवशी मयूरवाहन कार्तिकस्वामींची मूर्ती करुन तिची पूजा करतात. या व्रतात उपोषण व ब्राह्मीचा रस आणि तूप यांचे प्राशन करावयाचे असते. फल-बुद्धिमत्ता, शास्त्र व पांडित्य यांचा लाभ.

N/A

N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP