* महामाघी
माघपौर्णिमेदिवशी जर मेषेचा शनी, सिंहेच गुरू, चंद्र आणि श्रवणाचा सूर्य असेल तर या योगावर महामाघी पर्वणी होते. या योगावर स्नानदानादी जी कृत्ये केली जातात, त्यांचे अक्षय पुण्य असते, असे म्हणतात.
* माघीपौर्णिमा
माघ पौर्णिमे दिवशी प्रात:स्नान झाल्यावर श्रीविष्णूचे पूजन करावे. पितरश्राद्ध करावे. असमर्थांना भोजन, दान, वस्त्र, आश्रय, तीळ, घोंगडे, कापूस, गूळ, तूप, मोदक, जोडे, फळे अन्न आणि सुवर्णादी दक्षिणा द्यावी आणि व्रत, उपवास करावा.