* महानंदा नवमी व्रत
एक तिथिव्रत. माघ शु. नवमीला महानंदा असे म्हणतात. व्रतावधी एक वर्ष. दुर्गा ही या व्रताची देवता. वर्षाचे तीन भाग करून प्रत्येक भागात देवीची पूजा निरनिराळ्या नावांनी, निरनिराळ्या फुलांनी, निरनिराळ्या नैवेद्यांनी करतात.
फल - इच्छापूर्ती व ब्रह्मलोकप्राप्ती.