* भीष्माष्टमी
माघ शु. अष्टमी दिवशी जवस, तीळ, गंध, फुले, गंगाजल, दर्भ आदींनी भीष्मांचे श्राद्ध अथवा तर्पण केल्याने अभीष्ट प्राप्त होते. मात्र तर्पण न केल्यास पाप घडते. त्याच दिवशी भीष्मांची पूजा करतात. त्यांना
'वसूनामवताराय शंतनोरात्मजाय च ।
अर्घ्यं ददामि भीष्माय आबालब्रह्मचारिणे ।'
या मंत्राने अर्घ्य द्यावा.
* मोहिनीराजाचे नवरात्र
नगर जिल्ह्यात नेवासे गावी मोहिनीराजाचे मुख्य स्थान आहे. त्याचे नवरात्र करतात. माघ शु. अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत नवरात्र असते. यात पूजा, आरती, नंदादीप, ब्राह्मणसुवासिनीभोजन, कथा-कीर्तन इ. कार्यक्रम असतात. पौष पौर्णिमेपासून माघ पौर्णिमेपर्यंत धरणे-पारणे करण्याची पद्धत आहे. रविवार हा या देवाचा वार आहे.