माघ शु. त्रयोदशी

Magha shudha Trayodashi


* दिनत्रयव्रत

माघस्नान ३० दिवसांत पूर्ण होते. परंतु एवढा दीर्घकाल सार्मर्थ्य अगर अनुकूलत नसेल तर माघ शु. त्रयोदशी, चतुर्दशी व पौर्णिमा या दिवशी प्रात:काली स्नानादी करून व्रत करावे व दान वगैरे पुण्यकृत्ये केल्यास संपूर्ण माघस्नानाचे फळ मिळते.

 

* पुण्यकव्रत

हे स्त्रीव्रत आहे. माघ शु. त्रयोदशीला याचा आरंभ करतात. व्रतावधी एक वर्ष. या कालात नित्य विष्णुची पूजा करावयाची असते. यानंतर उद्यापन करतात.

फल - कृष्णासारखा विख्यात मुलगा होतो.

 

* प्रदोषव्रत :

अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की, संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष' ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष' अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष' अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि

'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते ।

रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥

उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।

ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥'

अशी प्रार्थना करुन भोजन करावे.

कृ. पक्षातील प्रदोष जर शनिवार रोजी आला तर विशेष फलदायी असतो.

N/A

N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP