वसंतपंचमी
माघ शु. पंचमी दिवशी ( पूर्वविद्धा ) उत्तम अशा चौरंगावर वस्त्र अंथरावे. त्यावर अक्षतांनी अष्टदल कमल काढावे. त्याच्या अग्रभागी गणेश, पृष्ठभागी वसंत (म्हणजे गव्हाची पुंजी - रास ), लोंब्या जलपूर्ण घटात ठेवाव्यत. प्रथम गणेशपूजा व नंतर गव्हाच्या पुंजामध्ये रतिमदनाची पूजा करावी. त्यावर अबीरादी घालून चित्रविचित्र करावे. नंतर
'शुभा रति: प्रकर्तव्या वसंतोज्ज्वलभूषणा ।
नृत्यमाना शुभादेवी समस्ताभरणैर्णुता ॥
वीणावादनशीला च मदकर्पूरचर्चिता ॥'
या मंत्राने रती आणि
'कामदेवस्तु कर्तव्यो रूपेणाप्रतिमो भुवि ।
अष्टबाहु: स कर्तव्य: शंखपद्मविभूषण: ॥
चापबाणकरश्चैव मदादंचितलोचन: ।
रति: प्रीतिस्तथाशक्तिर्मदशक्तिस्तथोज्ज्वला ॥
चतस्त्रस्तस्य कर्तव्या: पत्नो रूपमनोहरा: ।
चत्वारस्य करास्तस्य कार्याभार्यास्तनोपग:
केतुश्च मकर: कार्य: पंचबाणमुखो महान् ॥'
या मंत्राने कामदेवाचे ध्यान करावे. निरनिराळी फळे, फुले, पत्री आदी वाहून प्रार्थना करावी. यामुळे गार्हस्थ्य-जीवन सुखमय होऊन प्रत्येक कार्यात उत्साह प्राप्त होतो.