* पितृश्राद्ध
या त्रयोदशीला पितृश्राद्ध करून पितृगण तृप्त केले तर सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. जर त्याला पुत्र असेल तर अपिंडक श्राद्ध करावे.
* प्रदोषव्रत :
अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की, संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष' ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष' अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष' अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि
'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते ।
रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।
ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥'
अशी प्रार्थना करुन भोजन करावे.
सूर्यास्ताचे वेळी स्नान करून लाल जास्वंद, लाल गंध आणि धूपदीप आदी उपचारांनी पूजा करून प्रदोषकाळी एकवेळ जेवावे. जर या दिवशी 'शनिवार' असेल तर अधिक चांगले.
* युगान्तर व्रत
भाद्र. व. त्रयोदशीला द्वापार युगाचा प्रारंभ झाला, असे म्हणतात. म्हणून या तिथीला हे व्रत करतात. याचा विधी असा-
अंगाला गोमूत्र, गोमय, दूर्वा व चिकणमाती लावावी. पाण्याच्या डोहात किंवा तलावात स्नान करावे. या स्नानामुळे गयाश्राद्ध केल्याचे फळ मिळते. विष्णुमूर्तीला तूप, दूध आणि शुद्धोदक यांनी स्नान घातल्यास विष्णुलोकाची प्राप्ती होते.