* दर्शश्राद्ध
दर्शाच्या दिवशी केले जाणारे श्राद्ध पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहत्रयी यांना उद्देशून करतात. हे श्राद्ध नेहमीच्या श्राद्धासारखेच असते.
* सर्वपित्री अमावस्या
या भाद्रपद अमावस्ये दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करावयाचे असते.
* कुशग्रहणी
भाद्रपद अमावास्येचे नव. या दिवशी दर्भ कापून धर्मकृत्यांसाठी त्यांचा संचय करावा. असे सांगितले आहे.
* गजच्छाया पर्व :
भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला हस्त नक्षत्र असता सूर्य व चंद्र यांचा योग होणे, यास गजच्छाया पर्व म्हणतात या दिवशी दान, श्राद्धादी कर्मे केली असता अनंत फलाची प्राप्ती होते.
वद्य पक्षातील त्रयोदशीस चंद्र मघा नक्षत्रात आणि सूर्य हस्त नक्षत्रात असेल, तर त्या योगालाही गजच्छाया म्हणतात. सूर्य ग्रहणाच्या वेळीही गजच्छाया योग असतो.