|
वि. सारखा ; समान ; बरोबर ; तुल्य . तथापि दोही ठायी सरिसा । मोह कराल हा भरंवसा - मुआदि ३ . ८८ . तरी न एति करौ सरिसे । प्रसंधेसी । - शिशु १७ . मार्गी अंधासरिसा । पुढे देखणहि चाले जैसा । - ज्ञा ३ . १५६ . - शअ . १ सह ; बरोबर . भीमकी सरिसे धांवती । - एरुस्व ६ . ५८ . तत्काळ आला उमेसरिसा । - कथा १ . ४ . ६१ . तिअ सरिसां भांजिती । मळयानीळु । - शिशु ७८२ . शिरा जाळें सरिसा । गुंफौनि अस्थीचा पासा । - शिशु ७५९ . २ जवळ ; संनिध . - क्रिवि . सारखे ; दुरुस्त ; नीट ; पूर्ववत ; समोर . पडले खचलें जेथें तेथें । तात्काळ सरिसें करिती तेथे । - मुसभा ३ , ७८ . उटूनि दोन्ही आरसे । वोडविलिया सरिसे । - ज्ञा १८ . १५९६ . [ सं . सदृश ; सरसा पहा . ] सरिसेपण - न . सादृश्य ; तुल्यता ; सारखेपणा . सरिसेपणें एकवटत इभ । मस्तकावरी । - ज्ञा १ . १७ . वि. १ सारखा ; समान ; तुल्य . देखे संतासंती कर्मी । हें जें सरिसेपण मनोधर्मी । - माज्ञा २ . २७२ . नावांसरशी करणी असावी . - शअ . १ सन्निध ; जवळ ; समीप . घरासरशीं घरें लागलेलीं आहेत . २ ( वेग , सपाटा , आवेश , झटक ) यांच्यासह ; बरोबर . हांकेसरशी घाली उडी । स्तंभामाजी कडाडी । वार्यासरसा , हातासरसा , झपाटयासरसा , तडाक्यासरसा , उठण्यासरसा , बोलण्यासरसा . - क्रिवि . १ बरोबर ; सह ; संन्निधभागीं ; जवळपास . सख्या दोन्ही भागीं बसति सरसा सावधपणें । - सारुह ६ . ८९ . तुका म्हणे सरशी असों येणें बोधें । - तुगा १९३ . २ बाजूला ; एकीकडे ; मार्गातून दूर . ( क्रि० काढणें ; करणें ; घालणें ; निघणें ; होणें ; जाणें ). ३ तात्काल ; लागलीच ; झपाटयानें . सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभव सरसा आणूनियां । - तुगा १८ . मुलें मिळालीं सरसीं । क्रीडताती हरिसवें । - ह ७ . ११९ . नाम जपे सरसे । - देप ६७ . ४ नीट ; व्यवस्थित ; सरसावून . पान खाऊन रंगेल अधर । पदर घे सरसा लाजून जरा । - पला ३६ . ५ पुढें ; अग्रभागीं . या हो या झगडावयास सरसे व्हा मेळवा वाहवा । - केक ५३ . [ सं . सदृश ] सरसून - शअ . बरोबर ; जवळून ; सह ; लगटून ; लागून . ( क्रि० जाणें ; चालणें ; बसणें ).
|