|
वि. समस्त ; सर्व ; सगळा ; सबंध . अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र । - ज्ञा ११ . ३१५ . विशेषतः एखादा समाज , जात , राष्ट्र , लोक , गांव यासंबंधीं हा शब्द योजतात . उदा० समाकुल पांढर सर्व गांव ; लहानापासून थोरापर्यंत सर्व . तसेंच समाकुळ देश , प्रांत , परगणा , कसबा , गांव , फौज , सभा , मंडळी , पंचाईत , जमात , जथा , वगैरे . याप्रमाणेंच समाकुळ असाम्या , शिपाई , कारकून वगैरे . त्या निकालपत्रावर दफातदार व समाकुळ पांढरीच्या साक्षी झाल्या . - पेशवेकालीन महाराष्ट्र ४७६ . [ सं . सम् + आकुल ] वि. व्याकुल ; व्यग्र ; हैराण . [ सं . सम् + आकुल ]
|