Dictionaries | References

राउळ

   
Script: Devanagari
See also:  राऊळ

राउळ     

 पु. 
( महानु . ) राजा . राउळें नेली सर्व संपत्ती । - भाए ७२६ .
( महानु . ) श्रीकृष्ण परमात्मा ; देव . भवमोचकें चरित्र । राउळाचीं । - ज्ञाप्र ९५२ .
( महानु . ) गोसावी ; देव ; चक्रधर . ऐसीं परीकरें पवित्रें । राउळांचीं लिळाचरित्रें । - ऋ २५ .
छोटे रजपूत जातीचे जहागीरदार .
श्रीगुरुमहाराज ; श्रेष्ठ पुरुष . तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें । - ज्ञा ५ . ५ .
एक जात किंवा तिच्यापैकीं एक व्यक्ति . हे भैरवाचे भक्त असून कोष्टी कामाकरितां लागणारे कुंचले , फण्या इ० तयार करितात . ( नाशिक ) वई तयार करणारी जात . - ज्ञानप्रकाश ९ . १ . ३१ . ७ बदरीनारायणाचा नंबुद्री ब्राह्मण जातीचा पुजारी . बदरीनारायणाची पूजा अद्याप आचार्यांचे लंबेरी म्हणून ब्राह्मण आहेत त्यांजकडेस आहे . त्यांस ... राऊळ म्हणतात . - तीप्र ५३ . ८ पहाटेस हातांत मोठा त्रिशूळ घेऊन दोहरा म्हणत भीक मागणारा भिकारी . - न . १ घर ; राजवाडा . आला वसुदेवाचिया राउळा । - एभा २ . ३९ . २ देऊळ ; मंदिर . काकडाअरतीस ते वेळीं । पुजारी आले राउळांत । - भवि २ . २९ . [ सं . राजकुल ] सामाशब्द -
०गण  न. ( महानु . ) राजमंदिर . कांइंवो बोलणें रांउळगणांत । - धवळे पू . ७ . २ . राउळार - न . राऊळ ; राजवाडा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP