Dictionaries | References र राउळ Script: Devanagari See also: राऊळ Meaning Related Words राउळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( महानु . ) राजा . राउळें नेली सर्व संपत्ती । - भाए ७२६ .( महानु . ) श्रीकृष्ण परमात्मा ; देव . भवमोचकें चरित्र । राउळाचीं । - ज्ञाप्र ९५२ .( महानु . ) गोसावी ; देव ; चक्रधर . ऐसीं परीकरें पवित्रें । राउळांचीं लिळाचरित्रें । - ऋ २५ .छोटे रजपूत जातीचे जहागीरदार .श्रीगुरुमहाराज ; श्रेष्ठ पुरुष . तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें । - ज्ञा ५ . ५ .एक जात किंवा तिच्यापैकीं एक व्यक्ति . हे भैरवाचे भक्त असून कोष्टी कामाकरितां लागणारे कुंचले , फण्या इ० तयार करितात . ( नाशिक ) वई तयार करणारी जात . - ज्ञानप्रकाश ९ . १ . ३१ . ७ बदरीनारायणाचा नंबुद्री ब्राह्मण जातीचा पुजारी . बदरीनारायणाची पूजा अद्याप आचार्यांचे लंबेरी म्हणून ब्राह्मण आहेत त्यांजकडेस आहे . त्यांस ... राऊळ म्हणतात . - तीप्र ५३ . ८ पहाटेस हातांत मोठा त्रिशूळ घेऊन दोहरा म्हणत भीक मागणारा भिकारी . - न . १ घर ; राजवाडा . आला वसुदेवाचिया राउळा । - एभा २ . ३९ . २ देऊळ ; मंदिर . काकडाअरतीस ते वेळीं । पुजारी आले राउळांत । - भवि २ . २९ . [ सं . राजकुल ] सामाशब्द -०गण न. ( महानु . ) राजमंदिर . कांइंवो बोलणें रांउळगणांत । - धवळे पू . ७ . २ . राउळार - न . राऊळ ; राजवाडा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP