Dictionaries | References

म्हैस

   
Script: Devanagari

म्हैस

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Buying a pig in a poke. मेल्या म्हशीस दाहा शेर दूध or दूध बहु Praise is lavished upon the dead. म्हशीवर पाऊस पडणें Applied to unproductive efforts or unavailing advantages.

म्हैस

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  She-buffalo.
पाण्यात म्हैस न् बाहेर मोल   Buying a pig in a poke.
मेल्या म्हशीस दहा शेर दूध   Praise is lavished upon the dead.
म्हशीवर पाऊस पडणें   Applied to unavailing efforts.

म्हैस

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  रेड्याची मादी   Ex. गायीच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध पचण्यास जड असते
ATTRIBUTES:
दुभती
HYPONYMY:
नागपूरी मुरा नीली रावी जाफराबादी सुरती मेहेसाणा तोडा कुंधी सैदी मैनोफी सूबा सोएमबौरा बेहेरी बेलेदे क्वाईतुई क्वाइकाम क्वाइज्वान अमृतमहल जंगली म्हैस
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
महिषी महीस
Wordnet:
asmমাইকী মʼহ
bdमैसो गाइ
benমোষ
gujભેંસ
hinभैंस
kanಕೋಣ
kasمٲش
kokम्हस
malഎരുമ
mniꯏꯔꯣꯏ꯭ꯑꯃꯣꯝ
nepभैंसी
oriମାଈ ମଇଁଷି
panਮੱਝ
sanमहिषी
tamபெண்எருமை
telగేదె
urdبھینس
 noun  म्हशीचे मांस जे खाल्ले जाते   Ex. काही लोक म्हैसदेखील खातात.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমোষ
gujભેંસ
hinभैंस
kasمٲش , مٲشہِ ماز
kokम्हशीचें मास
oriମଇଁଷି ମାଂସ
panਮੱਝ
sanमहिष्यामिषम्
urdبھینس , بھینس کاگوشت , بڑاگوشت

म्हैस

  स्त्री. 
  1. महिषी ; रेड्याची मादी ; म्हसरु ; म्हस .
  2. एक प्रकारचा सहा पायांचा माशीपेक्षां मोठ्या आकाराचा व वरचा पृष्ठभाग कठीण असलेला किडा .
  3. केळफुलावरील निबर , काळसर रंगाची पारी . पांढर्‍या रंगाच्या पारीस गाय म्हणतात .
म्ह०
  1. मेल्या म्हशीला दहाशेर दूध किंवा बहु दूध . [ सं . महिष प्रा . महिस ]
  2. पाण्यांत म्हैस बाहेर मोल - म्हैस डबक्यांत बुडून राहिली असतां तिची किंमत ठरविणें .

म्हशीचा प्राणनाथ वि. पु. 
  1. रेडा .
  2. ( ल . ) सुस्त ; मस्त . तो काय नुसता म्हशीचा प्राणनाथ आहे .

म्हैस पावल्या वि.   ( व . ) म्हशीसारखा जड प्रकृतीचा .
म्हैस आटणें    दूध द्यावयाचें बंद होणें ; दूध न निघणें . गेल्या महिन्यापासून म्हैस आटली आहे. 
म्हशीनें पाय दिलेलें नाक  न. नकटें किंवा बसकें नाक .
म्हशीवर पाऊस पडणें    बेकिफायतीचे प्रयत्नाबद्दल किंवा निरर्थक झालेल्या हित कारक गोष्टीबद्दल योजावयाचा शब्द . 
म्हैस पाहणें    ( व . ) म्हशीचें दूध काढणें . 
   केळफुलावरील निबर , काळसर रंगाची पारी . पांढर्‍या रंगाच्या पारीस गाय म्हणतात . म्ह० मेल्या म्हशीला दहाशेर दूध किंवा बहु दूध . [ सं . महिष प्रा . महिस ] पाण्यांत म्हैस बाहेर मोल - म्हैस डबक्यांत बुडून राहिली असतां तिची किंमत ठरविणें . म्हशीवर पाऊस पडणें - बेकिफायतीचे प्रयत्नाबद्दल किंवा निरर्थक झालेल्या हित कारक गोष्टीबद्दल योजावयाचा शब्द . म्हशीचा प्राणनाथ - पु . रेडा . - वि . ( ल . ) सुस्त ; मस्त . तो काय नुसता म्हशीचा प्राणनाथ आहे . म्हशीनें पाय दिलेलें नाक - न . नकटें किंवा बसकें नाक . म्हैस आटणें - दूध द्यावयाचें बंद होणें ; दूध न निघणें . गेल्या महिन्यापासून म्हैस आटली आहे . म्हैस पावल्या - वि . ( व . ) म्हशीसारखा जड प्रकृतीचा . म्हैस पाहणें - ( व . ) म्हशीचें दूध काढणें . म्हैस पिळणें - धार काढणें . मी म्हैस पिळून येतों . म्हैस हात पारखते - ( व . ) म्हैस धार काढणार्‍याचा हात ओळखते . म्हशीची शिंगें म्हशीला जड होत नाहींत - मुलें अधिक असली तरी तीं आईबापाला जड नसतात . म्हशा - पु .
   ( व . ) रेडा ; हल्या ; जड , दांडग्या व कुरुप रेड्याबद्दल किंवा इतर पशूबद्दल तुच्छतेनें योजावयाचा शब्द .
 वि.  ( ल . ) रेड्यासारखा धष्ट पुष्ट मतिमंद ; म्हशीसारखा जड प्रकृतीचा .
   सुस्त ; दांडगा आणि घाणेरडा अशा इसमाबद्दल योजावयाचा तुच्छतादर्शक शब्द ; मूर्ख अचरट मनुष्य . कीं म्हशाचें गण्या नाम । - नव १८ . १७२ . [ म्हैस ] म्हशागुग्गुळ , गुगुळ - पु .
   एक प्रकारचा गुग्गुल .
   ( म्हशा किंवा म्हैस ) धिप्पाड गलेलठ्ठ व ठोंब्या इसमाबद्दल निर्भत्सनापूर्वक योजावयाचा शब्द . [ म्हशा , म्हैस ; मशी आणि गुग्गुल ] म्हशाबोळ - पु . एक प्रकारचा बोळ ; एक औषधी वनस्पती ; एका झाडाच्या चिकापासून हा होतो . याचा रंग काळा असतो . हें औषध गुरांचे पोटदुखीवर चालतें . म्हशासुर - पु . देवीनें मारलेला एक दैत्य ; म्हसोबा . [ सं . महिषासुर ] म्हशी केळें , म्हशेळी , म्हशळें , म्हसकेळें - न . एक जातीचीं मोठीं व जाड केळीं . म्हशीचा खटारा म्हशीचें खोड , म्हशीचें डोबड - पुन . म्हशीबद्दल उपहासानें म्हणतात . म्हशीचें मेळवण - न . ( विनोदानें ) अव्यवस्थित जेवण ; पात्रावर खाद्यपदार्थांची अव्यस्थित रेलचेल . म्हस - स्त्री . ( व . ) म्हैस ; महिषी ; म्हसरु ; म्हसरुड ; म्हसर ह्या शब्दाकरितां म्हैसरुं इ० शब्द पहा . [ म्हैस ] म्हसकी , म्हसक्या - वि . म्हैस राखणारा , चारणारा . म्हसडी , म्हसडें - वि . म्हशीचें कातडें ; महिषचर्म . [ म्हैस - म्हस - म्हसडी ] म्हसर - ढोर ; लांब व सापट ( म्हशीच्या पाठी प्रमाणें ) ह्या अर्थीं नामाशीं सामासिक शब्दांत म्हैस किंवा म्हस शब्दाचें तुच्छतादर्शक रुप ; कंटाळवाणें व न संपणारें लांबलचक . जसे - म्हसरमाळ , म्हसर मैदान , म्हसररान . कधीं कधीं म्हसरभुई व म्हसरजमीन , म्हसरशेत , म्हसरवाट , म्हसररस्ता , म्हसर मजल , म्हसरकोस , म्हसरपल्ला इ . [ एकवचन म्हसरु ] म्हसरे - म्हैस , टोणगे . म्हसड्या - वि . ( व . ) म्हशीसारखा जड प्रकृतीचा . म्हसासूर , म्हसोबा - पु . एका असुराचें किंवा दैत्याचें नांव , यास देवीनें मारलें . कांहीं हलक्या जातीचे लोक ह्याची पूजा करितात ; एक पिशाच्च . [ महिष ] म्हसोबाला नाहीं बायको व सटवाईला नाहीं दादला . म्हसोबा कोपविणें , पेचविणें - कृष्णानदी तटाकास अक्कलखोप गांवीं म्हसोबा आहे त्याला आपल्या शत्रूचा सूड घेण्याकरितां नारळ फोडणें ; देव घालणें म्हैशा - पु . अंगानें मोठा व कुरुप अशा रेड्याबद्दल किंवा इतर नर जातीच्या पशूबद्दल रागानें किंवा उपहासपूर्वक योजावयाचा शब्द . - वि . ज्याचें शरीर पुष्ट असून जो आळशी आहे त्यास निंदेनें म्हणावयाचा शब्द . [ म्हैस ] म्हैसभादर्‍या - वि . आपल्या कामांत निपुण नसलेल्या न्हाव्याबद्दल उपहासानें योजावयाचा शब्द ; वाईटपणें खाडाखोड करुन लिहिणार्‍या लेखकाबद्दल योजतात . म्हैसमंगळ - वि . मठ्ठ . म्हैसमाळ - पु प्रवासामघ्यें लवकर न संपणारा मोठा माळ किंवा ओसाड व नापीक जमीन . म्हसर पहा . म्हैसरट , म्हैसरुड , म्हैसर - न . म्हैस शब्दाचे नर किंवा मादी वगैरे भेद लक्षात न घेतां लाडिकपणानें योजावयाचा शब्द . म्हैसवा - पु . ( महानु . ) एक प्रकारचा पाषाण . कीं आव्हाटी म्हैसवा थर । नव्हतां दृष्टी गोचरु । - ऋ ४८ . म्हैसवल - स्त्री . एक झुडूप . म्हैसा - पु . टोणगा ; रेडा ( हा शब्द मराठींत विशेष रुळलेला नाहीं . ) रांड - भांड म्हैसा बिघडे तो होय कैसा ? ( हिंदी म्हण ) नको देऊं म्हैसा । - प्रला . म्हैसासुर - पु . एक पिशाच्च ; क्षुद्रदेवता . म्हैसासुर मलिकार्जुन । - दावि ६३ . [ महिषासुर ] म्हैसिक - वि . म्हशीचा . म्हैसोबा - म्हसोबा . मुंज्या झोटिंग करणी । म्हैसोबाची

Related Words

म्हैस   वाकी म्हैस   रानटी म्हैस   वांकी म्हैस   जंगली म्हैस   नवचंद्ररी म्हैस   नवचंदरी म्हैस   जंगली भैंस   वरतीं मोल, पाण्यांत म्हैस   धनीण म्हणते म्हैस ठेविली, म्हैस म्हणते बटीक ठेवली   ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस   म्हैस बसली सखलीं, दोन्ही खळीं चुकलीं   म्हैस विते तें पारडयाकरितां, मालकाकरितां नाहीं   महिषी   म्हैस आपल्या खाजेनें फळते, धन्याला दूध देण्यासाठीं फळत नाहीं   पाटलाची म्हैस व्याली म्हणून मठपती मिशा कातरुन घेतो   वांकडी म्हैस   जाफराबादी म्हैस   दुबरी म्हैस   ढोबर म्हैस   भरवंशाची म्हैस   रावी म्हैस   नीली म्हैस   पहिलार (म्हैस)   सुरती म्हैस   वादीकरितां म्हैस मारणार   बारक्या फणसाला म्हैस राखण   भरंवशाची म्हैस टोणगा व्याली   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   सुरती म्हैस अंबवणावारी   भैंसी   मैसो गाइ   مٲش   பெண்எருமை   মাইকী মʼহ   ମାଈ ମଇଁଷି   എരുമ   म्हैस बडी कां अक्कल बडी   पाण्यांत म्हैस व वर मोल   गवलः   بھینس   अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी   वाणी जिरवी धन अन्, म्हैस जिरवी कण   दुभती म्हैस दऊन गाढव कोण घेतो?   दुभती म्हैस देऊन मूढें गाढव कोण घेतो   म्हशीपाशीं वाजे विणा, म्हैस वळुनही बघेना   indian buffalo   भैंस   म्हस   గేదె   ਮੱਝ   ભેંસ   ಕೋಣ   पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ   মোষ   म्हइस   कोचर   ढबालगी   महीस   चहाण   डोंबरूं   बहुरणी   माहुरी   पंच मूत्र   होंडकी   म्हईस   आढन   ग्वड्ड   चंद्रया   वायघोय   दुदावणे   दुदाविणे   दुधाला फुटणें   दुधास फुटणें   दूध निघणें   तेलछाप   ठांगाड   भोंवरा करणें   मुरवणीचें जनावर   म्हसकी   मसरें   सोंती   सोट्ट   धनाजाणे   क्वाइज्वान   अर्धीम्हैस   कांजळी   विश्वामित्री   सकनळी   समासकी   वगार   अभराड   गुरेचोर   दर्यांत आस मासो, ताचें मोल करतलो पिसो   रांड, भांड, भैंसा, बिघडे तो होय कैसा?   रेंकत येणें   भादरणी   महिख   माळ गौळयाची   माहुरा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP