Dictionaries | References

मुरकुंड

   
Script: Devanagari
See also:  मुरकुंडी , मुरकुंडें

मुरकुंड     

 स्त्री. 
  1. ( उत्सुकता , फार हंसणें . असह्य थंडी , ताप , अशक्तपणा , भीति , आनंद इ० कारणांमुळें होणारी . ) शरीराची संकुचित स्थिति ; गात्रवैकल्य ; शरीराचें संकोचन . ( क्रि० घालणें ; मारणें ; पडणें ; वळणें ). वाघ पाहतांच त्याची मुरकुंडी वळली .
  2. भीड ; दाटी ; खेचाखेच .
  3. झुंड ; उड्यावर उड्या . ( विशेषतः अव . उपयोग ). ( क्रि० पडणें ) अनेका हिंसांची सहज मुरकुंडी वरि पडे । - सारुह ६ . १६२ . अनंत फंदीच्या लावण्यावर हजारों माणसांच्या मुरकुंड्या पडत .
  4. पाय मानेवर ठेवून बसण्याचें एक आसन ; गुडघ्यांत मान घालून व हात पायांभोंवतीं वेढून बसण्याचा प्रकार . ( क्रि० मारणें ; घेणें ; वळणें ). [ का . मुरि = वळणें ]

०पाडणें   जिंकणें . विधिहराची मुरकुंडी । अनंग पंचकुसुमशरेंचि पाडी । - जै १ १०० .
०वळणें   
  1. देहभान नाहीसें होऊन पडणें .
  2. भयानें भेदरुन जाणें ; गर्भगळित होणें . मुरकुंडी कंसाची वळली । शस्त्रें हातींचीं गळालीं । - ह ३ . ११७ .

मुरखंडी   स्त्री. मूर्च्छा ; घेरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP