|
स्त्री. बहीण . आक्षत भरली भाणा । दुजा ब्राह्मण मेहुणा । - दा ३ . ३ . १० . [ सं . भगिनी ] पु. न. एकपात्रीं नाटक . ( सं .) न. ( गो . ) वरच्या ओठास जन्मतः पडलेली भेग . भांडी पहा . भांड्यॉ - वि . ( गो . ) जन्मतः ज्याचा वरचा ओठ चिरलेला आहे असा ( मनुष्य ); राखुंडा . पुन . नाटकासारखा काव्याचा एक प्रकार . ह्याचे दहा प्रकार आहेत . - नाटक , प्रकरण , भाण , प्रहसन , डिम , व्यायोग , समवकार , वीथी , अंक व ईहामृग . [ सं . ] न. ( कुंभारी ) जेवण . पितरांच्या नांवीं लेका भाण भरावें . - बदलापूर ८० . भाणें पहा . ( कारवारी ) हंडा . - शर . ( गो . ) मोठी बरणी . [ सं . भांड , भाजन ? ]
|