Dictionaries | References

बिरीद

   
Script: Devanagari
See also:  बिरुद

बिरीद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A thread, &c., worn (around the arm, &c.) as a badge of one's forte; claim laid to.

बिरीद     

 न. 
विद्या - कलादि गुणांत श्रेष्ठत्व असल्याचें चिन्ह म्हणून हात , दंड इ० स बांधतात तो दोरा , गंडा ; बाहुभूषण . उष्ट्रानीं बिरिदें बांधोन । तुंबरापुढें मांडिलें गायन । - एभा ५ . ८३ . जिवाचे धास्तीनें बावन बिरुदांचे धणी , भले सर्दार , घोडे सोडून जीव जगविण्याकरितां पहाडांत शिरले . - भाब ९१ .
ब्रीद ; बाणा ; प्रतिज्ञा ; अंगीं असलेल्या गुणाबद्दल वाटणारा अभिमान . परी अर्जुना तुझेनि वेधें । मियां देवपणाची बिरुदें । - ज्ञा १८ . १३७२ .
चिन्ह .
नांवलौकिक ; कीर्ति . तेथोनि तीर्था शिरोमणी ऐसें बिरुद जालें । - दाव १७५ . [ सं . विरुद ]
०वंत वि.  यशस्वी . - शर . बिरुदाईत , बिरुदायित वि . प्रतिज्ञा करुन पाळणारा ; बाणेदार ; बाणा बाळगणारा ब्रिदाईत . ऐशीं मिळोनि बिरुदायितें । आलीं बदरिकाश्रमा समस्तें । - एभा ४ . ८० . बिरुदावलि स्त्री . बिरुदांची माळ . [ सं . विरुद + आवलि ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP