Dictionaries | References ब बळि Script: Devanagari See also: बलि , बळी Meaning Related Words बळि महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री .बलि पहा . देवतेस अर्पण करावयाची वस्तु ( पशु इ० ). ( क्रि० देणें ). बळी नेदूनि आम्हासी । हे जाऊं पाहती पूर्ण पदासी । - एभा ४ . १५४ .( ल . ) आहुति ; होम . जीववधें साधूनि बळी । भूत . प्रेत कुळें मैळीं । - ज्ञा १७ . ८० . पु. कर ; पट्टी . इतरांची काय कथा ? जे देणार त्रिखर्व बळि बा गा । - मोसभा ३ . ३१ . [ सं . बलि ]०देणें भक्ष्य म्हणून अर्पण करणें . तुका म्हणे बळी । जीव दिला पायांतळीं । - तुगा ९९१ .०पडणें क्रि . भक्ष्यस्थानीं पडणें ; नाश पावणें ; मरणें .०चा - वि . ( कर . ) मुर्दाड .बकरा - वि . ( कर . ) मुर्दाड .०दान प्रतिपदा - बलिदान , बलिप्रतिपदा पहा .०राणा पु. ( बायकी ) प्रसूतीच्या अकराव्या दिवशीं विटाळ फिटल्यावर पाटावर काढलेल्या तांदुळाच्या दोन बाहुल्यांची पूजा करुन ती सुवासिनीच्या ओटींत घालण्याचा विधि .०हरण न. भूतयज्ञ ; देवतांस रोज भूमीवर दिलेल्या भाताच्या मंडलाकार आहुती ( वैश्वदेवाच्या आहुति कुंडांतील अग्नींत टाकतात व या भुईवर विशिष्ट क्रमानें घालतात ).( ल . ) पोथीच्या समासाभोंवती टिप्पणीवजा किंवा चुकांच्या शुद्धीकरणार्थ लिहून सर्व पोथी चिताड करणें . ( क्रि० घालणें ). [ सं . बलिहरण ]०घालणें क्रि . पोथी , पुस्तक चिताड करुन ठेवणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP