-
m Room, capacity.
-
See : सत्यवादी, सत्यवादी, सत्य
-
Room, capacity, space to contain or hold.
-
पु. जागा ; स्थल ; अवकाश ; समावेश होईल एवढी सोयीची जागा . हे जहाज फार लहान पडलें . यामुळे यांत इतके खटले रहावयाजोगा सांच दिसत नाही . [ सांचणें ] सांचणें - अक्रि . १ जमणें ; एकत्र गोळा होणें ; थोडा थोडा येत जाऊन सांठा होणें ( पाणी , धान्य इ० चा ). आपुले धन लोकांवरी सांचे । तें मागूं जातां स्वयें बाचें । - नव १४ . १२१ . २ संवर्धित , प्रज्वलित होणें . विपरीत ज्ञानदीपिका । सांचली जे । - ज्ञा १५ . ८२ . ३ सांचविणें , गोळाकरणें ; जमविणें ; सांठविणें . कृपणा ऐसा सांची अर्थ । - दा २ . १० . ३५ . [ सं . संचयन ] सांचवणी - स्त्री . सांचलेले , सांचविलेले पाणी ( तळें , हौद , डबकें इ० त विशेषतः फारसा उपसा नसलेले याच्या उलट वाहतें पाणी ). जें सांचवणी अल्पजल - एभा २१ . ११८ . सांचविणे - उक्रि . सांठविणें ; जमविणें ; संग्रह करणें . येक दोन पुण्य सांचा पडे । तरि हे बहुतां जन्मी जोडे । - तुगा ७१२ . सांचीव - वि . सांचलेले ( पाणी इ० वाहते नव्हते ) सांचीव , सांचाल - वि . तळें , हौद , इ० त सांटविलेले ( पाणी ).
Site Search
Input language: