|
न. १ कापडचा गठ्ठा , बस्ता ( हा साधारणतः लांबट बांधलेला असतो ). २ नागपंचमीच्या दिवशीचे पुरण घालून केलेले पक्वान्न ; गाठोडे . ३ नवर्यामुलाकडील मंडळीस केलेला आहेर ( पाठवणीच्या दिवशींचा ). ४ कुळव , पाभर , कोळपे इ० आउताम्चा आडवा लांकडाचा तुकडा . ५ ( सामा . ) लांकडाचा ठोकळा , ओंडा . ६ खांब , खुंट . ७ ( विणकाम ) चातीच्या ( स्पिंडल ) मध्यभागी , रहाटावरील दोरी , पट्टा अडकविण्यास केलेली जागा . हे सुतास अगर कापडास , चिकट पदार्थ लावून चातीच्या मध्यभागी एक गुंडाळीसारखे केलेले असते . ८ ( गो .) केळीचे काले . [ का . दिंडु ] नांगरणीनंतर ढेंकळें फोडण्याचें वजनदार हत्यार . ( का .) न. उंसाच्या चरकाची लाट . ( का .) स्त्री. लहान दार . दिंडी पहा .
|