|
पुस्त्री . - दुक्कल ; जोडी ; जोडा ; युग्म ( एका जातीच्या दोन , दोन , एकाचवेळीं चालणार्या , असणार्या वस्तू ). पाटल्या जोड , कांकणें जोड , इ०
- जोडी ; संघ ; संच ; ताफा ( सोंगटया खेळणारांचा , पूजापात्रांचा , खेळणारांचा , वाद्यांचा , वाजविणारांची ); डाव ( गंजिफाचा ); संच ( कपडे , धोतर व अंगवस्त्र यांचा ). सामान्यत : सेट .
- ठिगळ ; गावडी ; सांचा लावलेला तुकडा ; संयोग ( वस्त्र , लांकूड , धातू वगैरेस )
- सूर लावण्यासाठीं सा , रि , ग , म , प , ध , नी हे सूर खालीं - वर करणें ; आलाप घेणें .
- ( - स्त्री . ) ( अक्षरश : व ल० ) सांठा ; संचय ; संग्रह मिळविलेलें द्रव्य . आपल्या सार्या हयातीची जोड आपण भोळसरपणानें घालवून बसलों .
- मिळकत ; लाभ ; किफायत . जोड जोडिली मनुष्यदेहा ऐसी । - तुगा ७१२ . व्यर्थ भांडतां ह्यांत जोड काय !
- जोडलेला या अर्थी हा शब्द फळांच्या नांवांच्या मागें जोडतात . जसें - जोड - आंबा - पेरू - केळ इ० .
- दुहेरी या अर्थानें जोड शब्दाचे समास होतात . जसें - जोड - कडी - कांठ - खांब - तुळई - पदर - भिंत इ०
- गुंतवण ; सांधा ; संबंध ; सांगड ; गुंतवणूक ( पशूंची , माणसांची ); जोडपणा ; सांखळी . ( क्रि० घालणें ).
- विण्याच्या मधल्या दोन तारा ; सतारीच्या मधल्या दोन ( ज्या षडज स्वरांत मिळविलेल्या असतात त्या ) तारा .
- मैत्री ; सलगी ; जिव्हाळा .
- बरोबरी ; साम्य ; साथ . धर्मासि म्हणे बागा साधो जोडा नसेचि या दिवसा । - मोविराट ७ . १६ . गुंगा व गामा यांची जोड अगदीं अप्रतिम होती .
- ( बांधकाम ) पुस्ती ; नवीन गोष्टींची किंवा कांहीं कामांची वाढ .
- ( ओतकाम ) दोन पिशव्यांचा दोन हातांनीं फुंकला जाणारा भाता .
- ( कुस्ती ) एक डाव . जोडीदाराचा एक हात त्याच्या दोन्ही पायांतून धरून आपला दुसरा हात जोडीदाराच्या मानेवर ठेवून जोडीदाराची मान खालीं दाबून पायांतून जोडीदाराचा धरलेला हात वर उचलून त्याला चीत करणें [ सं . युज - योजय ; प्रा . जोड ; सं . जुड = बांधणें ] ( वाप्र . )
०करणें सांधणें ; मिळविणें . पुण्याची करावया जोड ; जीव हा सज्जला - विक ६९ . ( पायाची ). ०करणें कृपा संपादणें . मी आपले पायाची जोड केली आहे . ०देणें लाभ , फायदा देणें . संतपदाची जोड । दे रे हरी । - अमृत १०८ . ३४ . ०नसणें बरोबरी न होणें ; उपमा न मिळणें . सामाशब्द - ०अक्षर न. ( जोडाक्षर ) जोडलेलें अक्षर . उदा० क्र . म्ह , स्त इ० . जोडका वि . ( जोडणारा ) मिळविणारा ; संपादन करणारा ; कमावता
; मिळविता . जोडका पुत्र देखोनी गुणी । जनक जैसा सुखावे । - मुआदि ३० .
२२४ . कांतेला पति तोचि प्रीय हृदयीं जो कां असे जोडका - सदाशिव कविकृत
. उमाविलास ५ . जोडका , जोडता , जोडपूत , राम , रावजी पु - कुटुंबातील पैसा कमाविणारा मुलगा .
- जातींतील कमावता पुरुष (
अक्षरश : व निंदार्थी )
- ( मराठी राज्यांत ) लोकांच्या विरुध्द
बातमी मिळविण्यासाठीं व त्यांवरून दंड करून पैसा जमविण्यासाठीं प्रसंग आणून
देणारा , सरकारनें ठेवलेलां नीच माणूस ; लोकांची अंडींपिलीं सरकारास
कळविणारा पाजी माणूस .
०करीण वि. जोडीची वस्तु . अटकेची जोडकरीण तोफ फत्तेलष्कर होती . - भाब ४० . ०काम न. - निरनिराळे तयार केलेले भाग , जमविलेलें सामान जोडून केलेलें काम .
- जोडधंदा ; मुख्य कामाखेरीजें दुसरें काम .
०कार वि. ( गो . ) जोडका . ०गहूं पु. खपल्या गहूं . स्त्री . - साथ ; मदत ( गवई , हरिदास यांस ) हा पोर्या त्या
हरिदासाचे मागें उभा राहून जोडगिरी चांगली करितो .
- दुहेरीपणा ; दोन
पदार्थांचें एकत्रीकरण .
- जोडलेली स्थिति ; तुकडयांची बनावणी .
०गिरीगीर वि. - तुकडा जोडलेला ; तुकडा जोडून केलेला . या गाडयाचा आंस जोडगिरी आहे .
- दुहेरी ; दोन वस्तू ज्यांत आहे असा ; जोडाचा ( खांब , किल्ल्याच्या भिंती , कौलांचे थर ). घरास जोडगिरी खांब दिले असतां चांगली बळकटी येते .
०गोळी स्त्री. - दोन गोळयांचा बार .
- एका बंदुकींत एका वेळीं दोन गोळया .
- ( ल . ) दोहीकडून खटपट .
- ( ल . ) जोडी ; युग्म . नवरदेवांची जोडगोळी
जोडणें सक्रि . - सांधणें ; जुडविणें ; शेवटास संयोग करणें ; एकत्र करणें
( दोन तुकडे ).
- मिळविणें , अधिक लावणें ; जोड देणें (
लांबविण्यासाठीं ); एकावर एक किंवा एकापुढें एक ठेवणें ( दुसरा थर ,
अस्तर , लांबीचा तुकडा ). सखलातीस आंतून पासोडी जोडली तेव्हां थंडी
राहिली .
- जवळजवळ , लांबीच्या पुढें , बाजूस शेजारीं ठेवणें . दोनी
काठया जोडून पहा म्हणजे कोणती लांब तें कळेल .
- जुंपणें ; मानेवर जूं
ठेवणें किंवा खोगीर घालणें ( गुरें , घोडे यांच्या ).
- ( ल . )
जागेवर गुंतविणें ; कामाला लावणें , चिकटविणें . पोराला त्या चाकरीवर
जोडून द्या .
- जमविणें ; गोळाकरणें ; सांचविणें . संसारसंबंधें
परमार्थ जोडे । ऐसें केवीं घडे जाणते हो ।
- पूर्ण करणें ; तडीस नेणें ;
घडवून आणणें . माझें एवढें लग्न जोडून द्या .
- मिळविणें ; संपादणें ;
स्वत : साठीं कायम करणें , दृढ करणें ( कृपा , स्नेह , मैत्री ,
आश्रय , धंदा इ० ). आम्ही जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें ।
- ज्ञा १ . २१७ .
- युक्ति काढणें ; तजवीज करणें ; उपाय करणें .
जोडणी स्त्री . जोड ; सांधा जोडणें ; ( जोडणें क्रियापदाचें धातुसाधित ). जोडता वि . मिळविता ; संपादन करणारा . जोडका पहा ०चौकट स्त्री. दुहेरी चौकट ; याचा सांचा ( विशेषत : दाराचा ), दोन लांकडें बाह्यांनां जोडून केलेला असतो . जोडजूं ( पुणें ) शेलाटी ; ( नगर ) शिळवट , जडी ; ( सातारा ) शेवळ , शिवळ ; ( खानदेश ) जोडणी जुवडी . जोडणें अक्रि . - ताब्यांत येणें ; मिळणें . कीं रोग्यास रसायण निर्मळ ।
अकस्मात जोडलें ।
- ( क्व . ) भरभराट होणें ; भरमसाट मिळणें ; लग्गा
साधणें . [ सं . जुड = बांधणें ]
म्ह० अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला .
०दंड पु. ( व्यायाम ) कसरत करण्यासाठीं दोन आडवीं लांकडें बसविलेली योजना . ( इं . ) पॅरलल बार . ०नळी स्त्री. दुहेरी नळी ( बंदुकीची ). ०नाल पु. तालीमखान्यांतील एक वस्तु . जोडप न . ( राजा . ) जोड ; सांधा ; जोडणें ; जुडविणें .
०पट्टी स्त्री. ( लोखंडी पाणरहाट ) पोहोरे एकमेकांशीं अडकवून माळ करण्यासाठीं प्रत्येक पोहर्यास दोन बाजूंस बसविलेले लोखंडी कांबेचे तुकडे . ०पाडे क्रिवि . द्वंद्वानें ; भेदबुध्दीनें . विधिनिषेध जोडपाडें । जेथ विशेष कर्म वाढे । - एभा ७ . ६७ . जोडपें न . ( कों . ) नवराबायकोची
जोडी . अडचणीमुळें विवाहसंबंधानें बध्द अशीं स्त्रीपुरुषांची विसंगत
जोडपीं दृष्टीस पडतात . - टि ४ . २ . २ जुळें ; एकदम जन्मलेला मुलगा व
मुलगी .
जोडपी वि . जोडीदार ; सोबती ; बरोबरीचा ; जोडीचा ; जुळणारा ;
( सजीव , निर्जीव वस्तूं मध्यें ). तुला कोण पाहिजे तो जोडपी पाहा . ०पाहरा पु. दोन शिपायांचा पाहरा ; जोडीचा पाहरा . जोडपी स्त्री . ( क्व . )
- जुळणी ; मेळ ; एकत्र जोडणें .
- जुळण्यास
योग्य असणें ; बरोबरी .
०फळ न. ( काव्य ) जुळें फळ ; दुहेरी फळ . ०फळाचा सांधा पु. १ ( ल . ) सततचा संयोग किंवा संबंध ; नजीकचा एकत्र भाव ( चांगलें वाईट , सुखदु : ख इ० ). २ निकटची मैत्री ; दाट स्नेह . जैसा जोडफळांचा सांधा । तैसा सुखदु : खाचा बांधा । ०बंद पु. एकास एक चिकटवून लांबविलेला कागद .
|