-
पु. १ अणकुचीदार , तीक्ष्ण टोंक असलेली , जी बोचली असतां अक्त काढते अशी काडी ; बाभळीचा बोरीचा दाभणासारखा टोंचणारा अवयव . सर्प कपाळी कांटा नेहटे । कां सापसुरळीचें पुच्छ तुटे । ' - भारा बाल ८ . ३५ . २ ( भयानें थंडीनें वगैरे ) अंगावर उभे राहणारे शहारे ; रोमांच ३ ( अव .) तापानंतर अंगावर खरखरेतपणा अथवा बारीक पुटकुळ्या असतात तो ; पुरळ ; ४ ( अव .) तापाच्या पूर्वी अंगावर येणारी शिरशिरी ; रोमाची ; कसर . ५ विंचवाच्या नांगीचें पुढचें तीक्ष्ण टोक . ६ कुलुपादिकाचा खिळा , जो कुलुपाच्या दांडीत वसतो व मागें सरतो तो . ७ वेळूं बांभू वगैरेना . येणारातुरा ; मोहोर ; फुलोरा . ८ कंबर , मान पाठ यांच्या आंतील बाजूस आधारभूत असलेला आस्थिविशेष . ९ गुणकार भागाकार यांचा ताळा पाहण्यासाठी अंक मांडण्याकरितां घातलेली चौफुली (*). १० राघु , मैना इत्यादिकांच्या गळ्यांत होणारा एक रोग . ११ वजनानें विकलेल्या वस्तू वरं जे कांहीं वजन कटतें देतात तें कडता पहा . १२ नदी किंवा समुद्रांतील पाण्याखाली झांकलेला खडक . १३ काट्यासारखी शरीरास बोचणारी कोणतीहि वस्तु ( माशाचें हाड . चक्राचा दांता , घड्याळ्याचा हातकांटा , खडबडीत लागामाचें टोंक , करवतीचा दांता , जेवणांतील वापरावयाचें दांताळें - कांटा , जनावरें किंवा भाजीपाला यांवरील खरखरीत केंस . लव इ० ) ' काटा बराबर एकावर एक आला . - रासक्रीडा ७ . १४ हलवा , इतर मिठाई यांवरील टोंके , रवा ( क्रि० येणे ; उमटणें ; वठणें ; उठणें ). १५ ( विणकाम ) वशारन करतांना इकडून तिकडे ( वशारन पुढें सरकण्यासाठी ) फिरवावयाचें लांकूड १६ ( व .) थेंब . ' घरांत तेलाचा एक कांटा नाहीं .' - वशाप ५१ . १२ . ४७८ . १७ ( कु .) सुताराचें एक हत्यार . १८ ( ल .) त्रास देणारा माणुस व्याधि , शल्य , पीडा , शत्रु . ' धर्मांच्या हृद्यांतिल काढितसे मी समुळ कांटा हो । ' १९ तराजुच्या दाडीमधील उभा खिळा . ' जरि कांटा कलताए दैवांचा । जेडता राजमठु । ' - ऋ ३९ . २० काटा असलेला तराजु ( विशेषत ; सोनाराचा सराफाचा ). ' मेरुचिया वजनास पाहीं । कांटिया वातली जैशी राई । ' - ह . ३० . १६१ . ( सं . कंटक , प्रा . कंटओ . अप . कंटउ ; त्सीगत ; फ्रें जि . कंडो . ते काटा )
-
Expresses the rising of a great evil out of a small one. कांट्यानें कांटा काढणें To employ one hateful person or thing to destroy another.
-
m A thorn. Balance. A pest. Erection of the hair of the body. The tongue (of a lock). The back-bone The hand of a watch. Congelations or crystals.
-
कांटा उपटणें Pluck up the very root ofany mischief or mischievous person.
Site Search
Input language: