|
अ.क्रि. १ ( गुंतागुंतीच्या मार्गात , चक्रव्यूहांत ) इकडे तिकडे , मागेंपुढें फिरणें , भ्रमणें . २ कोंडाळणें ; वळणें ; तोंड फिरविणें ; दिशा बदलत फिरणें ; भोंवणें ; गरगर फिरणें ; घुटमळणें उ० कोंडलेल्या जागेंतील वारा . २ ( गवताच्या काडया , केरकचरा इ० वार्याच्या झोतावर ) इतस्तत : उडणे ; गरगर फिरत राहणें . ३ ( नदी इ० ) वळनावळणांनीं वहात जाणें ; भोंवरे करीत वाहाणे . ४ ( मन इ० ) गोंधळून जाणें , घोंटाळयांत पडणें ; दिडमूढ होणें ; बावरणें ; गडबडून जाणे ; गुंतणे ; ते सणंग तितक्या रुपयांनीं देण्याविषयीं त्याचे घोंटाळत होते . [ सं . गुंठ - घोंट - घोंटाळणें - गुंठाळणें = लपणें , आंत ओढणे ; - भास १८३२ . ] - सक्रि . गोंधळून टाकणें ; गुंतवणे ; बुचकळयांत पाडणें ; घुटमळावयास लावणें . जातो परी तव मोहनी । घोटाळीत माझे प्राणालागुनी । - नव २१ . ४९ . [ घोटाळणे प्रयोजक ] स.क्रि. १ घाटणें ; घोटविण ; घोटून गुळगुळीत व टणक करणें ( जमीन , भिंत इ० ). चीत्र लीहावेयाची आईती केली । नीट भींती कापडीली । षडी सारुनी घोटाळली । वर्तेषडी मेळवीली । - उषा २८ . १३ . २ कित्यांतील अक्षरावरून कोरडी लेखणी फिरवून अक्षरें गिरवणें , घटविणें , वळविणें ; घोटणे ४ अर्थ पहा . [ घोटणें ]
|