Dictionaries | References क करतलामल Script: Devanagari See also: करतलामलक Meaning Related Words करतलामल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Used of any thing on which, from the clearness and cogency of the evidence it bears, dispute seems impossible. Corresponding to "Like the sun at noonday." करतलामल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि./क्रिवि . ( हातांत प्रत्यक्ष स्थित असलेला आवळा जसा सर्व बाजूंनी पाहतां येतो त्याप्रमाणें ) सिद्ध ; स्पष्ट ; उघड ; ज्याचें सर्व बाजूंनीं ज्ञान झालें आहे असें ; ज्यास दुसरें प्रमाणाची गरज नाहीं . असें . असंशयित ' ' वेदशास्त्राचा मथितार्थ । झाला करतलामलकवत । ' - एभा ११ . १०४९ . ' ते करतलामलकसे दुरूनि दिसले अशेष मग तीतें । ' - मोस्त्री ४ . ३ . ( ल .) अवगत असलेली ; हातचा मळ बनलेली ; अत्यंत सुलभ ; साध्य ( विद्या , कला शास्त्र वगैरे ). ' चतुर्दश विद्या चौसष्ट कला । करतळामळ जयासी सकळा । ' - ह ३१ . ८ ' महाराष्ट्र व संस्कृत या दोन्हीं भाषा मोरोपंताला करतलामल होत्या ' - नि ७६५ . स्वाधीन ; सुगम . ' सारा भूगोल ज्यास करतलामलकवत् आहे त्यास एखाद्या रानांत नेऊन सोडला किंवा त्याच्या हातीं जहाजाचें सुकाणूं दिलें तर काय मौज होईल बरें !' - नि . ( कर + तल + आमलक ) करतलामल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ कर + तल + आमलक + वत् = हाताच्या तळव्यातील आवळ्याप्रमाणें ]. हातांत प्रत्यक्ष असलेला आवळा जसा सर्व बाजूंनी पाहिजे तसा पाहतां येतो त्याप्रमाणें, जयाचे सर्व बाजूंनी स्पष्ट ज्ञान झाले आहे असा ज्यास दुसर्या बाह्य प्रमाणाची जरूर नाही असा. ‘वेदशास्त्राचा मथितार्थ। झाला करतलामलकवत्।’- एभा ११.१०४९. पूर्णपणे अवगत असलेली, अगदी हातचा मळ बनलेली अत्यंत सुलभ (विद्या, कला, शास्त्र वगैरे). ‘चतुर्दशविद्या चौसष्ट कला। करतळामळ जयासी सकळा।’ -ह ३१. ‘महाराष्ट्र व संस्कृत या दोन्ही भाषा मोरोपंताला करतलामल होत्या.’ - नि ७६५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP